सातारा जिल्हा ठरला क्लाऊडवर जाणारा चौथा जिल्हा - अभिनंदन टीम सातारा !
नमस्कार मित्रांनो ,
सातारा जिल्हा आज दि २७ .३.२०१९ सकाळी ११ .०० वाजता GCC -ESDS CLOUD वर LIVE झाला आज पासून सर्व तलाठी व मंडळ अधिकारी cloud वर काम करू शकतील .
सातारा जिल्ह्यातील सर्व वापरकर्ते आज पासून खालील प्रायवेट URL वापरता येईल
https://mahaferfar.enlightcloud.com
ही URL वापरून " ई फेरफार" प्रणालीत VPN / FORTICLIENT न वापरता काम करू शकणार आहात .
या साठी डी डी ई सातारा यांचे मेल वर दि २६ .३.२०१९ रोजी पाठवलेले वापर्कार्त्यांचे पासवर्ड वापरून व मोबाईलवर येणारा OTP वापरून लॉगीन करू शकतो , त्या नंतर तलाठी मंडळ अधिकारी यांना दिसणारी eferfar2beta ही url वापरून व आपले नेहमीचे सेवार्थ आय डी व पासवर्ड आणि DSC वापरून ई फेरफार प्रणाली च्या LANDING PAGE वर लॉगीन करू शकता . त्यानंतर ई फेरफार मोडूल निवडून काम सुरु करू शकता .
आज पासून फक्त ई फेरफार व DDM मधेच काम करता येईल त्या नंतर लवकरच OCU ,ODC , ODBATOOL , UC , OCU_BACKLOG ,RE EDIT , PDE / ई हक्क इत्यादी मोडूल्स कामकाजासाठी उपलब्ध होतील .
सुरुवातीला काही अडचणी येवू शकतात त्या तत्काळ मास्टर ट्रेनर्स , हेल्प डेस्क , DBA , DIO यांचे निदर्शनास आणाव्यात .
सातारा जिल्ह्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी रात्रीचा दिवस करून केलेलं ७/१२ संगणकीकरण चे काम आता प्रत्यक्षात अधिक चागली सेवा राज्यातील जनतेला देण्यासाठी फलद्रूप झालेले दिसेल अशी अपेक्षा आहे .
सातारा जिल्हा राज्यातील क्लावूड वर जाणारा चौथा जिल्हा ठरला आहे सबब
RDC & DDE सातारा श्री . सुनील थोरवे साहेब , तांत्रिक सहाय्यक इक्बाल शेख , तहसीलदार तसेच NIC PUNE TEAM , MY HELP DESK TEAM व जिल्हाधिकारी व अप्पर जिल्हाधिकारी सातारा यांचे मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद .
GCC CLOUD MIGRATION नंतर सातारा मधील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना होणारा मानसिक त्रास निश्चित कमी होईल असा मला विश्वास आहे .
राज्यातील सामान्य जनतेला एक चांगली सुविधा देण्यासाठी च्या महसूल विभागाच्या या प्रकल्पासाठी आपले योगदान देणाऱ्या माझ्या सर्व सहकारी महसूल अधिकारी , DIO , सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना मनपूर्वक धन्यवाद .
आपला
रामदास जगताप
दि २७ .३.२०१९
धन्यवाद सर..
ReplyDeleteKindly Provide Details of document Require online Heir record Application.
ReplyDeletePlease do the needful.