महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेला स्वीय प्रपंजी लेखा खाते (PLA) उघडण्यास शासनाची मान्यता
नमस्कार मित्रांनो ,
महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेला स्वीय प्रपंजी लेखा खाते (PLA) उघडण्यास मान्यता
ई फेरफार प्रकल्पासह महसूल विभागाच्या सर्व डिजिटल सेवा सुविधांसाठी चालू असलेल्या व नव्याने विकसित होणाऱ्या संगणकीकृत प्रणाली ( SOFTWARE) च्या विकसन देखभाल व दुरुस्ती ( DEVELOPMENT , MENTAINANCE AND SUPPORT) साठी महाभूमी प्रकल्प व्यवस्थापन संस्थेला सक्षम करण्यासाठी जमाबंदी आयुक्त कार्यालयात स्वीय प्रपंजी लेखा खाते (PLA) उघडण्यास आज शासनाने मान्यता दिली .
अनेक दिवस या साठी प्रयत्न , पाठपुरावा व आग्रह आज फलद्रूप झाला ह्याचा मनस्वी आनंद होत आहे . आता यापुढे वित्तीय तरतुदी ची वाट न पाहता महसूल विभागाच्या अनेक विध ई प्रकल्पांना चालना मिळेल अशी अपेक्षा आहे .
आपला
रामदास जगताप
दि २६.३.२०१९
Comments