रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

अहवाल १ मधील प्रतिबंधित सातबारा बाबत महत्वाची सूचना

नमस्कार मित्रांनो ,
             अहवाल १ मधील प्रतिबंधित सातबारा बाबत महत्वाची सूचना



सातबारा संगणकीकरणात अत्यंत महत्वाच्या असलेल्या DETA CLEANING साठी आवश्यक केलेल्या अहवाल १ ते १४ पैकी अहवाल १ व ३ ला अनेक वेळा आपण सवलत दिली होती मात्र त्यामुळे एडीट री एडीट या सुविधा मध्ये देखील आपण अहवाल १ व ३ कडे दुर्लक्ष केले आहे त्यातील अहवाल १ हा अत्यंत महत्वाचा असल्याने त्यातील दुरुस्त्या त्यासाठी असलेल्या सुविधा वापरून करणे आवश्यक आहे ही सर्व कार्यवाही करण्यासाठी तहसीलदार यांचे कडील कलम १५५ अथवा उप विभागीय अधिकारी यांचे कडील कलम २५७ अंतर्गत आदेशाची गरज लागते त्यासाठी काही वेळा सर्व संबंधित यांची  सुनावणी घ्यावी लागते तथापि असे अहवाल १ मधील सर्व  ७/१२ प्रतिबंधित केलेले काम करताना तलाठी यांना व समान्य जनतेला देखील अनंत अडचणीचा सामना करावा लागत होता ह्याचा विचार करून हा प्रतिबंध ३ महिन्यासाठी उठवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे त्यामुळे उद्या दि ६.६.२०१९ पासून
१. अहवाल १ मधील दुय्यम निबंधक यांचे कडे दस्त नोंदणी करणे शक्य होणार आहे
२. तलाठी स्थरावरील नोंदणीकृत , अ नोंदणीकृत व कलम १५५ चे फेरफार घेता येतील .

     मात्र ही सवलत तीनच महिने राहील
दरम्यानच्या काळात सर्व तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांनी अहवाल १ मधील ७/१२ चा आढावा घेवून दुरुस्त्या करण्यासाठी सर्व कार्यवाही ( क १५५ अथवा क २५७ प्रंमाणे ) पूर्ण करावी त्यासाठी ODC मधून तालुका समरी अहवाल पहावा त्यामध्ये गाव निहाय करावयाचे कामाचा अंदाज येईल .

आपला

रामदास जगताप
दि ५.६.२०१९ 

Comments

  1. सर अद्याप अहवाल 1 मधील गटावर नोंदी चालू झालेल्या नाहीत

    ReplyDelete
  2. This comment has been removed by the author.

    ReplyDelete
  3. मा...

    श्री रामदास जगताप सर..
    उपजिल्हाधिकारीसो पुणे विभाग,
    महाराष्ट्र.

    गट ब्लॉक मुळे सामान्य माणसाला सामोरे जावे लागत असलेल्या अडचणींना समजावून घेऊन एक उत्तम प्रशासकीय अधिकारी म्हणून तुम्ही उचललेले हे पाऊल खरंच खूप कोतुकास्पद आहे.. म्हणून सर तुमचे मनःपूर्वक खूप खूप आभार...

    प्रीती पटवा
    इचलकरंजी

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send