वाडी विभाजन करुन महसूली गांव निर्मीतीच्या सुविधेबाबत.स्मरणपत्र १ दि २७.११.२०१८
स्मरणपत्र-१ मा. जमाबंदी आयुक्त आणि
संचालक भूमी अभिलेख (महाराष्ट्र
राज्य ) पुणे यांचे कार्यालय
ई-फेरफार/क्र/रा.स./कावि/ 80/२०१8
दिनांक:- 27/11/२०१8.
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई (सर्व)
विषय - ई-फेरफार आज्ञावलीची अंमलबजावणी.
वाडी विभाजन करुन महसूली गांव निर्मीतीच्या सुविधेबाबत.
संदर्भ - १. या कार्यालयाकडील क्र.रा.भू.अ.आ.का.४/ई-म्युटेशन/2015 दिनांक 29/12/2015 चे पत्र.
2.या कार्यालयाकडील क्र.रा.भू.अ.आ.का.४/वाडी विभाजन/2017दिनांक 27/03/2017 चे पत्र.
3. या कार्यालयाकडील क्र.रा.स./का.वि/34/2018दिनांक 17/03/2018 चे पत्र.
4. या कार्यालयाकडील क्र.रा.स./का.वि/41/2018दिनांक 12/04/2018 चे पत्र.
महोदय,
DILRMP अंतर्गत ई-फेरफार आज्ञावलीच्या अंमलबजावणी मधील वाडी विभाजनाने तयार झालेल्या नविन महसुल गावाबाबत करावयाची कार्यवाही हा देखील महत्वाचा घटक आहे. याबाबत उपरोक्त संदर्भीय पत्रान्वये वेळोवेळी सुचना देण्यात आल्या आहेत. दिनांक 27/03/2018 च्या पत्रात नमुद केलेल्या दोन्ही प्रकारच्या वाडी विभाजन करावयाच्या गावांची यादी अद्याप या कार्यालयाकडे प्राप्त झालेली नाही. आपल्या प्रत्येक तालुक्यात सध्या अस्तित्वात असलेल्या एकुण महसुली गावांपैकी काही महसुली गांवाचे अधिकार अभिलेख ऑनलाईन पध्दतीने अद्यापही उपलब्ध नाहीत. त्यामुळे ऑनलाईन दस्त नोंदणी अथवा ई-फेरफारची कार्यवाही करता येत नाही. अश स्वरुपाच्या काही तक्रारी इकडे प्राप्त होत आहेत. त्यासाठी प्रत्येक तहसिलदार यांनी आपल्या तालुक्यातील सर्व महसुली गावांचा आढावा उपअधीक्षक भूमी अभिलेख व दुय्यम निबंधक यांचेशी घेवुन किती गावांची वाडी विभाजन प्रक्रिया अद्याप झालेली नाही याची माहिती संकलित करावी तसेच शासनाने सजा पुनर्रचना कार्यवाहीमुळे निर्माण झालेले अतिरिक्त सजे निर्माण करण्यासाठी ज्या महसुली गावांचे विभाजन करुन महसुली गावात रुपांतर करावे लागत आहे अशाही गावांची माहिती संकलित करणे अपेक्षीत आहे.
आपल्या जिल्हयातील खालीलप्रमाणे माहिती संकलित करुन इकडे सादर करावी.
१. हस्तलिखीत 7/12 मध्ये वाडी विभाजन होवुन तयार झालेला तथापि ऑनलाईन प्रणालीत उपलब्ध नसलेल्या गावांची यादी.
२. ऑनलाईन संगणकीकृत 7/12 कार्यान्वित झालेनंतर वाडी विभाजन झालेल्या व ऑनलाईन वाडी विभाजन करावयाच्या गावांची यादी.
३. तलाठी सजा पुनर्रचना झाल्याने नव्याने निर्माण झालेल्या महसुली गावांची यादी.
या सर्व गावांची माहिती विहीत नमुन्यात अधिसुचनेच्या प्रतीसह इकडे सादर करावी व या गावांसाठी जनगणना सांकेतांक क्रमांक देण्यासाठीची मागणी इकडे दिनांक 30/11/2018 पुर्वी कळवावी.
प्रपत्र- १(अ)
हस्तलिखीत 7/12 मध्ये वाडी विभाजन होवुन तयार झालेला तथापि ऑनलाईन प्रणालीत उपलब्ध नसलेल्या गावांची यादी.
जिल्हा तालुका मुळ महसुली गांव नवीन महसुली गांव अधिसुचनेचा क्रमांक व दिनांक
प्रपत्र- १(ब)
ऑनलाईन संगणकीकृत 7/12 कार्यान्वित झालेनंतर वाडी विभाजन झालेल्या व ऑनलाईन वाडी विभाजन करावयाच्या गावांची यादी.
जिल्हा तालुका मुळ महसुली गांव नवीन महसुली गांव अधिसुचनेचा क्रमांक व दिनांक
प्रपत्र- १(क)
तलाठी सजा पुनर्रचना झाल्याने नव्याने निर्माण झालेल्या महसुली गावांची यादी.
जिल्हा तालुका मुळ महसुली गांव नवीन महसुली गांव अधिसुचनेचा क्रमांक व दिनांक
कृपया सदरची माहिती दि ३०.११.२०१८ पर्यंत या कार्यालयाकडे अधिसूचनेच्या प्रती सह पाठवावी हि विनंती .
आपला,
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य)
प्रत,
उपविभागीय अधिकारी (सर्व)
तहसिलदार (सर्व)
Comments