क्लाऊड वर स्थलांतरीत झालेल्या जिल्ह्यांनी लक्षात घ्यावयाच्या महत्वाच्या बाबी
नमस्कार मित्रांनो ,
क्लाऊड वर स्थलांतरीत झालेल्या जिल्ह्यांनी लक्षात घ्यावयाच्या महत्वाच्या बाबी
१. फोर्टीक्लायंट या
vpn ऐवजी enlightclod.com ही प्रायव्हेट URL वापरूर लॉगीन करावे लागते त्यासाठी
स्वतःचा चालू ई मेल आय डी व अचूक मोबाईल
नंबर user creation मध्ये अपडेट करणे आवश्यक आहे .
२. स्वताचा ई मेल हा
(उजर आय डी वापरावा ) पासवर्ड व मोबाईल व
मेल वर पाठविलेला OTP वापरून प्रत्येक वापरकर्ते यांना प्रायव्हेट URL वर लॉगीन
करावे लागते .
३. OTP दोन तासासाठी
वैध असेल मात्र प्रत्येक लॉगीन साठी पुन्हा OTP घ्यावा लागेल .
४. आपल्या जिल्ह्यासाठी
दिलेली URL वापरून लॉगीन करावे
५. LANDING PAGE वर
दिलेले MODULE निवडून त्यानंतर आपले नेहमीचे सेवार्थ आय डी व नेहमीचे पासवर्ड
वापरून MODULE मध्ये लॉगीन करता येईल .
६. एखाद्या MODULE लॉग
आउट झाल्या नंतर तेथे सर्व आज्ञावली साठी लॉगीन हा पर्याय वापरून दुसरे MODULE
निवडता येईल .जो पर्यंत प्रायव्हेट URL वरून LOGOUT होत नाही तो पर्यंत पुन्हा OTP
घेण्याची गरज नाही .
१. डी.बी.ए. लॉगीन साठी
DSC आवश्यक –
ई फेरफार प्रकल्पातील ई फेरफार ,
OCU, USER CREATION इत्यादी MODULE मध्ये क्लाऊडवर काम करण्यासाठी DSC आवश्यक आहे
त्यासाठी डी.बी.ए. यांना DSC नसल्यास कार्यालयीन खर्चातून नवीन DSC घेण्यात यावी व
तहसीलदार यांचे लॉगीन ने डी बी ए यांची DSC ची नोंदणी USER CREATION मधून करावी .
त्यानंतरच डी बी ए यांना काम करता येईल ह्याची नोंद घ्यावी .
२. दुय्यम निबंधक
कार्यालयाकडून (SRO) नोंदणीकृत झालेल्या दस्तांना फेरफार क्रमांक तत्काळ देणे
बाबत-
महारष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६
कलम १४९ व १५४ मधील तरतुदी नुसार दुय्यम निबंधक कार्यालयाकडून (SRO) नोंदणीकृत
झालेल्या दस्तांना फेरफार घेण्यासाठी वेगळा अर्ज महसूल अधिकारी यांचे कडे करण्याची
आवश्यकता नाही ह्याचा विचार करून शासनाने अश्या पद्धतीने ऑनलाईन नोंदणीकृत झालेल्या दस्तांची माहिती संबंधित
तलाठ्याकडे ऑनलाईन पद्धतीने प्राप्त होते त्याच वेळी संबंधित तलाठी यांचेकडे या
गावातील चालू फेरफार क्रमांक विचारात घ्रवून त्या नोंदणीकृत दस्ताला तत्काळ फेरफार
क्रमांक नेमून दिला जातो व तो संबंधित तलाठी यांना त्या माहिती सोबत पाठवला जातो .
अश्या पद्धतीने नोंदणीकृत दस्ताला नेमून देण्यात आलेल्या फेरफार क्रमांकाच्या
पुढचा फेरफार क्रमांक पुढील फेरफारासाठी देणेत येतो . त्यामुळे तलाठी यांचे
DASHBOARD ला जम्पिंग फेरफार क्रमांक दिसत असल्यास तलाठी यांनी नोंदणीकृत दस्तांची
माहिती पाहून अश्या प्राप्त दस्तांचे फेरफारामध्ये रुपांतर करणे आवश्यक आहे .
अश्या पद्धतीने ऑनलाईन प्राप्त दस्तांची माहिती अपूर्ण असल्यास तो दस्त नष्ट केला
तरीही तो फेरफार क्रमांक री एन्ट्री साठी तलाठी यांना उपलब्ध राहतील त्याप्रमाणे या काही दस्तांचा तपशील नव्याने
भरून तोच फेरफार क्रमांक योग्य असल्याची खात्री करून साठवता येईल .
३. DATA POSTING बाबत.
मंडळ अधिकारी यांना नोंद प्रमाणित करण्यासाठी लागणार जास्त वेळ वाचविण्यासाठी नोंद प्रमाणीकरण व data पोस्टिंग असे दोन स्वतंत्र क्रिया विकसित करून दिल्या आहेत. प्रमाणीत फेरफारांचा डाटा दुसऱ्या स्वतंत्र डाटाबेसमध्ये स्थलांतरीत करण्याची कार्यवाही DATA POSTING या पर्यायातुन केली जाते. सामान्यत: सोमवार ते शुक्रवार सायंकाळी 6.00 ते 8.00 या कालावधीत व रविवारी DATA POSTING चे काम करता येईल. त्यामुळे फेरफार प्रमाणीकरण चे कामकाज गतीने होईल.
DATA
SIGNING COMPONENT बाबत -
ESDS CLOUD वर स्थलांतरित जिल्ह्यांसाठी DATA SIGNING COMPONENT विकसित केला असून तो आज पासून क्लाऊडवरील सर्व जिल्ह्यांना ई फेरफार च्या लॉगीन पेज वर उपलब्ध करून दिला आहे . (Link is available as "new ActiveX component").
पूर्वीचा activeX component unistall करून या लिंक वरून मिळणारा componant install करावा, laptop restart करा व काम पुन्हा सुरु करा. त्यानंतर पूर्वी प्रमाणे data signing होऊ शकेल.
४. ON DEMAND ७/१२ -
अभिलेख वितरण प्रणाली ( DDM) मधून नकला वितरीत करताना ७/१२ तयार होण्यास काही तांत्रिक कारणाने विलंब होत असल्यास आज नकला मिळण्यासाठी आलेले अर्ज / विनंती प्रमाणे याचं प्रणालीतुन सं न निवडून ७/१२ तयार करण्याची Request पाठविता येईल . असे विनंती केलेले सर्व ७/१२ रात्री तयार करुन आपल्या लाॅगीन ला याच प्रणालीत आपल्याला उपलब्ध होतील ते ओपन करुन प्रिंट करता येतील . तो ७/१२ प्रिंट केल्या शिवाय त्यांवर नक्कल फी आकारणी होणार नाही
सोलापुर व सांगली साठी टेस्टींग ला दिले आहे .

या महत्वाच्या बाबीवर लक्ष देणेत यावे
आपला
रामदास जगताप
Comments