रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

तालुकानिहाय एकूण महसूल गावांची संख्या व सन 2011 नंतर महसूल गावाचा दर्जा प्राप्त झालेल्या गावांची माहिती पाठविणेबाबत.

क्र.रा.भू.अ.आ.का.4/ वाडी विभाजन /2017. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (म.राज्य) पुणे यांचे कार्यालय, पुणे, दिनांक / 12 /2017 प्रति, जिल्हाधिकारी , (सर्व ) विषय - तालुकानिहाय एकूण महसूल गावांची संख्या व सन 2011 नंतर महसूल गावाचा दर्जा प्राप्त झालेल्या गावांची माहिती पाठविणेबाबत. संदर्भ - या कार्यालयाकडील पत्र क्र. रा.भू.अ.आ.का.4/ वाडी विभाजन /2017 दि. 27/03/2017. महोदय, कृपया संदर्भीय पत्राचे अवलोकन होण्यास विनंती आहे. या पत्रान्वये ( 1 ) Offline पदध्तीने कार्यवाही करावयाच्या वाडी विभाजनच्या गावांची नावे व संख्या व ( 2 ) Online पदध्तीने कार्यवाही करावयाच्या वाडी विभाजनच्या गावांची नावे व संख्या या बाबतची माहिती 30/04/2017 अखेर पाठविण्याची विनंती केली होती. तथापि सदरची आपल्या जिल्हयाची माहिती अदयाप अप्राप्त आहे. अ) - एकूण महसूल गावांबाबत माहिती. सध्या ई फेरफार आज्ञावलीची अंबलबजावणी राज्यभर सुरू आहे. तसेच ई अभिलेख, ई मोजणी, e-PCIS, ई- भूनकाशा व i- SARITA अशा वेगवेगळया आज्ञावलीमध्ये गावाचा Digitall Data वापरून कार्यवाही केली जात आहे. तथापि सध्यास्थित वेगवेगळया आज्ञावलीमध्ये काही महसूल गावांची नावे व संख्या जुळत नाही. यासाठी प्रत्येक उपविभागीय अधिकारी यांनी आपल्या स्थरावर आपल्या उपविभागामध्ये समाविष्ट असलेल्या तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी संबंधित तालुक्याचे तहसिलदार, उपअधीक्षक भूमि अभिलेख व तालुक्यातील दुय्यम निबंधक यांची संयुक्त बैठक घेऊन प्रत्येक आज्ञावलीमध्ये वापरात असलेली गावांची नावे व संख्या याची खातरजमा करावी. तालुक्यामध्ये आज रोजी अस्तित्वात असलेल्या महसूल गावांची माहिती उपअधीक्षक भूमि अभिलेख यांच्या कडून घेण्यात यावी व त्याप्रमाणे कोणत्या आज्ञावलीमध्ये काय माहिती अपूर्ण किंवा चुकीची आहे, याबाबत आपला अहवाल ( नमूना अ ) आपले उप जिल्हाधिकारी तथा D.D.E. यांचे मार्फत या कार्यालयाकडे सादर करावा. नमूना अ अहवाल - एकूण महसूल गावांबाबत माहिती अहवाल - जिल्हा ------ अनु. क्र. तालुक्याचे नाव भूमि अभिलेख विभागाकडील एकूण महसूली गावांची संख्या तहसिलदार यांचेकडील एकूण महसूली गावांची संख्या आय- सरिता आज्ञावलीतील एकूण महसूली गावांची संख्या काही तफावत असल्यास नमूद करावी १ २ ब ) - सन 2011 नंतर महसूली गावाचा दर्जा प्राप्त गावांची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाकडून( महसूल शाखा ) सन 2011 च्या जनगणने नंतर नव्याने अस्तित्वात आलेल्या महसूल गावांची यादी महाराष्ट्र जमीन महसूल अधीनियम 1966 चे कलम 4 प्रमाणे अधिसूचनेच्या प्रतिसह खालील नमून्यात परिपुर्ण व अचूक माहिती दि. 30/12/2017 पर्यत या कार्यालयाकडे ( नमूना ब ) पाठवावी. नमूना -ब अहवाल - सन 2011 नंतर महसूली गावाचा दर्जा प्राप्त गावांची माहिती अ. क्र. तालुक्याचे नाव सन 2011 मधी जुन्या महसूली गावाचे नाव सन २०११ जनगणना सांकेतांक क्र. सन 2011 नंतर महसूली गावाचा दर्जा प्राप्त गावाचे नाव कलम 4 प्रमाणे अधिसूचनेचा दि. नवीन गावात ई - फेरफार आज्ञावली कार्यान्वित आहे का ? १ २ जिल्हाधिकारी यांनी आपल्या जिल्हयातील सर्व महसूली गावांच्या अधिकार अभिलेखाचा Data Online झाले असल्याची खात्री कारावी व सर्व गावांमध्ये फक्त ई- फेरफार आज्ञावलीव्दारे Online फेरफार घेतले जात असल्याची खातरजमा करावी, ही विनंती. आपला विश्वासू, ( रामदास जगताप ) राज्य समन्वयक, रा. भू. अ. आ. का. जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणे प्रत- उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई.सर्व यांना पुढील कार्यवाहीस्तव- आपल्या जिल्ह्याची माहिती संकलित करून ३०/१२/२०१७ पूर्वी पाठवावी . प्रत -उपविभागीय अधिकारी सर्व यांना पुढील कार्यवाहीस्तव- आपल्या उप्विभागाची बैठक घेऊन नमुना अ ची माहिती दिनांक ३०/१२/२०१७ पूर्वी पाठवावी .

Comments

Archive

Contact Form

Send