कोल्हापूर -कोंकण दौरा
नमस्कार मित्रांनो ,
कालच कोल्हापूर व दक्षिण कोकणचा दौरा करून परत पुण्यात आलो .
कोल्हापूर --
यावेळी दि.३१ जानेवारी ,२०१८ रोजी कोल्हापूर येथे शाहू सभाग्रहात घोषणापत्र ३ झालेल्या गावांची तपासणी केली व सर्व तलाठी आणी मंडळ अधिकारी यांचे शंका समाधान सत्र घेतले तसेच अज्ञावालीतील नवीन सुधारणा बाबत सादरीकरण केले ., यावेळी डी डी ई तथा निवशी उप जिल्हाधिकारी श्री संजय शिंदे व महसूल उप जिल्हाधिकारी श्री लाटकर उपशीठ होते
सावंतवाडी ---
१ फेब्रुवारी २०१८ रोजी सावंतवाडी तालुक्यातील ओतवाने साजा ला गावात जाऊन प्रत्यक्ष ग्रामस्थांशी चर्चा केली , त्याठिकाणी श्री पास्ते तलाठी ओटवणे व अन्य एका अतिरिक्त कार्यभार असलेल्या साजातील एकूण सात गावांचे काम पूर्ण केले आहे . त्यांनी अचूक संगणकीकृत ७/१२ व ८अ साठी कठोर परिश्रम घेतले असल्याचे दिसून आले . काही किरकोळ त्रुटी वगळता त्यांने खूप चांगले काम केले असल्याचे दिसून आले त्यांच्या कडून प्रेरणा घेऊन इतरही तलाठी उत्कृष्ट काम करतील अशी अपेक्षा आहे .
सिंधुदुर्ग ---
दि १ फेब्रुवारी २०१८ रोजी सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात घोषणापत्र ३ केलेल्या गावातील त्रुटी व गुणवत्तापूर्ण कामाबाबत शंका समाधान सत्र घेतले व अज्ञावालीतील नवीन सुधारणा बाबत सादरीकरण केले. या जिल्ह्यात ४ तालुक्याचे काल लोकल सर्व्हर वर चालू आहे त्याची पाहणी केली . जिल्हाधिकारी श्री. चौधरी साहेब यांचे उपस्थितीत सर्व महसूल अधिकाऱ्यांशी चारच्या केली व पुढील कामाची दिशा ठरवली .यावेळी डी डी ई तथा प्रांताधिकारी सावंतवाडी श्री सुशांत खांडेकर उपस्थित होते
रत्नागिरी ---
घोषणापत्र ३ झालेल्या गावांची तपासणी करून यागावातील त्रुटी व गुणवत्तापूर्ण कामाबाबत शंका समाधान सत्र घेतले व अज्ञावालीतील नवीन सुधारणा बाबत सादरीकरण केले. त्यानंतर जिल्हाधिकारी श्री पी प्रदीप यांचेशी सविस्तर चर्चा केली . यावेळी निवाशी उप जिल्हाधिकारी तथा डी डी ई श्री अभिजित घोरपडे उपस्थित होते .
परतीच्या वाटेवर साताऱ्यात तहसील कार्यालयात सर्व तलाठी मंडळ अधिकारी यांचे ही संकासामाधन सत्र घेतले
या सर्व दौर्याचा मुख्य उद्देश अचूक व गुणवत्तापूर्वक काम पूर्ण करणे हाच होता तो साध्य होईल अशी अपेक्श्या आहे
रामदास जगताप दिनक ४.१.२०१८
Comments