आज दिनांक १५ फेब्रु , २०१८ पासून ई फेरफार अज्ञावालीमध्ये उपलब्ध करून देनेत आलेल्या सुधारणा
नमस्कार मित्रांनो
आज दिनांक १५ फेब्रु , २०१८ पासून ई फेरफार अज्ञावालीमध्ये खालील सुधारणा करणेत आल्या आहेत .
१. ई फेरफार - हक्कासोड पत्र / रिलिज डीड या नोंदणीकृत फेरफार प्रकारामध्ये SRO यांचे कडील सदोष DETA ENTRY मुळे योग्य प्रकारे फेरफार तपशील तयार होत नव्हता त्यासाठी तलाठी लॉगीन द्वारे नोंदणीकृत फेरफार प्रकारामध्ये नवीन फेरफार ( RE ENTRY) हा पर्याय वापरून तलाठी स्थरावर
हक्कासोड पत्र तयार करून घेणारांची नावे निवडून ( ज्यांच्या लाभत हक्कासोडला आहे त्यांची नावे निवडून )योग्य फेरफार तपशील तयार करता येईल . त्याबाबत चे युजर म्यनुअल सोबत जोडले आहे त्या प्रमाणे कार्यवाही करावी .
२. अहवाल १ मधील त्रुटी असलेले व बंद केलेले ७/१२ ई फेरफार मधून सुरु करता येत नव्हते असे बंद केलेले ७/१२ आता सुरु करत येतील .
३. ई फेरफार मध्ये फेरफारावर एकदाच हरकत भरता येत होती आता त्यात बदल करून एकापेक्षा अनेक वेळा हरकती भारता येतील .
४. हरकतीचा तपशील भरताना हरकत घेणाऱ्याचा मोबाईल नंबर अथवा आधार क्रमांक भरताना DOUBLE CLICK ची अडचण दूर करणेत आली आहे .
५. सामाईक खात्यातील खरेदी विक्रीच्या SRO कडील चुकीच्या SKN नोंदी मुळे यापुढे फेरफार चुकणार नाही यासाठी सुधारणा करणेत आली आहे .
या सुधारणा सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांचे पर्यंत पोहोचवाव्यात ही विनंती
आपला
रामदास जगताप
Comments