महसुल गावांचे आकारबंद व सर्व गावांचे एकुण भौगोलिक क्षेत्र तहसिलदार यांना कळविणेबाबत.
पुणे. दिनांक:-24/05/2019.
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा
DDE
(सर्व)
अधीक्षक भूमी अभिलेख (सर्व)
विषय:- महसुल गावांचे आकारबंद व सर्व गावांचे एकुण भौगोलिक क्षेत्र
तहसिलदार यांना
कळविणेबाबत.
महोदय,
डिजीटल
इंडिया लँड रेकॉर्ड मॉर्डनायझेशन प्रोग्रॅम ( DILRMP) अंतर्गत 7/12 संगणकीकरणाचा ई-फेरफार प्रकल्प सध्या राज्यभरात कार्यान्वित
आहे. या प्रकल्पामध्ये संगणकीकृत 7/12 च्या डेटा व्हेरिफिकेशन व डेटा व्हॅलिडीटी साठी विविध अहवालांचे आधारे डेटा ची तपासणी केली जाते. प्रत्येक
गावातील गाव नमुना नंबर १ ( आकारबंद) व गाव नमुना नंबर ७ वरील क्षेत्राचा ताळमेळ अहवाल ३ मध्ये घेतला जातो व त्यामध्ये तफावत असल्यास सदरचा गट
नंबर / सर्व्हेनंबर अहवाल - ३ मध्ये दर्शविण्यात
येतो. तथापि अनेक महसूली
गावांचे अद्यावत आकारबंद (गाव नमुना नंबर १ ) तलाठी कार्यालयात उपलब्ध नसल्याने अहवाल - ३ च्या दुरुस्तीसाठी
अडचणी येतात. याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहेत.
१)
उपअधीक्षक भूमि अभिलेख यांनी अद्यावत गाव नमुना नंबर १ ( आकारबंद) ची एक प्रत सर्व
तहसिलदार यांना गरजेप्रमाणे उपलब्ध करुन द्यावी.
२)
उपअधीक्षक भूमि अभिलेख यांनी संबंधित तहसिलदार यांना सर्व
महसूल गावांचे एकूण भौगोलिक क्षेत्र खालील नमुन्यात उपलब्ध करुन द्यावे.
अ.नं.
|
महसूल गावाचे नांव
|
एकुण भौगोलिक क्षेत्र
|
शेरा
|
|
|
|
|
सदरच्या माहितीच्या
आधारे संबंधित तलाठी व नायब तहसिलदार ( डी.बी.ए.) यांनी योग्य त्या नोंदी घेण्याची अथवा दुरुस्तीची कार्यवाही ई-फेरफार
प्रणालीमध्ये करावी. याप्रमाणे कार्यवाही
पुर्ण करुन डीडीई यांनी पुर्तता अहवाल इकडे सादर करावा.
सदरच्या सूचना सर्व वापरकर्ते यांचे निदर्शनास आणाव्यात हि विनंती.
आपला
( रामदास जगताप )
राज्यसमन्वयक, ई-फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त
कार्यालय (म.राज्य) पुणे.
प्रत.
उप आयुक्त (महसूल), विभागीय आयुक्त कार्यालय (सर्व.)
उप विभागीय अधिकारी
( सर्व.)
तहसिलदार ( सर्व.) यांना उचित कार्यवाहीसाठी
उप अधीक्षक भूमि अभिलेख
(सर्व.) यांना उचित कार्यवाहीसाठी रवाना.
आदरणीय सर बरीच गावे अशी आहेत ज्या ठिकाणी आकारबंद व नकाशे उपलब्ध नाही किंवा असल्यास वाचन करण्यासाठी अनाकलनीय आहेत याबाबत आपण पुढाकार घेत आहात त्याबद्दल आभार परंतु अद्याप देखील बरेच सजेतील गावांना आकारबंद अत्यंत जिर्ण अवस्थेत आहेत.
ReplyDelete