संगणकीकृत 7/12 उतारे व खाते उताऱ्यांच्या अनधिकृत वापरा बाबत.
क्रमांक/रा.भू.4/महाभूलेख 7/12/2019
जमाबंदी
आयुक्त आणि संचालक भूमि
अभिलेख,
(म.राज्य) पुणे यांचे
कार्यालय,
पुणे, दिनांक 19 /06/2019
विषय- संगणकीकृत
7/12 उतारे व खाते उताऱ्यांच्या अनधिकृत वापरा बाबत.
परिपत्रक-
केंद्र
शासन पुरूस्कृत डिजिटल इंडिया भूमि
अभिलेखांचे आधुनिकीकरण कार्यक्रम (DILRMP) अंतर्गत
राज्य शासनाने अधिकार अभिलेखांचे डिजीटायझेन करण्यासाठी ई-महाभूमि
प्रकल्प व्यवस्थापक संस्था जमाबंदी आयुक्त
आणि संचालक भूमि (म.राज्य) पुणे यांचे अध्यक्षतेखाली स्थापन केली आहे. या
संस्थेच्या माध्यमातून महसुल विभागातील विविध सेवांचे डिजीटायझेन करण्यात येत आहे.
त्यापैकी एक असलेल्या ई-फेरफार प्रकल्पाअंतर्गत
राज्यातील सर्व अधिकार अभिलेखांचे संगणकीकरण करणेत आले असून, हे अभिलेख जनतेला माहितीसाठी महाभूलेख संकेतस्थळावरून (https://
mahabulekh. maharashtra.gov.in) उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
सध्या या प्रकल्पाचे स्थलांतर क्लाऊडवर करण्यात आले असलेने महाभूमि
संकेतस्थळावरून (https://bhulekh.mahabhumi .gov.in) उपलब्ध
करून देण्यात येत आहेत.
महाभूमि/महाभूलेख संकेतस्थळावरून उपलब्ध करून देण्यात आलेले
विनास्वाक्षरीत 7/12 व 8अ (खाते उतारे ) जनतेला फक्त माहितीसाठी उपलब्ध करून
देण्यात आले असून, ते कोणत्याही कायदेशीर अथवा शासकिय
कामासाठी ग्राहय धरले जाणार नाहीत, असे स्पष्ट सुचना त्यावर
देण्यात आली आहे. तथापि असे असताना काही सेतू, महा-ईसेवाकेंद्र अथवा संग्राम केंद्र चालक या माहितीसाठीच्या 7/12 व
खातेउतारा प्रिंट करून त्यावर स्वता:चा सही शिक्का करून
विक्री करत असल्याचे निदर्शनास येत आहे. व काही बँका ,
सोसायटी ,संस्था व दुय्यम निबंधक स्थरावर हे अभिलेख ग्राहय मानून
व्यवहार/कामे करत असल्याचे दिसुन येते. हे पुर्णता: अयोग्य व बेकायदेशीर असल्याचे
खालीलप्रमाणे सुचना निर्गमित करणेत येत आहेत.
1. महाभूलेख/महाभूमि संकेतस्थळावरून
गावनमुना 7/12 व 8अ (ज्या 7/12 व 8अ वर View only watermark असेल
) ची माहिती फक्त माहितीसाठी असून त्याची प्रिटंआऊट कोणत्याही शासकिय अथवा
कायदेशीर कामासाठी ग्राहय मानण्यात येणार नाही.
2. कोणताही सेतूचालक, महाईसेवाकेंद्र अथवा
संग्राम केंद्र चालक अथवा अन्य व्यक्ती
महाभूलेख/महाभूमि संकेतस्थळावरून गावनमुना 7/12
व 8अ सही शिक्का करून वितरीत करणार नाही.
असे केल्याचे निदर्शनास आल्यास संबधित तहसिलदार यांनी त्याबाबत
रितसर चौकशी करून जिल्हाधिकारी यांचे कडे प्रस्ताव सादर करावा व जिल्हाधिकारी यांनी
अशा व्यक्ती/संस्था /केंद्र चालका
विरूध्द तात्काळ कायदेशीर कारवाई करावी.
3. कोणत्याही व्यक्ती/संस्था/कार्यालयाकडे प्राप्त संगणकीकृत अधिकार अभिलेखाच्या प्रती वरील माहितीची
सत्यता महाभूलेख/महाभूमि या संकेतस्थळावरून ऑनलाईन करता येईल.
4. कोणत्याही
कायदेशीर अथवा शासकिय कामासाठी उपयोगात येणाऱ्या डिजीटल स्वाक्षरीत 7/12 ची पडताळणी https:// aapleabhilekh.mahabhumi.gov.in/satabara या संकेतस्थळावर 7/12 वर छापलेल्या सांकेतांक क्रमांक वरून करता येईल.
आपल्या जिल्हयात वरील परिपत्रकाची
अंमलबजावणी होत आहे का? हयाची खात्री जिल्हाधिकारी यांनी करावी.
(स्थळ प्रतिवर मा. जमाबंदी
आयुक्त आणि संचालक (दादाभाऊ
तळपे )
भुमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांची स्वाक्षरी असे) उपसंचालक भूमि अभिलेख संलग्न
जमाबंदी
आयुक्त (रा.भू.अ.आ.का) पुणे
प्रत- मा. अप्पर मुख्य सचिव, (महसुल ल-1) महसुल, मुद्रांक शुल्क व नोंदणी, महसुल व वन विभाग,
मुंबई यांना माहितीस्तव.
प्रत- नोंदणी
महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक (म.राज्य)
पुणे यांना माहितीस्तव.
प्रत- विभागीय आयुक्त (सर्व)
प्रत- जिल्हाधिकारी (सर्व)
प्रत- उपसंचालक भूमि
अभिलेख (सर्व)
प्रत-उपमहानिरीक्षक (नोंदणी व मुद्रांक) यांना माहितीस्तव
प्रत- जिल्हा अधीक्षक
भूमि अभिलेख (सर्व)
प्रत- उपविभागीय अधिकारी
(सर्व)
प्रत- सह जिल्हा निंबधक (सर्व)
प्रत- तहसिलदार (सर्व)
प्रत-उप अधीक्षक भूमि
अभिलेख (सर्व)
प्रत-सह दुय्यम निंबधक/दुय्यम निबंधक (सर्व)
Comments