ई हक्क प्रणाली -PDE
ई हक्क प्रणाली -PDE
जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या वतीने व जिल्हाधिकारी पुणे यांच्या मदतीने ई हक्क नावाने एक नवीन ऑनलाईन आज्ञावली ( PDE – Public Data Entry ) विकसित करणेत आले असून या मध्ये कोणत्याही खातेदाराला / संबंधित व्यक्तीला तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या हक्काच्या नोंदी ७/१२ वर फेरफार च्या स्वरुपात घेण्यासाठी जे अर्ज करावे लागतात ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात न जाता घरी बसून देखील दाखल करता येतील . या मध्ये सध्या पहिल्या टप्प्यात आठ फेरफार प्रकारचे अर्ज दाखल करता येतील .
फेरफार घेण्यासाठीचे अर्ज संबंधित खातेदार अथवा संबंधित व्यक्तीला ई हक्क प्रणालीतून ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील . अशा फेरफार प्रकारासाठी कोणती कागदपत्र जोडावी लागतील त्यांचे यादी देणेत आली असून असी कागदपत्रे स्कॅन करून ( स्वयं साक्षांकित प्रत ) पीडीएफ स्वरुपात अपलोड करता येतील .
अशा पद्धतीने दाखल केलेल्या प्रत्येक अर्जाला अर्ज नंबर ( Aplicatiopn ID) मिळेल व त्याची ऑनलाईन पोहोच देखील अर्जदाराला मिळेल व अश्या अर्जांची स्थिती अर्जदाराला प्रत्येक टप्प्यावर तपासता येईल . प्रत्येक टप्प्यावर अर्ज स्वीकारला , काय कारण देयून परत पाठवला ? , फेरफार तयार केला का ? नोटीस काढली का? नोटीस बजावनेत आली का ? रुजू करणेत आली का? फेरफार मुदतीत हरकत आली का? फेरफार मंजूर झाला का ? ऑनलाईन ७/१२ दुरुस्त झाला का ? अशा प्रत्येक टप्प्यावर मोबाईलवर मेसेज येईल . असा भरलेला अर्ज तलाठ्याकडे ऑनलाईन जाईल तो योग्य असल्याची खात्री करून तलाठी तो अर्ज स्वीकारील अथवा कारण देवून पुन्हा अर्जदाराकडे दुरुस्ती साठी पाठवेल किंवा कारण नमूद करून पुर्णतः नाकारील . या साठी प्रत्येकं अर्जदाराने या प्रणालीवर मोबाईल नंबर देवून नोंदणी करणे आवश्यक आहे.
ई हक्क ही प्रणाली ई फेरफार प्रणालीला पूरक असून त्यामधून केलेले सर्व अर्ज तलाठी यांना ई फेरफार मध्ये FETCH करून फेरफार मध्ये रुपांतरीत करता येणार आहेत त्यासाठी ही प्रणाली ई फेरफार प्रणाली शी संलग्न करणेत आलेली आहे .
याच प्रणाली मध्ये माहिती भरून तलाठी देखील फेरफार घेणार आहेत त्यामुळे ऑनलाईन अर्ज आल्यास तलाठ्याला पुन्हा डेटा एन्ट्री करावी लागणार नाही पर्यायाने तलाठी यांना देखील ही प्रणाली सहाय्यभूत ठरणार आहे . वरिष्ठ महसूल अधिकार्यांना देखील अशा सर्व अर्जांचा आढावा घेण्यासाठी MIS करून दिले जाणार आहेत त्यामुळे महसूल प्रशासनामध्ये पारदर्शकता गतिमानता येण्यास आणखी मदत होईल असा विश्वास आहे.
प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी –
सदर प्रणाली ची प्रायोगिक तत्वावर अंमलबजावणी पुणे जिल्ह्यातील मुळशी तालुक्यात करण्यात आली आहे आणि तदनंतर GSDC CLOUD वर स्थानांतरीत केलेला पहिला जिल्हा वाशीम येथे टेस्टिंग पूर्ण झाले असून लवकरच ई फेरफार प्रणाली सर्व जिल्हे CLOUD वर स्थानांतरीत केल्या नंतर पूर्ण राज्यात उपलब्ध करून दिली जाणार आहे .
उद्देश :-
१) कोणत्याही खातेदाराला / संबंधित व्यक्तीला तलाठी कार्यालयाकडे वेगवेगळ्या हक्काच्या नोंदी ७/१२ वर फेरफार च्या स्वरुपात घेण्यासाठी जे अर्ज करावे लागतात ते अर्ज ऑनलाईन पद्धतीने तलाठी कार्यालयात न जाता घरी बसून दाखल करता यावेत .
२) अर्जदाराला आपल्या अर्जांची स्थिती प्रत्येक टप्प्यावर तपासता यावी.
३) याच प्रणाली मध्ये माहिती भरून तलाठी देखील फेरफार घेणार आहेत त्यामुळे ऑनलाईन अर्ज आल्यास तलाठ्याला पुन्हा डेटा एन्ट्री करावी लागणार नाही पर्यायाने तलाठी यांना देखील ही प्रणाली सहाय्यभूत ठरणार आहे .
४) वरिष्ठ महसूल अधिकार्यांना देखील अशा सर्व अर्जांचा आढावा घेण्यासाठी MIS करून दिले जाणार आहेत त्यामुळे महसूल प्रशासनामध्ये पारदर्शकता गतिमानता येण्यास आणखी मदत होईल.
ई-हक्क प्रणालीत समाविष्ट फेरफार प्रकार-
सध्या पहिल्या टप्प्यात पुढील आठ प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे फेरफार प्रकार उपलब्ध करण्यात आलेले आहेत.
१. वारस नोंद
२. बोजा दाखल करणे
३. बोजा कमी करणे
४. ई करार नोंदी
५. मयताचे नाव कमी करणे
६. अज्ञानपालनकर्ता चे नाव ( अपाक ) कमी करणे
७. एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे
८. विश्वास्थांचे नाव कमी करणे
Website-
https://pdeigr.maharashtra.gov.in/frmLogin.aspx
लोगिन :-
— खातेदार/नागरिकांसाठी –
उक्त website मध्ये जावून नवीन वापरकर्ता नोंदणी हा पर्याय वापरून नोंदणी करावी त्यानुसार आपला Userid आणि Password तयार करावा .
— तलाठी यांच्या साठी -
Comments