रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई हक्क प्रणालीतून फेरफार घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज घेण्याबाबत


प्रति, 
    उप जिल्हाधिकारी तथा डिस्ट्रीक डोमेन एक्सपर्ट (डी.डी.)  (सर्व)
       
विषय ई हक्क प्रणालीतून फेरफार घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज घेण्याबाबत.

महोदय,


               उपरोक्त विषयाच्या अनुषंगाने कळविणेत येते की,  राज्यातील ३४  जिल्ह्यांतील ई फेरफार प्रकल्पाचे स्थलांतर ESDS SOFTWARE SOLUTIONS PVT.LTD. या GCC CLOUD वर  झाले असल्याने  या  जिल्ह्यांना ई हक्क प्रणाली (PDE) द्वारे  आठ प्रकारचे फेरफार घेण्यासाठी तलाठी कार्यालयात ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.  जिल्ह्यातील कोणत्याही खातेदाराला पुढील  ८ फेरफार घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज दाखल करता येतील.
. वारस नोंद, 
. बोजा  दाखल करणे
. बोजा कमी करणे,
करार नोंदी,
. मयताचे नाव कमी करणे,  
. अज्ञानपालनकर्ता चे नाव ( अपाक ) कमी करणे
 . एकत्र कुटुंब पुढारी / म्यानेजर ( एकुम्या ) कमी करणे व
. विश्वास्थांचे नाव कमी करणे.
                           हे प्रकारचे फेरफार घेण्यासाठीचे अर्ज संबंधित खातेदार अथवा संबंधित व्यक्तीला ई-हक्क प्रणालीतून ऑनलाईन पद्धतीने दाखल करता येतील. सध्या ही सुविधा जनतेला उपलब्ध करून दिलेली नाही. तथापि तलाठी यांनी आपल्याकडे आलेले हस्तलिखित अर्ज https://pdeigr.maharashtra.gov.in या वेबसाईट वर लॉगीन करून आपल्या कडे उपलब्ध असलेले फेरफार अर्जांवर कार्यवाही करून पहावी. अश्या पद्धतीने घेणेत आलेले अर्ज तलाठी यांना ई-फेरफार प्रणाली मध्ये PDE DASHBOARD मध्ये पुढील कार्यवाहीसाठी उपलब्ध होईल. तलाठी स्तरावर संबधित अर्जावर यशस्वी कार्यवाही झाल्यावर सदर प्रणाली जनतेला उपलब्ध करून देण्यात येणार आहे. करीता संबधित तलाठी यांनी उक्त 8 ही फेरफार प्रकरांवर ई हक्क ( PDE) प्रणाली मध्ये कार्यवाही करून त्याचा Fedback सादर करावा.
      या संकेत स्थळावर अर्ज दाखल करण्यासाठी क्लाऊड वर लॉगीन होण्याची गरज नाही . OTP व पासवर्ड या साठी लागणार नाही . तलाठी यांना आपले सेवार्थ आय डी व नेहमीचे ई फेरफार प्रणाली चे पासवर्ड वापरून अर्ज भारता येतील तसेच अर्जदाराने जोडलेली कागदपत्रे देखील अपलोड करता येतील . अशा पद्धतीने आलेले अर्ज तपासून ते योग्य व कायदेशीर असल्यास तहठी यांना ते ऑनलाईन स्वीकारता येतील अथवा करणे देवून पुन्हा अर्जदाराला ऑनलाईन दुरुस्ती साठी पाठवता येतील .
ई हक्क प्रणालीसाठी https://pdeigr.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर लॉगीन केलेनंतर ७/१२ फेरफार हा पर्याय निवडावा . या परानालीच्या यशस्वी टेस्टिंग नंतर हे सुविधा जनतेला उपलब्ध करून दिली जाईल त्यानंतर डेटाएन्ट्री चा  तलाठीयांचेवरील मोठा ताण कमी होण्यास मदत होईल . किमान ई करार व बोज्याच्या नोंदी साठी हि सुविधा सोसायटी बँक यांना वापरता येईल . या प्रणाली चा वापर करून  बाबर सर्व डी डी ई यांनी आपले अभिप्राय कळवावेत हि विनंती
सोबत-user manual.


                                                              आपला स्नेहांकित


(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे

Comments

  1. Sir State bank of india bankewale DDM madhil challan chi Rakkam bharun ghet nahi te sangatat ki sadar account la Pan no. Ani no.16 attached nasalyamule account la jama karata yet nahi.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send