GOOD BYE 2017 .......
रविवार , दिनांक ३१.१२.२०१७
नमस्कार मित्रांनो ,
आज सन २०१७ च्या शेवटच्या दिवशी वर्षाचा लेखाजोखा मांडताना मला आनंद होत आहे व मी समाधानी आहे . काल रात्री ११.४५ वाजता तीन दिवसाचा व पाच जिल्ह्यांचा दौरा संपवून आलो .
राज्यातील जनतेला अचूक संगणकीकृत ७/१२ व ८अ देण्याचा महसूल विभागाचा उद्देश बऱ्याचअंशी या वर्षात सफल झाला . राज्यातील ४३९५१ गावांपैकी सुमारे २८००० गावातील अचूक ७/१२ व ८अ चे काम पूर्ण झाले आहे . हस्तलिखीत ७/१२ पेक्षा कितीतरी चांगल्या स्थितीतील अचूक ७/१२ व ८अ जनतेला उपलब्ध करून देण्यात यश आले आहे . असे असले तरी अजुनही बरेच काम बाकी आहे . ज्या गावात कमी ७/१२ होते , कमी अडचणी होत्या त्या गावाचे काम पूर्ण झाले आहे त्यामुळे उर्वरीत गावांचे अचूक ७/१२ व ८अ चे स्वप्न साकार होण्यासाठी तलाठी मंडळ अधिकार्यांसह महसूल अधिकाऱ्यांनी कठोर परिश्रम करण्याची गरज आहे . मी स्वतः या कामासाठी पूर्ण झोकुन देऊन या वर्षात काम केले . अनेक जिल्यात जाऊन सकाळी ९ पासून रात्री ९ पर्यंत पर्यंत प्रशिक्षण वर्ग , कार्यशाळा घेतल्या , तपासण्या केल्या व अचूक संगणकीकृत ७/१२ व ८अ साठी “ZERO TOLERANCE TO ERROR” हे मा. जमाबंदी आयुक्त श्री. चोकलिंगम सरांचे ब्रीद वाक्य प्रत्यक्षात आणण्याचा कसोशिने प्रयत्न या वर्षात केला . महसूल विभागाच्या तलाठी, मंडळ अधिकारी , नायब तहसीलदार , तहसीलदार , प्रांताधिकारी व उपजिल्हाधिकारी तथा DISTRICT DOMAIN EXPERT ( DDE) यांना प्रशिक्षण देण्यासाठी गेल्या वर्षभरात २७ जिल्ह्यात जाऊन सुमारे ८००० अधिकारी, कर्मचाऱ्यांना स्वतः प्रशिक्षण दिले , त्यांच्या शंका दूर केल्या , अडचणी सोडविल्या . प्रत्येक महसूल आयुक्तांच्या कार्यालयात जाऊन विभागनिहाय MASTER TRAINERS तयार केले व त्यांना सविस्तर प्रशिक्षण दिले . जमाबंदी आयुक्त कार्यालयात असलेल्या हेल्प डेस्क च्या मदनीने सुमारे १८००० अडचणी सोडवेल्या . ई फेरफार या आज्ञावली मध्ये अनेक अत्यावश्यक सुधारणा NIC च्या मदतीने करून घेतल्या . RE- EDIT ची सुविधा नव्याने विकाशीत केली . तलाठ्याकडे फेरफारासाठी करावयाच्या ONLINE अर्जासाठी नवीन आज्ञावली (PDE) साठी काम चालू केले . ई फेरफार प्रकल्पासाठी नवीन सर्वर व CONNECTIVITY घेण्यासाठी शासनाच्या उच्चाधिकार समितीने मान्यता दिली . अधिकार अभिलेखाशी खातेदाराचा आधार क्रमांक संलग्न करावयाची कार्यपद्धती निच्छित करणेत आली . व्हर्जन २ साठी सहकारी उप जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली विषय तज्ञांच्या उप समित्या स्थापन करून पुढील ५० वर्ष्याचा विचार करून आज्ञावली विकाशीत करण्याचे प्रयत्न मा. जमाबंदी आयुक्त महोदयांनी सुरु केले आहेत . लवकरच आधार जोडणीचा पायलट प्रोजेक्ट सुरु होईल . या सर्व कामामध्ये DIT व SDC च्या कडून अपेक्षित सहकार्य न मिळाल्याने किंवा असहकार्यामुळे खूप त्रासही झाला. या सर्व कामात सर्वर स्पीड, अज्ञावालीतील अडचणी असतानाही सर्व तलाठी , मंडळ अधिकारी व काही महसूल अधिकार्यांनी रात्रंदिवस परिश्रम घेतले म्हणूनच सुमारे २८००० गावांचे काम पूर्ण होऊ शकले.
ई फेरफार प्रकल्प या वर्षभरात नेहमी मा. महसूल मंत्री महोदय , मा. प्रधान सचिव महसूल , जमाबंदी आयुक्त , सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचा प्राधान्याचा विषय राहिला . या वर्षात मी या निमित्ताने २७ जिल्ह्यात जाऊन तेथील अभिलेख लिहिण्याची व ठेवण्याची पद्धतीतील विविधता अनुभवली . राज्यात एकच महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम लागू असताना अभिलेखातीत विविधता एका समान पातळीवर आणणे मोठे कठीण काम असल्याचे त्या निमित्त जाणवले . बदलत्या काळाप्रमाणे आपला हा कायदादेखील काही प्रमाणात बदलावा लागेल असेही दिसून आले . माझ्या या एक वर्ष्यातील कामामुळे मला ही सर्व विविधता पाहता आली, अनुभवता आली . या वर्षात मी माझे ११०% योगदान देण्याचा प्रयत्न केला तो यशश्वी झाला याचे मला खूप समाधान आहे . वर्षभर ई फेरफार प्रकल्पाच्या गुणवत्तापूर्ण कामासाठी केलेले प्रयत्नांची महारष्ट शासनाने दाखल घेतली व या ई फेरफार प्रकल्पातील अमूल्य योगदानाबद्दल महसूल विभागाचे प्रधान सचिव मा. मनुकुमार श्रीवास्तव सरांनी प्रशस्तीपत्रक देऊन सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांचे उपस्ठीतीत यशदा पुणे येथे माझा गौरव केला . माझ्या या कामात मला शासन स्थरावर विभागाचे उप सचिव डॉक्टर संतोष भोगले व मयूर मिटकरी यांचे मोलाचे सहकार्य लाभले . या निमित्ताने रामदास जगताप पूर्ण राज्यात किमान महसूल विभागाला माहीत झाला. उप जिल्हाधिकारी असतानाच पूर्ण राज्यात काम करण्याचे भाग्य मला मिळाले. त्यासाठी मी आमचे जिल्ह्याधिकारी पुणे मा.श्री.सौरभ राव सर व विभागीय आयुक्त मा.श्री.दळवी सर आणी जमाबंदी आयुक्त श्री. चोक्कलिंगम सर यांचे आभार मानतो . माझ्या या प्रयत्नात माझे हेल्प डेस्क मधील सहकारी डॉ.गणेश देसाई , कृष्णा पास्ते , सचिन भैसाडे , श्यामल काकडे , श्रीमती पाटणे व नायब तहसीलदार श्रीमती नाझीरकर तसेच NIC चे सेनिअर टेकनिकाल डायरेक्टर श्री समीर दातार साहेब व कक्ष अधिकारी श्री देशमुख साहेब यांचे मोलाचे सहकार्य मिळाले . सन २०१७ च्या यशपुर्ती मध्ये NIC ची DEVELOPMENT team , SUPPORT team , राज्यातील सर्व तलाठी , मंडळ अधिकारी सर्व DDE व सर्व महसूल अधिकाऱ्यांचे मनपूर्वक धन्यवाद .
या प्रकल्पासाठी काम कार्यासाठी माझ्या घरच्या सर्व जबाबदार्या पार पडणार्या HOME MINISTER अर्थात सौ, अनिता हिस मनपूर्वक धन्यवाद तसेच चि. प्रणव व कु. प्राजक्ता हिस शुभ आशीर्वाद .
पुढील वर्ष्यातील आपल्या DIGITAL INDIA च्या कामासाठी DIGITAL हार्दिक शुभेच्या .
पुढील वर्ष्यात देखील आपले असेच सहकार्य मिळेल अशी अपेक्षा बाळगतो .
HAPPY NEW YEAR 2018 ...........................
आपला
रामदास जगताप
सर नवीन वर्षाच्या खूप खुप शुभेच्छा
ReplyDeleteआपले या प्रकल्पातील योगदान खरच न भूतो न भविष्यती असे आहे .आपल्या कार्याला मानाचा मुजरा .
आपण उल्लेख केल्याप्रमाणे खरच बदलत्या काळाप्रमाणे महसूल कायदा बदलावा लागणार आहे ही वस्तुस्थिती आहे आणि मागील 2 वर्षीच्या इ फेरफार आज्ञावलीच्या वापरातून या आज्ञवलीला ही बऱ्याच मोठ्या बदलाची आवश्यकता आहे ही वस्तुस्थिती या नवीन वर्षात मांडून सोडता आली म्हणजे खराखुरा भविष्याचा वेध घेता येईल
सचिन जगताप