रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई फेरफार प्रणालीतील महसूल अधिकारी यांची जबाबदारी.


प्रारुप परिपत्रक

                        विषय :- ई फेरफार प्रणालीतील महसूल अधिकारी यांची जबाबदारी.
             संदर्भ :- जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडील संदर्भ परिपत्रक   क्र.रा.भू.अ.आ.का.४/चावडी वाचन/17
                                      दिनांक- 05/05/2017.

               राज्यात सुरु असलेल्या ई-फेरफार प्रणालीच्या अंमलबजावणीसाठी अचूक 7/12  8 अ जनतेला ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करुन देण्यासाठी संगणकीकृत 7/12 डेटा अचूक असणे अत्यावश्यक आहे.  त्यासाठी घेतलेल्या चावडी वाचनाच्या विशेष मोहिमेनंतर प्राप्त झालेले  तक्रार अर्ज अथवा निदर्शनास आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी रि-एडिट मॉडयुल उपलब्ध करुन देण्यात आले होते. त्यामध्ये संदर्भीय दिनांक 05/05/2017 चे परिपत्रकातील मार्गदर्शक सुचनांप्रमाणे कार्यवाही करणे अपेक्षित होते . या प्रमाणे कार्यवाही करताना प्रत्येक महसूल कर्मचारी व अधिकारी यांची जबाबदारी काय असेल हे निश्चित करून दिले होते .
तलाठी यांची जबाबदारी –
१.        तलाठी यांचेकडे जबाबदारी असलेल्या सर्व महसुली गावांचे चावडी वाचन त्या त्या गावासाठी नियुक्त महसूल पालक अधिकारी यांचे उपस्थित पूर्ण करणे .
२.       री एडीट सुविधेचा वापर करून सर्व दुरुस्त्या पूर्ण झाले नंतर प्रत्येक गावातील सर्व  ७/१२ प्रिंट ची १००% तपासणी करून अचूकते बाबत सर्व ७/१२ स्वाक्षरीत करणे व त्यानंतर घोषणापत्र-१  ( Declaration 1) करणे.
३.       सर्व महसूल अधिकारी यांची निश्चित करून दिलेल्या बिंदूच्या ७/१२ ची तपासणी झाल्यानंतर त्यांचे कडून प्राप्त प्रपत्र १ मधील प्रमाणपत्र नायब तहसिलदार ( D.B.A.) यांना सादर करणे . व तपासणी संचिका तालुका अभिलेख कक्षात जमा करणे .
४.       घोषणापत्र ३ झाल्यानंतर लक्षात आलेल्या त्रुटी किंवा प्राप्त अर्जांचे प्रमाणे दुरुस्ती चे ऑनलाईन प्रस्थाव तहसीलदार यांना सदर करणे .
५.       ज्या प्रकरणी निदर्शनास आलेल्या तृटी हस्तलिखित मंजूर फेरफार / सातबारा मधेच असतील त्यांचे साठी गरजेप्रमाणे तहसीलदार यांना कलम १५५ व उप विभागीय अधिकारी यांना कलम १५७ अन्वये हस्तलिखित प्रस्थाव सादर करणे.
६.       संगणकीकृत ७/१२ च्या अचूकतेची खात्री करून गावातील सर्व ७/१२ डिजिटल स्वाक्षरीत करणे .
७.       अभिलेख वितरण प्रणाली (DDM) मधून वितरीत केलेल्या अभिखांची नक्कल फी  विहित खात्यावर वेळेत जमा करणे व या बाबतचे अभिलेख कायम स्वरूपी जतन करून ठेवणे .
८.       आपल्या प्रत्येक गावातील सर्व हस्थालीखीत ७/१२ संगणकीकृत करून ते अचूक असल्याची खात्री करण्याची जबाबदारी तलाठी यांची राहील .
 मंडळ अधिकारी यांची जबाबदारी –
१.       चावडी वाचनाच्या मोहिमेतील त्रुटी दूर केल्या नंतर प्रत्येक गावातील ३०% ७/१२ च्या प्रिंट तपासून अचूकते बाबत स्वाक्षरीत करणे.
२.       प्रत्येक फेरफार योग्य रित्या घेतला असून प्रत्येक ७/१२ चे पूर्वावलोकन योग्य असल्याची खात्री करून नियमाप्रमाणे फेरफार प्रमाणित करणे .
३.       कलम १५५ चे व २५७ चे हस्तलिखित प्रस्थाव तयार करताना तलाठी यांना मदत व मार्गदर्शन करणे .
४.       ई फेरफार प्रणालीतील सर्व ऑनलाईन  फेरफार ( नोंदणीकृत , अनोंदणीकृत , क.१५५ च्या दुरुस्त्या , खाता दुरुस्त्या , चूक दुरुस्त्या फेरफार ) नियमाप्रमाणे वेळेत विनाविलंब निर्गत करणे ही जबाबदारी मंडळ अधिकारी यांची राहील .
पालक महसूल अधिकारी यांची जबाबदारी –
१.       एका गावासाठी एक नियुक्त केलेल्या अव्वल कारकून यांचे पेक्षा वरिष्ठ असलेल्या महसूल पालक अधिकारी यांना त्या त्या गावच्या चावडी वाचनाच्या कार्यक्रमला उपस्थित राहणे बंधनकारक होते .
२.       पालक महसूल अधिकारी यांनी तपासणी करावयाच्या १ ते २४ मुद्द्याचा अहवाल निवुक्त केलेल्या प्रत्येक गावासाठी सदार करणे .
३.       पालक अधिकारी म्हणून नियुक्त केलेल्या गावात भूधारणा भो. वर्ग २ असलेली जमीन एडीट / री एडीट प्रणालीचा वापर करून अनाधीकारे वर्ग १ मध्ये रुपांतरीत करणेत आलेली नाही ना ? हे पाहण्याची प्रमुख जबाबदारी पालक महसूल अधिकारी यांची राहील .  
नायब तहसीलदार ( डी.बी.ए.) यांची जबाबदारी –
१.       आपल्या तालुक्यात कोणत्याही वापरकर्त्याचे  LOGIN CREDENTIALS बाबत लेखी आदेशां शिवाय बदल करू  नयेत .
२.       पालक महसूल अधिकाऱ्याचा लेखी तपासणी अहवाल पाहून प्रत्येक गावासाठी घोषणापत्र २ करणे .
३.       कलम १५५ अन्वये दुरुस्तीसाठी प्राप्त ऑनलाईन प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांचे अवलोकन करून तहसीलदार यांचे कडून ऑनलाईन मान्यता प्राप्त करून घेणे .
४.       कलम १५५ अन्वये प्राप्त होणे आवश्यक हस्थालीखीत प्रस्थाव व प्रत्येक्ष प्राप्त प्रस्थावांचा आढावा घेणे .
५.       तालुक्यातील सर्व वापरकर्ते यांचे मोबाईल नंबर व ई मेल आय डी  प्रणाली मध्ये अद्यावत करून तालुक्याची साजा व मंडळ निर्मिती ची कार्यवाही करणे .
६.       ODC अहवाल १ ते ४१ निरंक करून सर्व संगणकीकृत ७/१२ चे  अचूकते बाबत खात्री करून सर्व ७/१२ तलाठी यांचे कडून डिजिटल स्वाक्षरीत करून घेणे.
७.       ई फेरफार प्रणालीच्या गुणवत्तापूर्वक कामासाठी तालुक्यातील सर्व गावांचे कामकाजावर नियंत्रण ठेवणे तसेच अभिलेख वितरण प्रणाली (DDM) मधून वितरीत केलेल्या नक्कल फी बाबतचे अभिलेख लेखा परीक्षण होई पर्यंत जतन करून ठेवणे तसेच दि. ३१.१.२०१९ च्या शासन निर्णयाप्रमाणे सर्व तलाठी यांनी नक्कल फी खात्यावर जमा केली किंवा नाही हे पाहण्याची जबाबदारी नायब तहसीलदार ( DBA) यांची राहील .
तहसीलदार यांची जबाबदारी –
१.       ठरवून दिलेल्या सर्व महसूल अधिकाऱ्यांचे ७/१२ तपासणी अहवाल ( प्रपत्र १) प्राप्त झाल्यानंतर व तपासणी संचिका तालुका अभिलेख कक्षात प्राप्त झाल्यानंतर घोषणापत्र ३ करणे .
२.       तालुक्यातील सर्व गावांचे घोषणापत्र ३ झाल्या नंतर तालुक्याचा एकत्रित प्रख्यापण आदेश काढणे .
३.       तलाठी यांचे कडून प्राप्त होणाऱ्या कलम १५५ अन्वये दुरुस्तींच्या ऑनलाईन प्रस्थावांना तत्काळ ऑनलाईन मान्यता देणे.
४.       कलम १५५ च्या मान्यते प्रमाणे तलाठी यांनी  तयार केलेलं परीशिष्ट क मधील आदेश कागदपात्रांची खात्री करून स्वाक्षरीत करून देणे .
५.       सुनावणी घेणे आवश्यक असलेल्या प्रस्थावांचे सुनावणीचे कामकाज पूर्ण करून कलम १५५ अन्वये दुरुस्तीचे आदेश पारित करणे . 
६.       ODC अहवाल १ ते ४१ निरंक करून सर्व संगणकीकृत ७/१२ चे  अचूकते बाबत खात्री करून सर्व ७/१२ तलाठी यांचे कडून डिजिटल स्वाक्षरीत करून घेणे.
७.       प्रतिबंधित सत्ता प्रकाराने धारण केलेल्या जमीन मिळकती चे हस्तांतरासाठी सक्षम अधिकारी यांचा परवानगी आदेश पाहून अथवा हस्तांतरासाठी परवानगीची गरज नाही ह्याची खात्री करून असे ७/१२ हस्तांतरासाठी तात्पुरत्या स्वरुपात प्रतिबंधमुक्त ( UNBLOCK) करणे जबाबदारी तहसीलदार यांची राहील .
उपविभागीय अधिकारी यांची जबाबदारी –
१.       उपविभागीय अधिकारी आपल्या उपविभागातील प्रत्येक महसूल गावाचे सर्व संगणकीकृत 7/12 तलाठी यांनी डिजीटल 7/12 स्वाक्षरीत केल्यानंतर ई-फेरफार प्रणालीच्या USER CREATION MODULE मधुन घोषणापत्र- ४ करेल.
२.       प्रत्येक महसुली गावातील सर्व संगणकीकृत 7/12 डिजीटल स्वाक्षरीत करण्यासाठी तलाठी यांना उपलब्ध करुन देण्यासाठी जसे कीअहवाल-१अहवाल-३अहवाल-५, अहवाल-.क्षेत्र व एकक दुरुस्तीचे अहवाल निरंक करण्यासाठी समन्वयकाची भुमिका उपविभागीय अधिकारी निभावतील. यासाठी गरजेप्रमाणे उपअधीक्षक भूमि अभिलेखनगर भूमापन अधिकारीतहसिलदारदुय्यम निबंधक यांच्या समन्वय बैठका घेतील.
३.       अहवाल - ३ निरंक करण्यासाठी उपअधीक्षक भूमि अभिलेख यांनी संबंधित तलाठी यांना अद्याप गा.न.नं.१ (आकारबंद)उपलब्ध करुन द्यावा. तलाठी यांनी त्याप्रमाणे संगणकीकृत आकारबंद दुरुस्त करुन अहवाल निरंक करावा. ज्याठिकाणी आकारबंद तलाठी यांच्याकडे उपलब्ध नाहीत ते उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी उपअधीक्षक भूमि अभिलेख व जिल्हाअधीक्षक भूमि अभिलेख यांची राहील.
४.       अहवाल -१ व अहवाल -३ निरंक करण्यासाठी मूळ हस्तलिखीत 7/12 मधील काही नोंदी दुरुस्त करणे आवश्यक असल्यास महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 257 अंतर्गत अशा नोंदी पुनर्विलोकनात घेऊन सर्व संबंधितांना सुनावणीची संधी देवुन उपविभागीय अधिकारी योग्य तो निर्णय तातडीने पारीत करतील व त्याप्रमाणे 7/12 दुरुस्त करुन अहवाल दुरुस्त करण्यात यावेत.
५.       अचूक ७/१२ व ८ अ चे कामकाज चालू असताना ऑनलाईन ७/१२ व खाते उताऱ्यातील त्रुटी दूर करण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम १५५ अन्वये दुरुस्त्यांची सुविधा वापरून करावयाची कामाचा कालबद्ध कार्यक्रम आपल्या उप विभागात योग्यरीत्या राबविणेत येत आहे का ? हे पाहणे देखील उपविभागीय अधिकारी यांची जबाबदारी राहील.
६.       तालुक्यातील  ई फेरफार प्रणालीत करण्यात आलेले व करणेत येत असलेले सर्व कामकाज गुणवत्तापूर्वक पूर्ण होत आहे ना ? हे पाहण्याची जबाबदारी  ज्याप्रमाणे तहसीलदार यांची असते त्याप्रमाणे  आपल्या उप विभागात ही जबाबदारी  उप विभागीय अधिकारी यांचेवर सोपविण्यात येत आहे.
उप जिल्हाधिकारी तथा डी डी ई यांची जबाबदारी –
१.       ई फेरफार प्रणाली मध्ये उप विभागीय अधिकारी , तहसीलदार व नायब तहसीलदार (DBA) यांची नोंदणी करणे .
२.       प्रतिबंधित सत्ता प्रकाराने धारण केलेल्या जमीन मिळकती चे हस्तांतरासाठी  झालेले  राज्य , विभाग व जिल्हा स्तःरावरील सक्षम अधिकारी यांचा परवानगी आदेश पाहून असे ७/१२ हस्तांतरासाठी तात्पुरत्या स्वरुपात प्रतिबंधमुक्त ( UNBLOCK) करणे जबाबदारी उप जिल्हाधिकारी तथा डी डी ई यांची जबाबदारी यांची राहील .
३.       जिल्ह्यातील ई फेरफार प्रणालीचे सर्व कामकाज गुणवत्तापूर्ण होत असल्याची जबाबदारी डी डी ई यांची राहील .तसेच हेच ई फेरफार प्रणाली च्या अंमलबजावणी साठी जिल्हा नोडल अधिकारी असतील .
           थोडक्यात ई फेरफार प्रणालीतील अचूक कामकाजासाठी उप विभागीय अधिकारी हे उप विभागासाठी नोडल अधिकारी असतील.
            एकूणच ई फेरफार प्रणाली मध्ये सर्व तलाठी , मंडळ अधिकारी , महसूल पालक अधिकारी , नायब तहसीलदार व उप विभागीय अधिकारी यांनी गुणवत्तापूर्वक कामकाज करणे अपेक्षित आहे. ज्या कर्मचारी / अधिकारी यांनी हे कामकाज गुणवत्तापूर्वक पूर्ण केले असेल त्याबाबत अशा सर्व कर्मचारी / अधिकारी यांचे गोपनीय अहवालामध्ये वस्तुनिष्ठ नोंद घेण्यात यावी तसेच या अत्यंत महत्वाच्या महसुली कामकाजामध्ये दुर्लक्ष करणाऱ्या व निष्काळजीपणा दाखविणाऱ्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचे गोपनीय अहवालामध्ये यथोचित नोंदी घेण्यात याव्यात.

          या परिपत्रकाची अंमलबजावणी होते कि नाही ? ह्याचा जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त वेळोवेळी आढावा घेतील.
         

                                                           
 आपला 
रामदास जगताप 
दि २८.४.२०१९ 

Comments

Archive

Contact Form

Send