रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ऑनलाईन हक्कनोंद संचिका (RTS FILE ) व DSC शिवाय चालणारी अभिलेख वितरण प्रणाली (DDM) बाबत



नमस्कार मित्रांनो ,


विषय - ऑनलाईन हक्कनोंद संचिका (RTS FILE ) व DSC शिवाय चालणारी  अभिलेख वितरण प्रणाली (DDM)  बाबत .


           ई फेरफार प्रणाली चा वापर सुरु केल्या पासून सर्व तलाठी यांना जुन्या पद्धतीने  हक्कनोंद संचिका (RTS FILE ) जतन करावी लागत होती त्यामुळे मंडळ अधिकारी यांना फेरफार निर्गत करताना ती संचिका अवलोकन करूनच नोंदी निर्गत कराव्या लागत होत्या . त्यासाठी ई फेरफार प्रणाली मध्ये खालील सुविधा विकसित करणेत आली आहे .


ऑनलाईन हक्कनोंद संचिका (RTS FILE )
      कोणत्याही फेरफारसी संबंधित आदेश , हुकुम , कागदपत्र , दस्त ऐवज ऑनलाईन पद्धतीने जतन करण्यासाठी  संबंधित DOCUMENT UPLOAD करण्याची सुविधा तलाठी व मंडळ अधिकारी लोगिन ला देण्यात आली आहे . या मध्ये तलाठी प्रत्येक फेरफारासाठी जास्तीत जास्त पाच डॉक्युमेंट / कागदपत्र अपलोड करू शकतो.  या मध्ये कोणत्याही  स्वरूपाचे आदेश प्रतिज्ञापत्र , मृत्यू दाखले, शेतकरी दाखला , अन्य गावातील ७/१२ अथवा ८ अ, विक्री परवानगी आदेश ,
मंडळ अधिकारी देखील तक्रार / हरकत नोंदी  प्रकरणी झालेले निकालपत्र अपलोड करू शकतील . असे सर्व कागदपत्र मंडळ अधिकारी यांना फेरफार निर्गत करताना पाहता येतील . हि ऑनलाईन हक्कनोंद संचिका (RTS FILE ) कायम स्वरूपी फेरफार निहाय
जतन केली जाईल व वरिष्ठ अधिकारी यांना केंव्हाही पाहता येईल .


DSC शिवाय चालणारी  अभिलेख वितरण प्रणाली (DDM)  -

             तलाठी यांना मोठ्या गावातील कामकाज करताना नकला वितरण व फेरफार नोंदी करण्याचे कामकाज करताना एकाच DSC वापरून काम करताना वेळेची मर्यादा येते हा अनुभव विचारता घेवून सर्व तलाठी यांना नक्कल वितरणासाठी DSC शिवाय चालणारी  अभिलेख वितरण प्रणाली (DDM)  उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेनेत आला आहे . कोणत्याही तलाठ्याला DSC लोगिन ने ई फेरफार प्रणालीत लॉगीन केले नंतर तेथे DDM साठी पासवर्ड तयार करता येईल व तो पास्स्वर्द वापरून अन्य संगणकावर DSC न वापरता  अभिलेख वितरण प्रणाली (DDM)  वापरून नकाला वितरीत करता येतील . एकदा तयार केलेला पासवर्ड DDM लॉगीन साठी  फक्त दहा  मिनिटाचे आत वापरणे बंधनकारक राहील . त्यानंतर लॉगीन साठी पुन्हा नवीन पासवर्ड तयार करावा लागेल . अशा पद्धतीने तलाठी यांना कोतवाल अथवा अतिरिक्त तलाठ्याच्या मदतीने नकला वितरीत करता येतील मात्र या सर्व कामकाज त्याच मुख्य तलाठ्याचे नावे होईल तसेच हिशोब देखील DSC असलेल्या तलाठी यांचेच नावे ठेवला जाईल . या सुविधे मुळे खातेदार यांना नकला वितरीत करताना येणारया अडचणी निश्चित कमी होतील असा विश्वास आहे .

    या दोन्ही सुविधा सध्या नाशिक व चंद्रपूर जिल्ह्यात टेस्टिंग साठी दिली आहे . त्यांचे FEDBACK नंतर या दोन्ही सुविधा सर्व जिल्ह्यांना पुढील आठवड्यात उपलब्ध करून देता येतील .


आपला

रामदास जगताप
दि २२.६.२०१९

Comments

Archive

Contact Form

Send