रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

दिनांक १९/१२/२०१७ पासून आज्ञावलीत देणेत आलेल्या नवीन सुधारणा / सुविधा.

क्र.रा.भू.अ.आ.का.4/प्र.क्र. /2017 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे पुणे, दिनांक 20/12/2017. प्रति, डी.डी.ई. तथा उपजिल्हाधिकारी, (सर्व.) विषय : - दिनांक १९/१२/२०१७ पासून आज्ञावलीत देणेत आलेल्या नवीन सुधारणा / सुविधा. संगणकीकृत 7/12, 8अ मधील दुरुस्त्यांसाठी खालील प्रमाणे नविन सुविधा दि.19/12/2017 पासुन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत. १. USER CREATION मध्ये कोणत्याही वापरकर्त्याची पदोन्नती किंवा पदावनती करण्याची सोय डी डी ई / डी सी आर / डी बी ए लॉगीन ला देणेत आली आहे . २. एकाच नोंदणीकृत दस्तामध्ये अनेक स. नं. / गट नं. समाविष्ट असल्यास फेरफार कक्षा मध्ये एका पेक्षा अनेक स. नं./ गट नं. निवडून साठवण्याची सुविधा विकसित करणेत आली आहे. ( तहसिलदार श्रीवर्धन, जिल्हा रायगड यांची विनंती ) ३. पिकपाहणी सुटसुटीत व गतीने होण्यासाठी OCU( चालू हंगामासाठी ) and OCU_BACKLOG ( मागील वर्षाची अपुर्ण पीक पाहणीसाठी ) असे दोन विभागात काम करण्याची सुविधा दिली आहे ( नागपूर, यवतमाळ, अमरावती, पुणे व कोल्हापूर जिल्ह्यांना UAT साठी दिले आहे. ) ४. ई फेरफार मधील प्रलंबित फेरफारची गांवनिहाय MIS पाहण्याची सुविधा विकसित केली आहे. आता प्रत्येक गावातील प्रलंबित फेरफार कालावधीनिहाय व कारणासह MIS मध्ये DBA/TAHASILDAR / SDO / DDE / DCR / COLLECTOR / DIV. COMMNR यांना पाहता येईल . ५. चावडी वाचनाच्या विशेष मोहिमेनंतर RE- EDIT मधून सर्व गावांचे घोषणापत्र-३ पूर्ण झालेल्या तालुक्यात एकाच आदेश USER CREATION मधून तहसिलदार यांचे BIOMETRIC लॉगीन ने काढून अचूक संगणकीकृत ७/१२ चे प्रख्यापन झालेबाबत घोषणा करता येईल. त्यानंतर तो तालुका परिपूर्ण संगणकीकृत झाला असे समजले जाईल. ६. एका पेक्षा जास्त पानांच्या ७/१२ प्रिंट होताना त्याचे प्रत्येक पानावर गावाचे नाव, तालुका, जिल्हा व सर्व्हे क्रमांक छापला जाईल. ( FEEDBACK पेंडिंग आहे. ) ७. वाशिम जिल्ह्याच्या मागणी प्रमाणे घोषणापत्र - ३ झालेल्या गावातील HISTORY तील चुकीचे फेरफार क्रमांक DELETE / नष्ट करण्याची सुविधा ई फेरफार मध्ये आदेश व दस्त ऐवज या प्रकारात देणेत आली आहे. ८. गहाणखताच्या फेरफाराची RE ENTRY केल्यास नवीन फेरफार क्रमांक पडण्याची अडचण दूर करणेत आली आहे. तसेच गहाणखताच्या फेरफाराची RE ENTRY सुरु करणेत आली आहे. ( THAT BUGS FIXTED) ९. दुय्यम निबंधक यांचे कडून खरेदीदाराचे क्षेत्र शुन्य आले असल्यास असा दस्त फेरफार कक्षात नष्ट करण्याची सुविधा देणेत आली आहे, त्या नंतर अशा दस्ताची अनोंदणीकृत पद्धतीने फेरफार नोंद घेता येईल. १०. एकाच स.नं. वर दोन दस्त नोंदणी झाल्यास अशा स. नं. वर फेरफार तयार होत नव्हता, आता ही अडचण दूर करणेत आली आहे. ( THAT BUGS FIXTED) वरील प्रमाणे सर्व सुविधांचा वापर करणेबाबत सर्व वापरकर्ते यांना आपले स्तरावरुन सुचना देण्यात याव्यात. सोबत – अनुषंगिक User Manuale जोडले आहे. आपला विश्वासु, ( रामदास जगताप ) उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का. जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे.

Comments

Archive

Contact Form

Send