रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

सातारा जिल्हा ठरला क्लाऊडवर जाणारा चौथा जिल्हा - अभिनंदन टीम सातारा !


नमस्कार मित्रांनो , 

सातारा जिल्हा आज दि २७ .३.२०१९  सकाळी ११ .००  वाजता GCC -ESDS CLOUD वर LIVE झाला आज पासून सर्व तलाठी व मंडळ अधिकारी cloud वर काम करू शकतील  .



       सातारा  जिल्ह्यातील सर्व वापरकर्ते  आज पासून खालील प्रायवेट URL वापरता येईल 
https://mahaferfar.enlightcloud.com 

  ही URL  वापरून " ई फेरफार" प्रणालीत VPN / FORTICLIENT न वापरता काम करू शकणार आहात . 
या साठी डी डी ई सातारा  यांचे मेल वर दि २६ .३.२०१९ रोजी पाठवलेले वापर्कार्त्यांचे पासवर्ड वापरून व मोबाईलवर येणारा OTP वापरून लॉगीन करू शकतो , त्या नंतर तलाठी मंडळ अधिकारी यांना दिसणारी eferfar2beta ही url वापरून व आपले नेहमीचे सेवार्थ आय डी व पासवर्ड आणि DSC वापरून ई फेरफार प्रणाली च्या LANDING PAGE वर लॉगीन करू शकता . त्यानंतर ई फेरफार मोडूल निवडून काम सुरु करू शकता . 
 आज पासून  फक्त ई फेरफार  व DDM मधेच काम करता येईल त्या नंतर लवकरच OCU ,ODC , ODBATOOL , UC , OCU_BACKLOG ,RE EDIT , PDE / ई हक्क  इत्यादी मोडूल्स कामकाजासाठी उपलब्ध होतील . 

सुरुवातीला काही अडचणी येवू शकतात त्या तत्काळ मास्टर ट्रेनर्स , हेल्प डेस्क , DBA , DIO यांचे निदर्शनास आणाव्यात . 


सातारा जिल्ह्यातील  सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी रात्रीचा दिवस करून केलेलं ७/१२ संगणकीकरण चे काम आता प्रत्यक्षात अधिक चागली सेवा राज्यातील जनतेला देण्यासाठी फलद्रूप झालेले दिसेल अशी अपेक्षा आहे . 

           सातारा   जिल्हा राज्यातील क्लावूड वर जाणारा चौथा  जिल्हा ठरला आहे सबब 
RDC & DDE सातारा  श्री . सुनील थोरवे   साहेब , तांत्रिक सहाय्यक इक्बाल शेख ,      तहसीलदार  तसेच  NIC PUNE TEAM , MY HELP DESK TEAM व जिल्हाधिकारी  व अप्पर जिल्हाधिकारी सातारा  यांचे मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद .


   GCC CLOUD MIGRATION नंतर सातारा मधील  सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना होणारा मानसिक त्रास निश्चित कमी होईल असा मला विश्वास  आहे . 

         राज्यातील सामान्य जनतेला एक चांगली सुविधा देण्यासाठी च्या महसूल विभागाच्या या प्रकल्पासाठी  आपले योगदान देणाऱ्या माझ्या सर्व सहकारी महसूल अधिकारी , DIO , सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना मनपूर्वक धन्यवाद . 





आपला 

रामदास जगताप 
दि २७ .३.२०१९

Comments

  1. धन्यवाद सर..

    ReplyDelete
  2. Kindly Provide Details of document Require online Heir record Application.
    Please do the needful.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send