अचूक ७/१२ , ८अ साठी उपविभागीय अधिकाऱ्यांची जबाबदारी
कक्ष ४/ रा.अ.अ.आ.का./रा.स. / २८ / २०१८
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख,
(म.राज्य) पुणे यांचे कार्यालय,3 रा मजला
पुणे, दिनांक १६ /02 /2018.
प्रति,
उपविभागीय अधिकारी, ( सर्व.)
विषय - 1. तालुकानिहाय एकुण महसुली गावांची संख्या व सन 2011 नंतर महसूल
गावाचा दर्जा प्रात झालेल्या गांवाची माहिती पाठविणेबाबत.
2. तालुका स्तरीय कार्यालयांना MPLS Connectivity अथवा NIC NET Connectivity
उपलब्ध करुन देणेबाबत.
३. कलम १५५ व २५७ अंतर्गत निर्णयाची प्रकरणे .
संदर्भ - 1.या कार्यालयाचे पत्र क्र.रा.भू.अ.आ.का.4/वाडी विभाजन डिसेंबर 2017 चे पत्र.
2. या कार्यालयाचे पत्र क्र.रा.भू.अ.आ.का.4/कनेक्टीव्हीटी/2017 दिनांक 22/12/2017 चे पत्र.
भूमी अभिलेख विभागामध्ये डिजीटल इंडिया भूमी अभिलेख आधुनिकीकरण कार्यक्रम (DILRMP) अंतर्गत ई-फेरफार प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यभर सुरु करण्यात आलेली आहे. यामध्ये उप विभागीय समन्वयक म्हणुन आपली नेमणुक केलेली आहे.
उपरोक्त विषय क्रमांक 1 अन्वये तालुका निहाय एकुण महसुल गावांची संख्या तसेच आपणास विषय क्रमांक 2 अन्वये आपल्या उपविभागातील तहसिलदार, दुय्यम निबंधक तसेच उप अधीक्षक भूमी अभिलेख तसेच नगर भुमापन अधिकारी यांची एकत्रित मिटींग घेऊन एकूण महसुली गावे व प्रत्यक्षात online झालेली गावे यांचा आढावा घेऊनअहवाल सादर करणे बाबत कळविणेत आले होते तथापि त्याबाबतचा आपला अहवाल अद्याप अप्राप्त आहे .
आपले उपविभागात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनिय १९६६ चे कलम 155 तसेच 257 अन्वये पारीत करावयाचे आदेशा साठी किती प्रकरणे प्राप्त झाली , त्यापैकी किती प्रकरणी निर्णय झाले व किती प्रकरणे शिल्लक आहेत ?. याबाबत शिल्लक प्रकरणांचा आढावा घेऊन खालील नमुन्यात सादर करावा.
नमुना - 1
तहसिलदार यांनी कलम 155 खाली ( अचूक संगणकीकृत ७/१२ साठी) निर्यासाठी ची प्रकरणे
अ.क्र. एकुण प्राप्त प्रस्ताव निर्णय झालेल्या प्रस्तावांची संख्या प्रलंबित प्रस्तावांची संख्या
नमुना -२
उपविभागीय अधिकारी यांनी कलम 257 खाली( अचूक संगणकीकृत ७/१२ साठी) निर्णयासाठी ची प्रकरणे
अ.क्र. पुनर्विलोकनासाठी एकुण प्राप्त प्रस्ताव निर्णय झालेल्या प्रस्तावांची संख्या प्रलंबित प्रस्तावांची संख्या
सदराची माहिती आपल्या जिल्ह्याचे डी डी ई तथा उप जिल्हाधिकारी यांचे मार्फत इकडे ८ दिवसात सदर करावी ही विनंती
आपला विश्वासू
( रामदास जगताप )
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक
जमाबंदी आयुक्त आणि संचालक
भुमि अभिलेख कार्यालय (म.राज्य) पुणे
प्रती , डी डी ई तथा उप जिल्हाधिकारी
जिल्हाधिकारी कार्यालय ( सर्व )
Comments