रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

श्री पी डी पास्ते तलाठी ओटवणे तालुका सावंतवाडी जी . सिंधुदुर्ग यांची यशोगाथा मनोगत

मी डी. पी. पास्ते तलाठी ओटवणे ता. सावंतवाडी, जि.सिंधुदुर्ग (एक माजी सैनिक) ओटवणे सजा तसेच अतिरिक्त कार्यभार असलेली तांबुळी सजा या दोन्ही सजातील 7 गावे जवळ जवळ 13000 पोटहिस्से D3 पूर्ण करून सहा महिने झालेत. ओटवणे या संपूर्ण सजामध्ये गेले दोन वर्षे अचूक 7/12 देण्याचा प्रयत्न अविरत चालू आहे. Software मध्ये सुधारणा झाल्यावर तांबोळी सजा तर 01 एप्रिल 2017 ते 30 ऑगस्ट 2017 या पाच महिन्यात संपूर्ण काम करून D3 देण्यात मी यशस्वी झालो. मला हे सांगण्यात आनंद होतो की ही ई फेरफार प्रणाली संपूर्ण सातही गवांमध्ये एकही क्षुल्लक तक्रारीविना यशस्वी रित्या राबविली जात आहे. आणि आजच काम आजच करण्यावर भर दिला जात आहे. कार्यालयीन पत्र व्यवहार असो अथवा कोणता अहवाल असो प्रत्येक काम हे तात्काळ केले जात आहे हे केवळ ई फेरफार प्रणाली मध्ये 100% काम केल्यामुळे शक्य होत आहे शासनाने एखादा प्रकल्प राबविताना सर्वात जास्त जबाबदारी गांव स्तरावर काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांची असते. सदर योजना लोकांपर्यंत सकारात्मक दृष्टिकोन ठेवून वेळोवेळी खातेदारांच्याशी संवाद साधून लोकांमध्ये सकारात्मक विचार रोवण्याचे जिकरीचे काम सोप्या पद्धतीने करण्यात आले. शासनाच्या या संगणकीकरणाच्या योजनेवर काम करताना मुळात कसल्याही लोभा शिवाय लोकांसाठी कष्ट, काहीसा त्याग करण्याची तयारी यामुळे चाकोरी बाहेर हे काम मी करू शकलो. सदर कामाला जेव्हा मी प्रथमतः सुरुवात केली तेव्हा मुळात हस्तलिखित अभिलेखात जवळ जवळ 15 ते 20 टक्के चुका आढळून आल्या अश्या परिस्थितीत रेकॉर्ड चा मुळापासून प्रगाढ अभ्यास जरुरी वाटले आणि खालील स्टेप घेत मी अचूक 712 करण्याच्या दृष्टीने मी पावले उचलली 1. सगळ्यात आधी संपूर्ण गावातील फेरफार, वारस रजिस्टर तसेच तक्रार रजिस्टर स्कॅन करून माझ्या लॅपटॉप मध्ये ठेवले. 2. Computerised डेटा मध्ये असलेली खाती दुबार, तिबार असलेली खाती आवश्यक तिथे विभागणी,एकत्रीकरण,खाता प्रोसेससिंग,ODU, OCU, e ferfaar वैगरेचा वापर करून दुरुस्ती करून घेतली. 3. माझ्याकडील 7 ही गावांत प्रचंड सामाईक, देवस्थान अश्या किचकट समस्या सोडविणे कामी सामाईक खात्यावर पाहिलं काम सुरू केलं 4. खाता प्रोसेससिंग नसताना एडिट,रिएडिट, ODU वापरून 7/12 च प्रत्येक पान चेक करून आवश्यक दुरुस्त्या करताना प्रसंगी रात्र रात्र जागून 7/12 अचूक करण्याच्या दृष्टीने गेली जवळ जवळ 3 वर्षे अहोरात्र काम केले. 5. असं पेटून उठल्यागत काम फक्त लोकांसाठी काहीतरी निस्वार्थी बुद्धीने करावं म्हणूनच आणि कामावरील निष्ठा, आजच काम आजच करणे या संकल्पामुळे आज मी यात यशस्वी होऊ शकलो. 6. काम करताना असंख्य अडचणी होत्या काही ठिकाणी कठीण निर्णय घेणे भाग होते. बहुतांश तलाठी पावलो पावली घाबरत असो किंवा घाबरण्याचा आव आणत काम करताना दिसतात. मी मात्र विचार केला मुळ अभिलेखात जर कायद्याला तुडवून काम झाली असतील आणि 20 ते 25% चुका असतील तर आपल्याला कायद्याचा ज्याला आधार आहे असे काम कायद्याचा सन्मान करून काम करताना अजिबात घाबरायचं कारण नाही. यात मला आवर्जून एक गोष्ट निदर्शनास आली ती म्हणजे काही तलाठी कायद्याला पायदळी तुडवत स्वार्थापोटी किंवा काही अन्य कारणास्तव नको तशी कामे करताना आढळून आले आणि हेच तलाठी अभिलेखात योग्य ती सुधारणा करण्यास पण टाळाटाळ करताना दिसले स्वार्थापोटी कोणाच्या बापाची पर्वा नसल्यागत निर्णय घेणे तर तोच कर्मचारी ई फेरफार प्रणालीत काम करताना कायदेशीर बदल करण्यास पण अनाकानी करायला लागले 7. हे सर्व काम सुरुवात झल्यापासून आजपर्यंत कधीही कोणत्याही खातेदारांना आम्ही नंतर या असं कधी बोललो नाही. किंवा कोणा खातेदाराला कधीही काही कारणं सांगून सेवा पुरविण्यात दिरंगाई केली नाही. आज मी जिथे बसलोय तिथे माझ्याजवळ खातेदार किंवा शासनाचं एकही काम प्रलंबित नाही आहे 8. गेले 3 वर्ष माझ्या तलाठी कार्यालयातून एकही नोटीस पोस्टाने जात नाही. SMS, व्हाट्सअप,email आणि प्रत्यक्ष संपर्क जास्तीत जास्त face to face संपर्क द्वारे नोटीस पोहोच करण्यात आम्ही यशस्वी झालो आहोत. 9. एवढं सगळं काम करताना software बाबत तसेच इतर अनेक समस्या असतानाही सर्व समस्यांवर आपल्या अथक प्रयत्नांनी मात केली तसेच या कामात अगदी कोतवाल पासून वरिष्ठ अधिकारी सर्वांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. NIC तसेच हेल्पडेस्क चे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांनी वेळोवेळी अत्यंत मोलाची आणि तात्काळ सेवा उपलब्ध करून दिली त्याबद्धल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. इतर कर्मचारी हे नाही ते नाही असं पावलोपावली बोलत असताना मला मात्र एक सर्व्हर स्पीड बाबत अडचण सोडल्यास कधीच कसली समस्या आली नाही. इच्छा तिथे मार्ग या उक्ती प्रमाणे मला खूप समाधान लाभले. काही क्षुल्लक चुका असतीलही परंतु या कामाबद्धल मी कमालीचा 101% समाधानी आहे. धन्यवाद आपला पी डी पास्ते तलाठी एक सेवक

Comments

Archive

Contact Form

Send