ई-फेरफार आज्ञावलीतील अचूक 7/12 व 8अ साठी तपासणीची विशेष मोहीम घेणे बाबत
विषय- ई-फेरफार आज्ञावलीतील अचूक 7/12 व 8अ साठी तपासणीची विशेष मोहीम घेणे बाबत
डिजीटल इंडीया लॅन्ड रेकॉर्ड मॉडर्नायझेशन (DILRMP) या शासनाच्या अत्यंत महत्वाच्या कार्यक्रमामध्ये अचूक 7/12 व 8अ साठी मे 2017 पासुन सुरु असलेल्या चावडी वाचनाची विशेष मोहिम व Re-Edit Module चे कामामध्ये कामाची गुणवत्ता राखण्याबाबत वेळोवेळी जमाबंदी आयुक्त तथा संचालक भुमी अभिलेख यांनी परिपत्रकाव्दारे निदर्शनास आणून दिले आहे. या संपुर्ण कार्यक्रमात Zero Tolerance To Error “ हे तत्व पाळण्याबाबत सुचित करणेत आले आहे.
घोषणापत्र 3 झालेल्या गावातील कामाची तपासणी जमाबंदी आयुक्त कार्यालयाच्या पथकाने अनेक जिल्हयात जाऊन केली असता खालील प्रमाणे प्रमुख त्रुटी असल्याचे दिसून आले आहे.
1) अनेक गावांसाठी पालक महसुल अधिकाऱ्यांची नेमणूक करून या अधिकाऱ्याने 1 ते24 मुद्यांच्या तपासणीसह व भूधारणा बदललेल्या गटांची खात्री केलेली नाही अथवा अशा गावाच्या एकुणच गुणवत्तापुर्ण कामाची खात्री केलेली नाही.
2) ठरवून दिलेल्या बिंदुप्रमाणे 7/12 ची तपासणी करताना अनेक महसुल अधिकाऱ्यांनी तपासणी केलेल्या 7/12 मध्ये अनेक गंभीर त्रुटी आढळून येत आहेत.थोडक्यात काही अधिकाऱ्यांनी अशी तपासणी काळजीपूर्वेक व गांभिर्याने केलेली नाही असे दिसुन येते यामध्ये महसुल अधिकारी यांचा निष्काळजीपणा निदर्शनास आल्याने जबाबदारी निश्चित करून त्याची गंभीर दखल घ्यावी.
3) अनेक गावांमध्ये तहसिलदार, उपविभागिय अधिकारी तसेच जिल्हाधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी यांनी 7/12 ची तपासणी न करताच घोषणापत्र -3 कले आहे.
4) गाव नमुना 7 मधील प्रत्येक नोंदी समोर ती नोंद ज्या फेरफार क्रमांकाने घेतली आहे तो फेरफार क्रमांक नमुद केलेला नाही. (त्या ठिकाणी मानीव फेरफार क्रमांक टाकले आहेत ). फेरफार क्रमांकाशिवाय ७/१२ अथवा चुकीचा फेरफार क्रमांक नमूद ७/१२ अनेक महसुली व दिवाणी दाव्यांना जन्म देऊ शकतो .त्यामुळे फेरफार क्रमांक अचूक असणे अत्यंत आवश्यक आहे .
5) अनेक गावामधील गाव नमुना 7/12 वर मागिल 3 वर्षाची पिक पाहणी अद्यावत केलेली नाही.
6) काही नागरी भागामधील अथवा उपनगरातील अकृषीक 7/12 चे संगणकीकरण झालेली नाही.
7) ७/१२ वर भूधारणा पद्धती , खातेदाराचे अचूक नाव , क्षेत्र , खाते क्रमांक व खाते प्रकार , इतर हक्कातील नोंदी , प्रत्येक नोंदी साठी चा त्यासमोरील योग्य फेरफार क्रमांक व गेल्या ३ वर्षाच्या पिकांच्या नोंदी या मध्ये एकाही चूक असू नये
8) सर्व महसुली गावांमधील सर्व 7/12 चे संगणकीकरण होऊन सर्व गावांमधील सर्व नोंदणीकृत दस्तांचे फेरफार व अनोंदणीकृत पध्दतीने होणारे फेरफार ई-फेरफार मधुनच होत असल्याची आपले स्तरावर खात्री करावी.
ई-फेरफार प्रकल्पांअंतर्गत सध्या सुरु असलेले काम हे अत्यंत महत्वाचे महसुली काम असल्याने व या कामाच्या गुणवत्तेचा थेट परिणाम सामान्य जनतेवर होणार असलेने यामध्ये कामाची गुणवत्तेबाबत तडजोड न करता कालबध्द पध्दतीने हे काम पर्ण करण्यासाठी आपले स्तरावर नियोजन करावे.
सर्व विभागिय आयुक्त यांनी विभागीय स्तरावरून पथके निर्माण करून आंतरजिल्हा तपासणी करावी . सर्व जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व तालुक्यांची तपासणी करण्यासाठी उपविभागीय अधिकारी स्थरावर पथके निर्माण करून आंतर तालुका क्रॉसचेकिंग करावे व उपविभागीय अधिकारी यांनी आपले स्थरावर पथके तयार करून तालुक्यातील वेगवेगळ्या गावांचे क्रॉसचेकिंग करावे व या कामासाठी तपासणीची विशेष मोहीम घेऊन अचुक 7/12 व 8अ करताना 100% अचुक काम मार्च २०१८ पूर्वी पूर्ण करण्याचे नियोजन आपले स्थरावर करावे . ज्या गावांचे काम गुणवत्तापूर्ण झाले नाही त्यासाठी जबाबदार अधिकारी व कर्मचार्यांची जबाबदारी निश्चित करून उचित कारवाई करावी . अशी अपेक्षा आहे .
Comments