रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

आज दिनांक १.१.२०१७ पासून अज्ञावालीमध्ये खालील सुधारणा - नवीन सुविधा देण्यात आल्या आहेत

नमस्कार मित्रांनो , आज दिनांक १.१.२०१७ पासून अज्ञावालीमध्ये खालील सुधारणा - नवीन सुविधा देण्यात आल्या आहेत . ई फेरफार - १. मयताचे नाव कमी करणे - हा फेरफार प्रकार आता वारस फेरफाराप्रमाणे खाते निवडुन करता येईल शिवाय सामाईक खात्यामध्ये मयत व्यक्तीच्यासमोर नमुद केलेले क्षेत्र आपोआप त्याच खात्यातील इतर व्यक्तीसमोर येईल व सामाईक खात्याचे क्षेत्र शून्य होणार नाही. अशी सुधारणा करणेत आली आहे २. खरेदी फेरफारमध्ये पैकी जमिन घेतली असल्यास देणा-याचे क्षेत्र कमी होत होते परंतु घेणा-याच्या नावासमोर क्षेत्र येत नव्हते अशी समस्या आता येणार नाही. ३. भोगवटादार वर्गा चे उपप्रकार आता बदलता येतील. ४. Mutation cell कडुन आलेले फेरफाराची री-एन्ट्री अनोंदणीकृत मधुन करता येत होती आता Mutation cell कडुन आलेले फेरफाराची री-एन्ट्री नोंदणीकृत मधुनच करता येईल, शिवाय नोटीस generate करताना Mutation cell ला येणारे एरर आता येणार नाही. अशी सुधारणा करणेत आली आहे ODC :- इतर अधिकारातील माहिताचा क्रम बदलण्याची सुविधा दिली आहे. रामदास जगताप

Comments

Archive

Contact Form

Send