ई-फेरफार आज्ञावलीत अकृषक जमिनीच्या योग्य एकक व क्षेत्राच्या नोंदीबाबत
कक्ष ४/ रा.अ.अ.आ.का./रा.स. / 32 / २०१८
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख,
(म.राज्य) पुणे यांचे कार्यालय,3 रा मजला
पुणे, दिनांक 23 /02 /2018.
प्रति,
उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. (सर्व)
विषय - ई-फेरफार आज्ञावलीत अकृषक जमिनीच्या योग्य एकक व क्षेत्राच्या नोंदीबाबत.
ई-फेरफार आज्ञावलीत अचुक गाव नमुना नंबर ७/१२ व ८अ साठी चावडी वाचनाच्या विशेष मोहिमेनंतर Re-Edit Module मध्ये करण्यात येत असलेल्या दुरुस्त्या करताना अकृषक जमिनीच्या योग्य एकक व क्षेत्राच्या नोंदी घेण्यासाठी खालील प्रमाणे दोन सुविधा आज्ञावलीत उपलब्ध करून देणेत आल्या आहेत तथापि त्यांचा उपयोग करून दुरुस्त्या केल्या जात नाहीत असे दिसून येत आहे. या बाबत मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे देणेत येत आहेत .
१) अकृषक जमिनीचे एकक आर.चौ.मी. मध्ये रुपांतरीत करणे
गावातील सर्व अकृषक जमिनीचे एकक आर.चौ.मी. मध्ये असणे आवश्यक आहे. अकृषक जमिनीचे एकक हे.आर.चौ.मी. असल्यास सर्व प्रथम अकृषिक जमिनींचे क्षेत्र व एकक रुपांतरीत करणे बाबत तहसीलदार यांचे आदेशा घेणेत यावेत. सदर आदेशाने ई-फेरफार आज्ञावलीच्या मेनु मधील “ हे.आर.चौ.मी. एकक असलेले NA ७/१२ आर.चौ.मी. एकक मध्ये सामाविष्ठ करणे ” ही सुविधा वापरावी. सदर सुविधामुळे गावातील सर्व अकृषक ७/१२ चे एकक हे.आर.चौ.मी. मधुन आर.चौ.मी. मध्ये रुपांतरीत होईल. अशा एकक बदललेल्या सर्व ७/१२ वरील क्षेत्र रुपांतराची कार्यवाही पुढील प्रमाणे स्वतंत्रपणे करावी.
२) अकृषक जमिनीचे क्षेत्र हे.आर.चौ. मी. अथवा चौ. मी. मधून आर.चौ.मी. मध्ये रुपांतरीत करणे
यासाठी तलाठ्याने ई-फेरफार आज्ञावलीमध्ये अनोंदणीकृत फेरफार मधून नविन फेरफार घेऊन “ क्षेत्र दुरुस्ती आदेश ” हा फेरफार प्रकार निवडावा त्यानंतर अकृषिक जमीनीचे सर्व ७/१२ दुरुस्ती साठी उपलब्ध होतील. मूळ हस्तलिखित ७/१२ मध्ये नमूद क्षेत्र कोणत्या एककातील आहे याची खात्री करून तलाठ्याने योग्य तो पर्याय निवडून टिक ( ) मार्क करावे. त्याप्रमाणे रुपांतरीत क्षेत्र शेवटच्या रकान्यात पाहावे, ते योग्य असल्याची खात्री करून तहसीलदार यांने दिलेल्या आदेशाचा जावक नंबर नमूद करून साठवा करावे त्या नंतर फेरफाराचा तपशील पाहावा .
उदा. (a) हस्तलिखित ७/१२ वर क्षेत्र हे. आर. मध्ये असल्यास
एकुण क्षेत्र अकृषक क्षेत्र = 0.1200 असे नमूद असल्यास व खातेदारांच्या नावासमोर
अ ब क - 0.0620 आणि अ आ ई - 0.0580 असे नमूद असल्यास हे क्षेत्र हे.आर. मध्ये लिहिले आहे याची खात्री करून त्या ७/१२ साठी हे.आर. हा पर्याय निवडल्यास त्याचे रुपांतर एकूण क्षेत्र १२.०००० आर चौ मी व खातेदाराचे नावासमोरचे क्षेत्र अ ब क - ६.२००० आणी अ आ ई - ५.८००० असे आपोआप रुपांतरीत होईल .
उदा. (b) हस्तलिखित ७/१२ वर क्षेत्र चौ.मी. मध्ये असल्यास
एकुण क्षेत्र अकृषक क्षेत्र = १२०० असे नमूद असल्यास व खातेदारांच्या नावासमोर
अ ब क - ६२० आणि अ आ ई - ५८० असे नमूद असल्यास हे क्षेत्र चौ.मी. मध्ये लिहिले आहे याची खात्री करून त्या ७/१२ साठी चौ.मी. हा पर्याय निवडल्यास त्याचे रुपांतर एकूण क्षेत्र १२.०००० आर चौ. मी. व खातेदाराचे नावासमोरचे क्षेत्र अ ब क - ६.२००० आणी अ आ ई - ५.८००० असे आपोआप रुपांतरीत होईल . ई फेरफार मंजुरी बाबतची पुढील प्रक्रिया नेहमी प्रमाणे करावी
वरील प्रमाणे दुरुस्त्या केल्यानंतर संगणकामध्ये 7/12 अशा प्रकार दिसेल.
एकुण क्षेत्र अकृषक क्षेत्र - 12.00.00 चौ.मीटर व खातेदारांच्या नावासमोर अ ब क - ६.२०.०० आणि अ आ ई - ५.८०.०० असे दिसेल.
या प्रमाणे दोन्ही पर्यायांचा वापर करून आपल्या गावातील अधिकृत बिनशेती झालेल्या सर्व क्षेत्राचे आर चौ.मी. मध्ये रुपांतरीत करावे. सोबत याबाबत चे document जोडले आहेत.
सदरच्या मार्गदर्शक सूचना सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांचे निदर्शनास आणाव्यात.
आपला विश्वासू,
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे.
प्रत,
उपविभागीय अधिकारी ( सर्व. ),
तहसिलदार ( सर्व. )
वरील प्रमाणे कार्यवाही सर्व अकृषिक ७/१२ साठी केली असल्याची खात्री आपण घोषणापत्र ३ करण्यापूर्वी करावी ,. ज्या गावांचे घोषणापत्र ३ यापूर्वीच झाले आहे त्या गावांमध्ये देखील ही कारवाही करून घेनेत यावी
Comments