सर्व मंडळअधिकारी यांचेसाठी महत्वाच्या सूचना
सर्व मंडळअधिकारी यांचेसाठी
- तलाठी एखाद्या गटामध्ये काही दुरुस्ती असलेस reedit चा वापर करून त्यामध्ये दुरुस्ती करत आहेत किंवा तसे त्यांनी करणे क्रमप्राप्त आहे . ज्यावेळी त्या दुरुस्तीकृत गटांचे परिशिष्ट तयार करून त्याचा फेरफार तयार केला जातो त्यानंतर मंडळ अधिकारी याना सदर फेरफार दिसतो. अशावेळी मंडळअधिकारी यांचे dashboard ला सदर गट मंजुरी करीता दिसतात , तद्नंतर त्याचे पूर्वावलोकन पाहून बरोबर असेल तर मंजूर अथवा चुकीचे असेल तर तो गट नामंजूर करणे असा फ्लो आहे मात्र त्या मंजुरीच्या रस्त्यावर जातेवेळी पूर्वावलोकन बटन वर क्लिक करूनच पुढे जावे लागते म्हणून ते बटन प्रेस करायचे आणि तत्काळ सदर विंडो क्लोज करायची असा मार्ग काही मंडळअधिकारी स्वीकारताना दिसत आहेत मात्र सदर बाब पूर्णत: चुकीची असून त्यामुळे काही अडचणीमुळे अंमल चुकीचा होत असल्यास त्याबाबत मंडळअधिकारी यांचे कडून पण चुकीचा गट मंजूर होतो आणि तो कायम होतो आणि मग खातेदाराच्या हातामध्ये 7/12 पडल्यावर लक्षात येते किंवा पुन्हा चेक केलेवर लक्षात येते कि अंमलच झाला नाही.....त्यानंतर पुढे काहीच पर्याय राहत नाही कारण आता सद्यस्थिती मध्ये reedit पूर्ण झालेनंतर दुरुस्तीचे सर्व दरवाजे बंद करणेत आलेले आहेत पर्यायी मा.तहसीलदार सो यांचा १५५ आदेश घेणे हा एकमेव पर्याय राहतो( विनाकारण एका चुकीमुळे प्रशासनाला जास्तीचे काम लागू शकते) . आणि हे सगळे फक्त आपल्या पूर्वावलोकन व्यवस्थित न पाहता पुढे जाण्याच्या मार्गामुळे......... त्यामुळे reedit असो वा ई फेरफार असो पूर्वावलोकन व्यवस्थित दाखवत नसेल तर पुढे जाऊ नका (थोडा अधिक वेळ लागेल हरकत नाही) त्याच ठिकाणी reentry अगर रद्द चा पर्याय वापरा जेणेकरून संबंधितांना त्याबाबत योग्य ती दुरुस्ती करता येईल.......
सदरचा मेसेज सर्व मंडळ अधिकारी यांचे पर्यंत पोहोचवा .
रामदास जगताप
Comments