रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ODC, ई-फेरफार, Re-edit मधील आज पासुन दिलेल्या सुविधा. दिनांक २९.११.२०१७

क्र.रा.भू.अ.आ.का.4/रा.स./25 /2017 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे पुणे दिनांक 29/11/2017 प्रति, डी.डी.ई. तथा उपजिल्हाधिकारी, (सर्व.) विषय - ODC, ई-फेरफार, Re-edit मधील आज पासुन दिलेल्या सुविधा. महोदय, ODC, ई-फेरफार, Re-edit मध्ये आज पासुन खालील प्रमाणे सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत :- १) ODC Module मध्ये इतर अधिकारातील माहितीची क्रमवारी बदलणे या पर्यायाचा वापर करून इतर अधिकारातील माहितीची क्रमवारी बदलता येईल. सदर सुविधा ODC मोडूल मध्ये दुरुस्तीच्या सुविधा या बटन मध्ये देण्यात दिलेली आहे. २) ई-फेरफार - मंडळ अधिकारी यांच्या लॉगिनमध्ये पडताळणी सुची मध्ये नोंद प्रमाणित व नोंद नामंजुर अशी सुची व्यतिरीक्त दोन बटन दिली आहे सदर बटनापैकी एक बटनावर टिक करणे आवश्यक आहे जर नोंद प्रमाणित या बटनावर टिक केल्यास मंडळ अधिकारी यांच्या मुख्य पेजवर नोंद नामंजुर हे बटन बंद झालेले दिसेल व मंजुर बटन चालु असेल त्याच प्रमाणे नोंद नामंजुर या बटनावर टिक केल्यास मंडळ अधिकारी यांच्या मुख्य पेजवर नोंद नामंजुर हे बटन चालू दिसेल व नोंद मंजुर बटन बंद असेल. पडताळणी सुची निवडल्यानंतर येणारा मंडळ अधिकाऱ्याचा शेरा दुरुस्ती करता येत असल्याने अनेक सर्व्हे नंबर पैकी एखादा सर्व्हे नामंजुर करायचा असल्यास असा शेरा योग्य तो बदल करुन (edit) फेरफार प्रमाणित करता येईल. (उदा: ‌‌--- सर्व्हे नंबर वगळुन नोंद प्रमाणित) ३) ई-फेरफार मध्ये शेती व बिगर शेतीचा ८अ वेगवेगळया पानावर दाखवला जात होता आता एकाच खातेदाराचे नावावर असलेली अशी शेती व बिगरशेतीची खाती एकाच पानावर दिसतील. ४) ई-फेरफार - अ‍हवाल -७ वारस फेरफार साठवा होत नसल्यास अहवाल त्रुटी बाबत योग्य संदेश दिला आहे. ५) ई-फेरफार मध्ये मंडल अधिकारी यांनी फेरफार पूर्वावलोकन करताना येणारा एरर -->"Index outside bounds of array" असा एरर येत होता त्यावेळेस village प्रोसेसिंग करावे लागे आता असा एरर येणार नाही. ६) ई-फेरफार - तलाठी लोगिनमध्ये SRO कडुन आलेले फेरफार री-एंट्री करतावेळी “दस्त क्रमांक याआधी भरलेला आहे” असा संदेश येत होता आता असा संदेश येणार नाही. ७) ई-फेरफार - दस्ताची अपुर्ण माहीती आल्यामुळे म्युटेशन सेल लोगीनमध्ये "mutation number already exists" असा संदेश येत होता आता असा संदेश येणार नाही. ८) री-एडीट मोड्युल - खाता प्रोसेसिंगमध्ये एखादे खाते निवडा केले व त्यानंतर सदर खात्याची विभागणी अथवा एकत्रीकरण केले असता पुन्हा सदर खाते प्रोसेसिंगमध्ये घेतल्यावर ७/१२ वरील नावे व खाता प्रोसेसिंगमधिल नावामध्ये फरक असल्यास "खाता मास्टरची खाता प्रोसेसिंगने दुरुस्त/अद्यावत केलेली माहीती पुर्ववत करणे" हे नविन बटन री-एडिट आज्ञावलीच्या मेनुमध्ये देण्यात आले आहे ते वापरावे. ९) री-एडीट मोड्युल - सर्व्हे नंबर वर ७/१२ व भोगवटदारांची माहिती मधिल नावांमध्ये फरक असल्यास "सर्व्हे क्रमांकावरील खातेदारांची अद्यावत/दुरुस्त केलेली माहीती पुर्ववत करणे" हे नविन बटन री-एडिट आज्ञावलीच्या मेनुमध्ये देण्यात आले आहे ते वापरावे. वरीलप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना सर्व वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवाव्यात. आपला विश्वासु, ( रामदास जगताप ) उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का. जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे

Comments

Archive

Contact Form

Send