तालुका स्तरीय कार्यालयांना MPLS Connectivity अथवा NIC NET Connectivity उपलब्ध करून देणे बाबत.
क्र.रा.भू.अ.आ.का. कनेक्टीव्हीटी/2017.
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख,
(म.राज्य) पुणे यांचे कार्यालय,
पुणे, दिनांक 22 /12/2017
प्रति,
1) उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई (सर्व)
2) जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख, (सर्व)
3) सह जिल्हा निंबधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी (सर्व)
विषय- तालुका स्तरीय कार्यालयांना MPLS Connectivity अथवा NIC NET Connectivity
उपलब्ध करून देणे बाबत.
संदर्भ-नोंदणी महानिरीक्षक (म.राज्य) पुणे यांचे कडील पत्र क्रं. D-3/connectivity/LR
offices/2017/490 pune date 15/12/2017
विषयाकिंत बाबत सद्यस्थित राज्यातील सर्व दुय्यम निबंधक कार्यालये MPLS Connectivity ने जोडण्यात आली असून त्या Connectivity चा वापर i-sarita आज्ञावलीसाठी करण्यात येत आहे. त्याच धर्तीवर ई- फेरफार व e-Pcis प्रकल्पासाठी साठी राज्यातील सर्व तहसिलदार कार्यालये उपअधीक्षक भूमि अभिलेख, नगर भूमापन व दुय्यम निबंधक कार्यालये MPLS Connectivity किंवा NIC NET ने जोडण्यासाठी दिनांक 26/10/2017 रोजी झालेल्या HPC सभेमध्ये मान्यता देण्यात आली आहे. त्याअनुषंगाने राज्यात ज्या ठिकाणी कार्यालयाच्या पासून 100 मीटरच्या आत तहसिलदार, उपअधीक्षक भूमि अभिलेख व नगर भूमापन कार्यालये आहेत. त्या ठिकाणी संमातर जोडणीने (Horizontal Connectivity) MPLS व ज्या ठिकाणी वेगवेगळया ठिकाणी आहेत त्या ठिकाणी स्वतंत्र जोडणीने (Vertical Connectivity) जोडणीने NIC NET द्वारे जोडणी प्रस्तावित आहे. त्यासाठी आवश्यक असणारी माहिती सोबत सादर केलेल्या नमुन्यात संयुक्त स्वाक्षरीने इकडील कार्यालयाकडे दिनांक 28/12/2017 पुर्वी सादर करावी.
आपला विश्वासू,
(रामदास जगताप)
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय, पुणे
प्रत - मा. नोंदणी महानिरीक्षक (म.राज्य) पुणे यांना माहितीस्तव सविनय सादर.
प्रत - मा. विभागीय आयुक्त, पुणे, मुंबई, नाशीक, औरंगाबाद, अमरावती व नागपूर यांना माहितीस्तव सविनय सादर.
प्रत - मा . जिल्हाधिकारी ( सर्व )
MPLS CONNECTIVITY / NIC NET CONNECTIVITY बाबत आवश्यक माहिती.
जिल्हा -----------
अ.नं. तालुक्याचे
नाव दुय्यम निंबधक कार्यालय तहसिल कार्यालय उपअधीक्षक भूमि अभिलेख कार्यालय नगर भूमापन कार्यालय
पत्ता, फोन नंबर व ई-मेल आयडी पत्ता, फोन नंबर व ई-मेल आयडी SRO कार्यालया पासूनचे अंतर
(मीटर मध्ये) पत्ता, फोन नंबर व ई-मेल आयडी तहसिल कार्यालया पासूनचे अंतर (मीटर मध्ये) SRO कार्यालया पासूनचे अंतर (मीटर मध्ये) पत्ता, फोन नंबर व ई-मेल आयडी तहसिल कार्यालया
पासूनचे अंतर (मीटर मध्ये) SRO कार्यालया पासूनचे अंतर (मीटर मध्ये)
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11
1
2
3
४
५
६
७
८
९
सह जिल्हा निंबधक जिल्हा अधीक्षक भूमि अभिलेख उपजिल्हाधिकारी
तथा तथा
मुद्रांक जिल्हाधिकारी डी.डी.ई
Comments