रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

मोठ्या क्षेत्राचे प्रतिबंधित ७/१२ बाबत



नमस्कार मित्रांनो , 
 मोठ्या क्षेत्राचे प्रतिबंधित ७/१२ बाबत 

DILRMP अंतर्गत संगणीकृत केलेल्या ७/१२ मध्ये प्रकल्पाची गरज व संपूर्ण राज्यात एकवाक्यता / एकसमानता राहावी म्हणून काही निर्णय सन २००२ मधेच NLRMP मध्ये डेटा एन्ट्री कशी करावी या बाबतच्या शासन परिपत्रकात घेनेत आले होते त्यावरच या  ई फेरफार प्रणाली चे कामकाज चालते .
१. शेतीच्या संगणकीकृत ७/१२ चे एकक हे.आर.चौ.मी. व बिनशेतीच्या संगणकीकृत ७/१२ चे एकक आर.चौ.मी. असेल .२. संगणकीकृत ७/१२ मध्ये खातेदारांची नावे पहिले नाव मधले नाव आडनाव व असल्यास टोपण नाव अशी नमूद केली जातील ३. संगणकीकृत ७/१२ मध्ये सर्वे नं. ते योग्य पद्धतीने दिले आहेत त्याची खात्री करावी आदिक (+) नमूद करून किंवा अक्षरी सर्वे नंबर साठी फेरफार घेवून जुन्या चुकीच्या सर्वे नं. ला योग्य स.नं. नमूद करून दुरुस्त स.नं. ची डेटा एन्ट्री करावी . ४. खाती तयार करताना त्याची योग्य वर्गवारी करून योग्य खाते प्रकार निवडावा . त्यासाठी वैयक्तिक , समाईक , संयुक्त , हिंदू अविभाज्य कुटुंब , सरकार , धर्मदाय संस्था , महामंडळे , एकुम्या , अपाक , असे खाते प्रकार चे मास्टर निवडण्यासाठी दले होते . ५. संगणकीकृत ७/१२ मध्ये शेती चा ७/१२ व बिनशेती चा ७/१२ एकत्र ठेवता येणार नाही . ६. संगणकीकृत ७/१२ मध्ये वेगवेगळ्या भूधारणा प्रकार असलेले खातेदार एकाच ७/१२ वर असू नयेत ..

तथापी या सूचनांकडे दुर्लक्ष झाल्याने काही अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यापैकी काही व त्यावरील उपाय योजना .


१. मोठ्या क्षेत्राचे प्रतिबंधित ७/१२ ( २० हे किंवा ९९ आर ) -

या मध्ये  शेतीच्या ७/१२ वर २० हेक्टर पेक्षा जास्त व बिनशेतीच्या ७/१२ वर ९९ आर पेक्षा जास्त क्षेत्र नमूद असल्यास असे मोठ्या क्षेत्राचे ७/१२ समजून फेरफार व दस्त नोंदणी साठी प्रतिबंधित केले आहेत .  या वर दोन उपाय आहेत 

अ. जर असे मोठ्या क्षेत्राचे ७/१२ खरोखरच अस्तित्वात असतील तर ( जसे वन क्षेत्राचे , कंपन्या , साखर कारखाने , धरणे , तलाव , यांचे ७/१२ ) तर एकक व क्षेत्राची मूळ ७/१२ वरून खात्री करून तलाठी तशी ऑनलाइन विनंती तहसीलदार यांना पाठवतील व तहसीलदार या ७/१२ चे क्षेत्र व EKAKयोग्य असल्याची खात्री करून कन्फर्म करतील त्या नंतर असे मोठ्या क्षेत्राचे ७/१२ केंव्हाही प्रतिबंधित होणार नाहीत . ही एकदाच करावयाची बाब आहे 


ब. जर असे प्रतिबंधित मोठ्या क्षेत्राचे  ७/१२ दुरुस्त करावयाचे असल्यास कलम १५५ च्या दुरुस्ती सुविधा ( क्षेत्र दुरुस्ती / अहवाल १ ची दुरुस्ती ) वापरून क्षेत्र व एकक दुरुस्त करता येईल . 

           जर  अशा ७/१२ वर फक्त पोट खराब क्षेत्र असेल व ते क्षेत्र खातेदारांचे नावा समोर नमूद नसेल तर असे ७/१२ एकदा तहसीलदार यांचे मान्यतेला दिसत नव्हते / उपलब्ध नव्हते ते आत्ता उपलब्ध करून दिले आहेत म्हणजेच जर मोढ्या क्षेत्राचे प्रतिबंधित ७/१२ वरील एकक व क्षेत्र योग्यच आहे असे तलाठी यांचे मत असल्यास व त्यास तहसीलदार यांनी एकदा मान्यता दिल्यास  / कन्फर्म केल्यास असे ७/१२ कायम स्वरूपी प्रतिबंध मुक्त होतील / करता येतील .



अशा सर्व मोठ्या क्षेत्राचे ७/१२ ची यादी  गाव निहाय सर्व DDE यांना नोव्हेंबर २०१८ व फेब्रुवारी २०१९ ला अशी दोनदा उपलब्ध करून दिली आहे 

तसेच अशा ७/१२ ची यादी तलाठी यांना ई फेरफार मध्ये सर्वे खाता अहवाल मध्ये देखील उपलब्ध आहे 



असे सर्व ७/१२ दुरुस्त केल्या शिवाय त्यावर कोणताही फेरफार  घेता येणार नाही अथवा दस्त नोंदणी करता येणार नाही ह्याची नोंद घ्यावी 


आपला 

रामदास जगताप 
दि ३० जून २०१९ 

Comments

  1. Respected Sir,
    1 ७ चे क्षेत्र व १२ चे क्षेत्र याची दुरुस्ती चे अधिकार कोणाला आहेत उदा. ७ क्षेत्र ४.२२ व १२ क्षेत्र ४.३३ आहे
    २. आम्हाला महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ यांच्याकडून जमिनी मिळाल्या आहेत.ईतर हक्कात दि. गो.शु.कं.स.सा.कुळ यांचे नाव आहे. ते कमी करण्यासाठी काय करावे लागेल.
    ३ शेत सारा on line payment करता येऊ शकेल का त्यामुळे तलाठी ऑफिस मध्ये जाण्याचा वेळ वाचेल

    ReplyDelete
  2. Respected Sir,
    1 ७ चे क्षेत्र व १२ चे क्षेत्र याची दुरुस्ती चे अधिकार कोणाला आहेत उदा. ७ क्षेत्र ४.४२ व १२ क्षेत्र ४.४३ आहे
    २. आम्हाला महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ यांच्याकडून जमिनी मिळाल्या आहेत.ईतर हक्कात दि. गो.शु.कं.स.सा.कुळ यांचे नाव आहे. ते कमी करण्यासाठी काय करावे लागेल.
    ३ शेत सारा on line payment करता येऊ शकेल का त्यामुळे तलाठी ऑफिस मध्ये जाण्याचा वेळ वाचेल

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send