रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

पेमेंट गेटवे साठी चा सामंजस्य करार



नमस्कार मित्रांनो , 

विषय - पेमेंट गेटवे साठी चा सामंजस्य करार 

          आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा ७/१२ संगणकीकरण प्रकल्प - ई फेरफार प्रकल्प आत्ता पूर्णत्वाच्या अंतिम टप्प्यावर असून या प्रकल्पाच्या माध्यमातून आपण लवकरच जनतेला डिजिटल स्वाक्षरीत अचूक ७/१२ महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी आवश्यक असणाऱ्या स्टेट बँक ऑफ इंडिया पेमेंट  गेटवे साठी  च्या सामंजस्य करारावर नुकतीच स्वाक्षरी झाली आहे .

पुणे  दिनांक- 02/08/2019राज्यात DILRMP (Digital India Land Record Modernization programme) अंतर्गत अधिकार अभिलेखांचे संगणकीकरण करण्याचे काम ई-फेरफार आज्ञावलीद्वारे करण्यात येत आहे. ई- फेरफार आज्ञावलीचा मुख्य उद्देश राज्यातील जनतेला डिजीटल स्वाक्षरीत अधिकार अभिलेख ऑनलाईन उपलब्ध करून देणे हा आहे. त्यासाठी भारतीय स्टेट बँकेच्या SBI e-Pay या payment Gateway चा वापर करण्यात येणार असून त्याबाबतच्या सामंजस्यकरारावर आज जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे व उपप्रंबधक, भारतीय स्टेट बँक यांची स्वाक्षरी झाली.
या सुविधेमुळे क्रेडीटकार्ड, डेबीटकार्ड, नेटबँकीगचा वापर करून नागरीक /व्यवसायीक वापरकर्ते यांना 7/12 व ८अ च्या डिजीटल स्वाक्षरीत नकला ऑनलाईन शुल्क भरून काढता येणार आहेत. त्यामुळे जनतेला 7/12 व 8अ च्या नक्कले साठी तलाठी /सेतू केंद्र या ठिकाणी जाण्याची आवश्यकता भासणार नाही.
आता लवकरच ही सुविधा सुरु होईल


आपला 
रामदास जगताप 
दि ४.८.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send