विषय :- ई-फेरफार रि-एडिट कामकाज COMPUTER व INTERNET SPEED बाबत.
1. सर्व आज्ञावलीमध्ये काम करताना Forticlient चा वापर करताना प्रेत्यकाने आपला स्वतंत्र ID/Password वापरावा. Forticlient चा ID/Password ने लोगिन होत नसल्यास अथवा पासवर्ड reset करायचा असल्यास webmail.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर उपलब्ध आहे परंतु reset नसल्यास खालील नमुन्यात महिती dcoadmin@maharashtra.gov.in या मेल वर पाठविणे तसेच हेल्पडेस्क मो. नंबर 9920160265 वर संपर्क करावा मात्र सर्वांनी एकच login ID व password वापरु नये.
District Name Taluka Name Name of user Desig-nation User Contact Number Sevarth ID Date of Birth Reporting officer Name & mobile No Nature of problem
1 2 3 4 5 6 7 8 9
2. आज्ञावलीमध्ये काम करताना Internet चा speed कमीत कमी 516 kbps पेक्षा कमी असु नये व Wireless Internet वापरत असल्यास Internet चा speed एक सारखा असायला हवा अन्यथा Wire Internet वापरावे.
3. NICNET, MSWAN किंवा VPN Connectivity वापरत असाल तर Forticlient ची लोगिन करण्याची गरज नाही.
4. Computer Configuration - Windows 7 SP1 64bit or windows 8,10 operating system, Internet explorer 11, Forticlient, DSC drivers concern company, ActiveX control setting, PDF reader, For Remote use- AnyDesk, Marathi typing software, biometric setup concern company drivers.
5. ActiveX control (Signature-data signing component) प्रत्येक जिल्हासाठी आज्ञावलीच्या landing page वर स्वतंत्र ActiveX control दिले आहे ते download करुन घ्यावे download झालेले ActiveX control “Signature_district name” या नावाने save होईल, त्यानंतर Control Panel\All Control Panel Items\Programs and Features मधुन जुने “Signature” नावाने असलेले ActiveX control uninstall करावे व computer/laptop ला reboot करावे. Reboot झाल्यानंतर नविन ActiveX control install करावे. BSNL Cloud वर असलेल्या जिल्हांसाठी BSNL ActiveX control (Signature) नव्याने install करुन घ्यावे. म्हणजे सर्व्हर स्पीडमध्ये सुधारणा झालेली जाणवेल.
6. वेळोवेळी Laptop मध्ये तयार झालेल्या temporary files delete कराव्यात (त्यासाठी RUN मध्ये %temp% असे type करुन temporary files चा फोल्डर ओपन होईल त्यामध्ये temporary files दिसतील त्या delete कराव्यात).
7. Date and Time ची setting करताना format व location मध्ये United States निवडावे व Date and Time चे format dd/MM/yyyy असे करावे.
8. ई-फेरफार आज्ञावलीसाठी वापरण्यात येणाऱ्या कॉम्प्युटर / लॅपटॉप मध्ये अनावश्यक Video games, Movies, Songs, Photos ठेवु नयेत. Desktop वर कमीत कमी फाईल्स/फोल्डर्स असाव्यात. सदर लॅपटॉप अन्य कामकाजासाठी शक्यतो वापरु नये.
सदरच्या सुचना सर्व वापरकर्त्यापर्यंत पोहोचवाव्यात.
आपला,
( रामदास जगताप )
उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक,
रा.भू.अ.आ.का. जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे.
Comments