दि. १८ जून ,२०१९ पासून उपलब्ध होणाऱ्या सुविधा
नमस्कार मित्रांनो ,
ई फेरफार व user creation व ODC मध्ये दि.१८ जून ,२०१९ पासून उपलब्ध होणाऱ्या सुविधा
१. ज्या ठिकाणी नमुना ७ मधील एकूण क्षेत्र हे.आर .मध्ये नमूद केले आहे व खातेदारांचे नावासमोरील क्षेत्र चौ .मी. मध्ये नमूद केले आहे त्यातील दुरुस्ती साठी नवीन एक नवीन फेरफार प्रकार विकाशित करणेत आला आहे .अशी उदाहरणे पुणे , सोलापूर अहमदनगर नाशिक अशा शहरी भागालगत च्या गावात दिसून येतात .
२. कजाप , फाळणी बारा , बिनशेती आदेश इ. मुले मूळ जुना ७/१२ बंद करून नवीन पोट हिस्स्याचे ७/१२ तयार करणेची दिलेल्या सुविधे मध्ये ईतर हक्कातील नोंदी फेरफार मंजुरी नंतर न दिसण्याची अडचण आता दूर करणेत आली आहे .
३. तलाठी यांनी करावयाची चूक दुरुस्ती या कलम १५५ अंतर्गत दुरुस्ती सुविधेमध्ये केलेले काम युजर क्रिएशन (UC) मध्ये तहसीलदार यांना मान्यतेसाठी दिसत नव्हते त्यात सुधारणा करणेत आली असून ते आता मान्यतेसाठी तहसीलदार यांना दिसेल तसेच तहसीलदार यांचा DASHBOARD ला पेज निहाय ओपन करणेची सोय दिली आहे .
४. अपाक खाते कमी करण्याच्या फेरफार मध्ये फेरफार घेताना Primary Key violation error येत होता तो आता येणार नाही .
५. Windows-7 Ultimate version साठी चालणारे व सर्वांना उपयुक्त ठरणारे New Activex Component विकसित करून डाउनलोड साठी उपलब्ध करून दिले आहे . त्याचां वापर करून बार्शी तालुक्यात न ओपन होणारे ७/१२ ओपन होत ६. अहवाल १ मध्ये असलेल्या ७/१२ वर अनोंदणीकृत मधून खरेदी , वारस , बोजा हे फेरफार घेण्याची व दुय्यम निबंधक यांना दस्त नोंदणी साठी उपलब्ध करून देण्यात आली आहे .
७. तक्रार नोंदी मध्ये प्रलंबित फेरफार मध्ये समाविष्ट सर्वे नं. वर दस्त प्रलंबित असला तरी त्या नंतर नोंदणी झालेल्या दस्त क्रमांकाचा फेरफार तयार करता येईल ( फक्त एव्हड्यासाठी FIFO क्षिथिल करणेत आला आहे )
८. खाता दुरुस्ती व चूक दुरुस्ती फेरफार मधील परिशिष्ट क कायम स्वरूपी पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला आहे .
९. कलम १५५ च्या दुरुस्ती सुविधे मध्ये एकक योग्य असल्यास फक्त क्षेत्र दुरुस्त करायचे असल्यास तसे आता करता येईल . ( या पूर्वी अशी सोय नव्हती )
१० काही ७/१२ वर फक्त पोट खराब क्षेत्र असून ते देखील खातेदारांचे नावासमोर विभागले गेले नसलेल्या ७/१२ वर क्षेत्र अवास्तव असले तरी असे मोठे ७/१२ प्रतीबंधीत अह्वालामध्ये दिसत नव्हते व असे ७/१२ तहसीलदार यांना मान्यतेसाठी उपलब्ध होत नव्हते आत्ता अशा ७/१२ ना तहसीलदार यांना मान्यता देता येईल
११. एका सर्वे नं एकाच खाते व ते देखील कंस झालेले असल्यास आदेश फेरफार मधून दुरुस्त करताना DBNULL error,येत होता तो आत्ता येणार नाही .
१२. आदला बदली फेरफार मध्ये देणाऱ्याच्या नावात स्पेस तयार झाल्याने येणारा एरर आत्ता येणार नाही .
१३. फेरफार मंजूर केल्यानंतर दिसणारा ७/१२ काही ठिकाणी ब्लांक दिसत होता ती अडचण दूर केली आहे .
१४ . चालू वर्षासाठी कोणत्याही हंगामातील एक पिक नोंद नमुना १२ मध्ये घेतली असली तरी फेज २ झालेल्या क्रॉप डेटाबेस मध्ये ODC अहवाल १४ व २३ तयार होणार
१५. अभिलेख वितरण प्रणाली तून (DDM) आत्ता बंद केलेले ७/१२ चे उतारे देखील वितरीत करता येतील .
१६. क्लाऊड वर स्थलांतरीत झाल्या नंतर आपली चावडी ही प्रणाली सुरु करणेत आली आहे .
१७. ODC मधील जुने तालुका समरी अहवाल कडून एकाच तालुका समरी अहवाल १ ते ४१ साठी दिला आहे त्या मुळे त्यात एकूण त्रुटी तत्काळ लक्षात येतील .
कृपया वापरून FEEDBACK द्यावा
आपला
रामदास जगताप
दि १७.६.२०१९
1
Ok sir
ReplyDeleteI will check and reply
ReplyDeleteOK SIR
ReplyDeleteसर अहवाल 1 ची अट शिथिल केलेली आहे .पण त्या गटावर नोंद घेता येत नाही.अहवाल 1 साठी किती क्षेत्राचा फरक असेल तर नोंद होते कारण माझ्याकडील 7/12मध्ये 0.32आर क्षेत्राचा फरक आहे कृपया मार्गदर्शन करावे
ReplyDeleteODC मधील अहवाल 8 मध्ये दुरुस्ती होत नाही.
ReplyDelete