रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

दि २६.६.२०१९ पासून उपलब्ध झालेल्या नवीन सुविधा / बदल


नमस्कार  मित्रांनो , 

दि २६.६.२०१९ पासून उपलब्ध झालेल्या नवीन  सुविधा / बदल 



ई फेरफार प्रणाली - मध्ये खालील बदल / सुधारणा करून दि २६.६.२०१९ आश्रूण सर्वाना उपलब्ध करून देल्या आहेत . 
१. मोठ्या शहर लगतच्या भागात जेथे ७/१२ वरील एकूण क्षेत्र हे,आर . मध्ये नमूद आहे तथापि खातेदाराचे नावासमोर चे क्षेत्र चौ. मी. मध्ये नमूद आहे अशा ७/१२ वरील दुरुस्ती साठी एक नवीन फेरफार प्रकार " नमुना ७ प्रमाणे खातेदारांचे क्षेत्र रुपांतरीत करणे    " विकसित केला असून तो टेम्प्लेट स्वरुपात उपलब्ध करून दिला आहे . 

२.  जुना ७/१२ बंद करून नवीन पोट हिस्से तयार करावयाच्या दुरुस्ती सुविधे मध्ये इतर हक्कातील नोंदी सर्व नवीन पोट हिस्स्यावर येत नाहीत असा feedback आला होता त्यात सुधारणा करणेत आली असून आत्ता नवीन सर्व पोट हिस्स्यावर ईतर हक्कातील नोंदी व्यवस्थित होतील .

३. अपाक  फेरफार करताना सारखीच नावे त्या खात्यात असल्यास येणारी अडचण दूर करणेत आली आहे .

४. Windows-7 Ultimate version साठी सपोर्ट करणारे  New Activex Component  विकसित करून सर्वांना डाऊनलोडसाठी उपलब्ध करून दिले आहे .

 ५.  खरेदी फेरफार प्रकारा साठी अहवाल १ मधील सर्वे उपलब्ध करून दिले आहेत ( हि सुविधा फक्त दोन महिन्यासाठी आहे तो पर्यंत सर्व अहवाल १ चे सर्वे दुरुस्त करून घ्यावेत )


६. बोजा , वारस व इतर हक्कातील अन्य फेरफार प्रकारासाठी ( सामान्य फेरफार वगळून )  अहवाल १ मधील सर्वे उपलब्ध करून दिले आहेत ( हि सुविधा फक्त दोन महिन्यासाठी आहे तो पर्यंत सर्व अहवाल १ चे सर्वे दुरुस्त करून घ्यावेत )


७. FIFO for objections - घेनेत आलेल्या फेरफार पैकी एखाद्या सर्वे वर तक्रार दाखल झाली असल्यास त्या गटावरील अन्य नोंदणीकृत दस्त फेरफार घेण्यासाठी प्रक्रिया करता येत नव्हता त्यासाठी हरकत अर्ज असल्यास नोंदणीकृत दस्ताबाबत लावलेल्या FIFO ( FIRST IN FIRST OUT ) ला अपवाद केला आहे म्हणजेच आत्ता एखाद्या नोंदणीकृत दस्तावर तक्रार नोंद / हरकत शेरा प्रलंबित असला तर तो दस्त वगळून त्या पुढील नोंदणीकृत दस्त  फेरफार घेण्यासाठी FIFO अपवाद करून उपलब्ध करून देनणेत आला आहे .  

 ८.  खाता दुरुस्ती व चूक दुरुस्ती फेरफार चे परिशिष्ट क दाखविण्याची सुविधा देनेत आली आहे .


९. कलम १५५ क्षेत्र दुरुस्ती फेरफार मध्ये जर एकक योग्य असेल तर फक्त क्षेत्र दुरुस्ती करता येईल अशी सुविधा देनेत आली आहे या पूर्वी फक्त असे करता येत नव्हते .


१०.  मोठ्या क्षेत्राचे ७/१२ ( २० हे किंवा ९९ आर ) मध्ये जर फक्त पोट खराब क्षेत्र असेल व ते क्षेत्र खातेदारांचे नावा समोर नमूद नसेल तर असे ७/१२ एकदा तहसीलदार यांचे मान्यतेला दिसत नव्हते / उपलब्ध नव्हते ते आत्ता उपलब्ध करून दिले आहेत म्हणजेच जर मोढ्या क्षेत्राचे प्रतिबंधित ७/१२ वरील एकक व क्षेत्र योग्यच आहे असे तलाठी यांचे मत असल्यास व त्यास तहसीलदार यांनी एकदा मान्यता दिल्यास असे ७/१२ कायम स्वरूपी प्रतिबंध मुक्त होतील / करता येतील .


११.  एका ७/१२ वर एकाच खाते असेल व ते देखील कंस झाले असेल तर  अहवाल १ मधील दुरुस्ती साठी  DBNULL error येणारा एरर आत्ता येणार नाही . 

१२. अडला बदली फेरफार मध्ये दस्त करून देणाऱ्या व्यक्ती च्या नावातील स्पेस मुले येणारी अडचण दूर करणेत आली आहे .


१३. फेरफार मंजुरी नंतर ७/१२ दिसण्यात येणारी अडचण  ( ब्लांक ७/१२ ) दूर करणेत आली आहे .


१४ .DDM आज्ञावली वापरण्यासाठी सांकेतांक (password) तयार करने 

 मोठ्या साजा / गावांचे ठिकाणी नक्कल वितरण व ई फेराफ्र चे कामकाज एकाच DSC वापरून एकाच LAPTOP मधून करण्यात येणारी अडचण दूर करण्यासाठी DDM WITHOUT DSC  विकसित केले आहे त्यासाठी तलाठी यांनी ई फेरफार प्रणालीत DSC लावून लॉगीन केल्यानंतर DDM साठी पासवर्ड तयार करणे आवश्यक आहे .हा पासवर्ड १० मिनिटात  DDM WITHOUT DSC लॉगीन करणेसाठी वापरता येईल .( १० मिनिटा नंतर लोगिन करणेसाठी पुन्हा पासवर्ड तयार करावा लागेत व असे जास्तीत जास्त तीन पासवर्ड तयार करून एकाच वेळी तीन ठिकाणी अभिलेख वितरण प्रणाली तून नकला वितरण करता येईल ) तेथे लॉगीन करताना कार्यरत तलाठ्याचा सेवार्थ आय डी हाच लॉगीन आय डी असेल व ई फेरफार मध्ये तयार झालेला पासवर्ड हा पासवर्ड म्हणून वापरावा लागेल . अशा DDM मधून देलेल्या नकला कार्यार्थ तलाठी यांचे नावे निघतील व त्यांचेच नावे हिशोबित केल्या जातील .  ( पासवर्ड alphanumeric with combination of numbers and small alphabets.चा असेल )

 १५. मजूर फेरफारच अंमल होताच अश्या ७/१२ च्या HTML file तयार करणेत येतील व त्या DDM मध्ये नक्कल वितारासाठी उपलब्ध होतील त्यामुळे ७/१२ ची नक्कल मिळण्यास कमी वेळ लागेल . 

१६. वारस नोंदी सारख्या काही फेरफार प्रकारामध्ये जुना फेरफार क्रमांक इतर फेरफार मध्ये दिसत नव्हता ती अडचण दूर केली असून आता असे सर्व जुने फेरफार क्रमांक इतर फेरफार क्रमांका मध्ये दिसतील अशी सुधारणा केली आहे .


१७. आदेश व दस्त ऐवज फेरफार प्रकार मधून सर्वे नंबर बदलण्यासाठी फेरफार घेताना Object reference not found असा एरर येत होता ती अडचण दूर करणेत आली आहे . 

१८. ज्या ठिकाणी आणेवारी प्रमाणे क्षेत्र रुपांतरीत केले आहे परुंतु आणेवारी काढणी नव्हती तेथे त्या खात्यावर ८ अ ला क्षेत्र दिसत होते मात्र ७/१२ वर खातेदाराचे नावासमोर क्षेत्र दिसत नव्हते . ती अडचण दूर करणेत आली असून जेथे क्षेत्र नमूद केले आहे ते ७/१२ वर खातेदारांचे नाव समोर दिसेल . 


ODC MODULE -
प्रत्येक गावातील अहवाल १ ते ४१ मधील त्रुटी दर्शविणारा गोषवारा दर्शविणारा अहवाल ODC मध्ये देण्यात आला असून त्या मध्ये प्रत्येक अहवालातील त्रुटी  शिल्लक किती आहेत ते समजू शकेल .
हा अहवाल अपडेट होण्यासाठी DBA यांनी एक गाव निवडून असा प्रत्येक अहवाल अपडेट करणे आवश्यक आहे तरच आपण केलेलं काम व शिल्लक काम दिसून येईल .
ODC मधील जुने समरी रिपोर्ट काढून टाकले आहेत .

ODC - MIS
ODC अहवाल १ ते ४१ पैकी ७/१२ व ८ अ वर थेट परिणाम करणारे अहवाला माधीत तफावती ची संख्या एकत्र करून एकूण तफावती दर्शविणारा ODC MIS हा नवीन MIS राज्य . जिल्हा , तालुका व गाव स्थरावर उपलब्ध करून दिला आहे ( १ ते ४१ पैकी अहवाल क्र. २,३,४,१४,२३, २९,३१.३२, व ३८ असे ९ अहवाला माधीत त्रुटींची  बेरीज एकूण तफावती मध्ये घेतलेली नाही .)  
हा MIS पाहूनच या पुढे प्रलंबित कामाचा आढावा घेतला जाणार आहे 

ह्याची नोंद घ्यावी 

जसे जसे कलम १५५ च्या दुरुस्ती चे अथवा अहवाल १ ते ४१ निरंक करणेचे काम होईल तसे तसे हे अहवाल कमी कमी होत जातील मात्र त्यासाठी DBA नियमित हे अहवाल अद्यावत करणे आवश्यक आहे . या पुढे तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांना या अहवालावर च लक्ष ठेवून काम करावे लागेत . 


USER CREATION- चूक दुरुस्ती च्या तलाठी यांनी केलेल्या REQUEST तहसीलदार यांना USER CREATION मध्ये दिसत नव्हत्या त्या आता दिसतील व त्यांना मान्यताही देता येईल USER CREATION DASHBOARD ला पेजिंग करणेत आले आहे 


या सर्व सुविधा वापरून FEED BACK द्यावा


आपला
रामदास जगताप
दि ३० जून २०१९ 


Comments

  1. आपल्या चांगया वाईट , प्रतिक्रिया कळवा तरच सुधारणा होतील

    ReplyDelete
    Replies
    1. अहवाल 1 मध्ये असलेल्या गटावर खरेदी नोंद अजूनही होत नाहीत

      Delete
    2. templet मधून घ्या

      Delete
  2. अहवाल 1 मध्ये असलेल्या गटावर खरेदी नोंद अजूनही होत नाहीत

    ReplyDelete
    Replies
    1. Plz go with kharedi template,

      Do not go through samany ferfar - kharedi option

      Delete
    2. क्षेत्राचा फरक 0.34आर आहे त्याची काही अट आहे का?

      Delete
    3. आपला cont. न द्या pls

      Delete
  3. नावात चुक दुरूस्ती फेरफार,जुना फेरफार क्र.update सुविधा तलाठी level वरच ठेवाव्या वेळ वाचेल त्याचा record ठेवावा.लांबलचक procedure नको.

    ReplyDelete
    Replies
    1. आत्ता प्रख्यापण केल्या नंतर ते शक्य नाही

      Delete
  4. sir namaskar atirikt saza kinva atirikat manadal adhikari aasalyas vegavegali dsc uplabadh zalyas kaam sope hoil.

    ReplyDelete
    Replies
    1. DSC व्यक्ती ची आहे पदाची नाही ना ?

      Delete
  5. अहवाल ३३ कसा दुरुस्त करावा ई फेरफार मधे option nahi.

    ReplyDelete
    Replies
    1. ई फेरफार मध्ये फेरफाराने खाता विभागणी पर्याय आहे तो पाहावा

      Delete
  6. अहवाल १ मधे आदेश नोंद घेत नाही.
    आदेशाने खात्यात नाव सामाविष्ट होत नाही
    वाटपाची नोंद होत नाही

    ReplyDelete
    Replies
    1. सध्या होणार नाही . अहवाल १ दुरुस्त करा

      Delete
  7. १५५ क मधे इतर अधिकारातील दुरुस्ती होत नाही.

    ReplyDelete
  8. नेहमी वापरता तीच , परतू ती दि २.७ पासून मिळेल

    ReplyDelete
  9. तलाठी चूक दुरुस्ती पर्याय वापरा त्यातून सर्व दुरुस्त्या एकाच पर्यायातून होतील

    ReplyDelete
  10. अहवाल 1 मध्ये त्रुटी असल्यामुळे फेरफार घेता येत नव्हते ते आता घेता येतील का ?

    ReplyDelete
  11. सर 7/12 पुर्वीप्रमाणे एकाच पेजवर यावे. दोन पानावर येत असल्यामुळे विनाकारण पेज वाया जात आहेत.

    ReplyDelete
  12. मा. सर ईफेरफार प्रणाली मध्ये FIFO आपण लागु केलेले आहे पण याचा उपयोग अर्जदार यांना फारसा होत असल्याचे दिसुन येत नाही, याची कारणे खालील प्रमाणे आहेत.
    1. SRO कडुन दस्त नोंदणी झाल्यानंतर तलाठी हे त्या दस्ताचा फेरफार क्रमांक तयार करतांना FIFO लागु असल्यामुळे आधी झालेला दस्ताचा फेरफार क्रमांक तयार केल्याशिवाय नंतरच्या दस्ताचा फेरफार तयार करता येत नाही. येथे FIFO लागु होतो चांगली बाब आहे.
    2. तलाठी यांनी एकदा फेर तयार केल्यानंतर त्या फेरची नोटीस काढणे, नोटीस बजावणे, हरकत भरणे हे योग्य त्या वेळी करत नाहीत, काही तलाठी हे आधी आलेल्या दस्ताचा किंवा फेरफार डॅशबोर्डवर घेवुन नुसते सोडुन देतात त्याची नोटीस काढत नाहीत, नोटीस काढली तर ती बजावल्याची तारीख भरत नाहीत, हरकतीचा शेरा भरत नाहीत त्यामुळे नंतर आलेल्या फेरफार पुर्वी झालेल्या फेरफार पुर्वी मंजुर होऊन 7/12 येतात त्यामुळे आधी दस्त होऊन देखील शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत नाही.
    3. तलाठी हे फेरफार क्रमांक तयार करुन नोटीस काढुन सोडुन देतात व त्याची हरकत 15 दिवस पुर्ण झालेतरी भरत नाहीत. 25 ते 30 दिवसांनी हरकतीची तारीख भरतात ती पण 15 दिवसापुर्वीची.
    4. आपणास विनंती आहे कि FIFO हे ज्या फेरफारव आक्षेप प्राप्ततीचा शेरा भरला असे फेरफार क्रमांक वगळुन पुढील फेर नोटीस काढणे, नोटीस बजावणे, हरकत भरणे या सर्व स्तरावर लागु करावे जेणे करुन आधी झालेल्या फेरफारचा अमल हा आधी होइल व त्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

    आपला विश्वासु
    मंडळ अधिकारी

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send