रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई-फेरफार व्हर्जन -2 तयार करणेसाठी विषयतज्ञ उपसमित्या स्थापन करणेबाबत.

क्र.रा.भू.अ.आ.का.4/प्र.क्र. V.2 SUB COM/2017 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य) पुणे पुणे दिनांक 18 /11/2017 प्रति, जिल्हाधिकारी, (सर्व.) विषय – ई-फेरफार व्हर्जन -2 तयार करणेसाठी विषयतज्ञ उपसमित्या स्थापन करणेबाबत. संदर्भ –1. या कार्यालयातील विषय तज्ञ समिती बैठक दिनांक 16/11/2017. 1. सध्या राज्यभरात ई-फेरफार आज्ञावलीचा वापर गेल्या दोन वर्षापासून सुरु आहेत तथापि भविष्याचा विचार करुन DILRMP व शासनाच्या सुचना विचारात घेऊन शासनाच्या विविध विभागाच्या Database चा वापर करुन e-ferfar-v.2 (Integrated Module ) तयार करण्यासाठी विषयतज्ञ समितीतील सदस्यांचा समावेश असलेल्या खालीलप्रमाणे उपसमित्या स्थापन करण्यात येत आहेत. कमेटी क्रमांक 1. ई-फेरफार विषयतज्ञ उपसमिती 1. श्री.राजेंद्र खंदारे – निवासी उपजिल्हाधिकारी , उस्मानाबाद - प्रमुख 2. श्री. अमित पुरी – नायब तहसिलदार, जिल्हा जालना – सदस्य 3. श्री विपिन उगलमुगले- तलाठी, जिल्हा कोल्हापूर 4. श्री. शिवानंद वागदकर, तलाठी जिल्हा बुलढाणा 5. श्री. सचिन जगताप, तलाठी जिल्हा जळगांव 6. श्री. पंडित चव्हाण तलाठी, जिल्हा सांगली 7. श्री.कामराज चौधरी तलाठी पुसद , जिल्हा यवतमाळ 8. श्री.शशिकांत सानप तलाठी, जिल्हा रायगड 9. श्री. अमोल रामशेट्टे तलाठी अहमदपूर, जिल्हा लातुर कमेटी क्रमांक 2. पिकांची नोंदणी (Crop Module) - विषयतज्ञ उपसमिती 1. श्री.राजेश खवले –उपजिल्हाधिकारी महसूल , अकोला - प्रमुख 2. श्री. सचिन पाटील – तहसिलदार, कारंजा, जिल्हा वाशिम– सदस्य 3. सौ. मोहनमाला नाझीरकर, नायब तहसिलदार तथा विभागीय समन्वयक, नागपुर 4. श्री. प्रसाद रानडे, तलाठी जिल्हा अकोला 5. श्री. प्रशांत कांबळे, तलाठी जिल्हा अहमदनगर 6. श्री. श्री. शिवानंद वागदकर, तलाठी जिल्हा बुलढाणा कमेटी क्रमांक 3. विविध विभाग जोडणे (linkage) -विषयतज्ञ उपसमिती 1. श्री.शशिकांत मंगरुळे –उपजिल्हाधिकारी (नाशिक) - प्रमुख 2. श्री. हरिश धार्मिक – उपविभागीय अधिकारी चिमूर, जिल्हा चंद्रपुर– सहप्रमुख 3. श्री. राजू थोटे , तहसिलदार अहमदनगर 4. श्री. सचिन कुमावत, तहसिलदार, कारंजा (घाडगे), जि.वर्धा 5. श्री. जे.डी.बंगाळे, तलाठी जिल्हा जळगांव 6. श्री. प्रशांत कांबळे, तलाठी जिल्हा अहमदनगर कमेटी क्रमांक 4. ई-चावडी व अहवाल -विषयतज्ञ उपसमिती 1. श्री.विकास गजरे –उपविभागीय अधिकारी,जिल्हा पालघर - प्रमुख 2. श्री. संदिप चव्हाण –तहसिलदार, कोकण भवन, जिल्हा रायगड 3. श्री.विशाल दौंडकर – तहसिलदार तलासरी, जिल्हा पालघर 4. श्री. चामणीकर, मंडळ अधिकारी, जिल्हा औरंगाबाद 5. श्री. सचिन वाघ, मंडळ अधिकारी, रायगड 6 .श्री. विजय तोडकर, मंडळ अधिकारी, सांगली 7. श्री. प्रसाद ठाकणे तलाठी, रायगड कमेटी क्रमांक 5. Database Structure -विषयतज्ञ उपसमिती 1. श्री.रामदास जगताप – राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प - प्रमुख 2. श्री. समीर दातार – वरिष्ठ तांत्रिक संचालक, जमाबंदी कार्यालय, पुणे 3. श्री. रणजित देशमुख – कार्यालय अधीक्षक रा.भू.अ.आ.का.4 जमाबंदी कार्यालय, पुणे 4. श्री. गणेश देसाई – औरंगाबाद विभाग समन्वयक ई-फेरफार प्रकल्प वरीलप्रमाणे नियुक्त विषयतज्ञ उपसमिती प्रमुखांना अन्य सदस्य यांच्या इच्छेप्रमाणे घेता येतील तसेच तलाठी / मंडळ अधिकारी संघटना प्रतिनिधीना देखील समावून घेता येईल. 2. गरजेप्रमाणे या उपसमित्यांचा अभ्यास दौरा, विचारमंथन, चर्चासत्र, सादरीकरण अथवा प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी घ्यावयाच्या बैठकांचे नियोजन उपसमिती प्रमुख करु शकतील. त्यासाठी यशदा, नाशिक/ अमरावती येथील महसूल प्रबोधिनी व औरंगाबाद येथील भूमी अभिलेख विभागाची प्रबोधिनीप्रमुख आवश्यक ते सहकार्य करतील. यासाठी येणारा खर्च उपसमिती प्रमुखांच्या जिल्हाधिकारी यांनी जिल्हा सेतू समितीच्या निधीतुन करावा. 3. विषयतज्ञ उपसमिती खाली नेमून दिलेल्या तारखाना जमाबंद आयुक्त यांना सादरीकरण करावे. या सादरी करणाचे वेळी अन्य विषयतज्ञ उपसमितीचे सदस्यदेखील हजर राहू शकतील. अ.नं विषयतज्ञ समिती प्रथम सादरीकरणाचा दिनांक द्वितीय सादरीकरणाचा दिनांक 1. ई-फेरफार उपसमिती 5 व 6 डिसेंबर, 2017 27 व 28 डिसेंबर, 2017 2. पिकांची नोंदणी (Crop Module) - उपसमिती 2 डिसेंबर, 2017 20 डिसेंबर, 2017 3 ई-चावडी व अहवाल - उपसमिती 29 नोंव्हेंबर, 2017 15 डिसेंबर, 2017 4. विविध विभाग जोडणे (linkage) उपसमिती 28 नोव्हेंबर, 2017 22 डिसेंबर, 2017 विषयतज्ञ उपसमितीचे कार्यक्षेत्र (Scope of Work) 1. e-Ferfar – permission by competent authorities, legal provisions, land acquisitions, Mutation trigger by competent authority / department. 2. Crop Module - अनुदान वाटप, Agricultural census. 3. e-Chavdi & Reports- तलाठी दप्तरातील 1 ते 21 नमुने User Creation, Public Data Entry, Aadhar Linking / Photo Linking, Full Address, email i.d., Sell No., Bank Account No. 4. Linkage of other Govt. departments – Linkage to Agricultural census, e-Record, e-Disnic, e-Court, Caste Certificate Authority, Birth/Death/Marriage Registrars, PDS, SGY/IGY and other social schemes, N.A.tax collection for property card, Felling of Trees permission etc. 4. विषयतज्ञ उपसमित्यांच्या कार्यक्षेत्राबाबत दिनांक 16/11/2017 रोजीच्या विषयतज्ञ समिती बैठकीमध्ये सविस्तर चर्चा झालेली आहे तथापि याबाबत सर्व बाबी समाविष्ठ करुन यापेक्षा जास्त समावेशक आज्ञावली विकसनाबाबत प्रथम बैठकीच्या वेळी सादरीकरण करण्यात यावे. Best Practices च्या समावेशनाबाबत तज्ञ समिती महसूल कायदा, नियमामध्ये आवश्यक सुधारणा व नविन शासन धोरणाबाबत देखील विषयतज्ञ समित्या अभ्यास करुन सविस्तर अहवाल सादर करतील. 5. 30 डिसेंबर, 2017 पुर्वी आपल्या कामाचा कर्नाटक राज्याच्या धर्तीवर Document व सादरीकरण जमाबंदी आयुक्त कार्यालयाला सादर करावे. त्यानंतर आज्ञावली विकसनाबाबत विकसकांसोबत चर्चा करुन पुढील निर्णय घेण्यात येईल. उपरोक्त कालमर्यादा पाळली जाईल याची सर्व समितीप्रमुख आणि सदस्यांनी दक्षता घ्यावी. 6. या कामासाठी संबंधित जिल्हाधिकारी व त्या त्या कर्मचारी / अधिकारी यांचे कार्यालय प्रमुख यांनी त्यांच्या नियमित कामामधुन शक्य तितकी सवलत त्यांना देण्यात यावी व हे काम निर्धारीत वेळेत पुर्ण होईल यासाठी दक्षता घ्यावी. आपला विश्वासू xxx सही ( एस. चोक्कलिंगम) जमाबंदी आयुक्त तथा संचालक भूमी अभिलेख ( म.रा.), पुणे प्रति, 1. मा. प्रधान सचिव ( महसूल व नोंदणी ), महसूल व वन विभाग , मंत्रालय , मुंबई 2. विभागीय आयुक्त (सर्व) 3. महासंचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा),पुणे 4. उपसंचालक, यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), नाशिक / अमरावती. 5. प्राचार्य, भूमी अभिलेख प्रशिक्षण प्रबोधिनी औरंगाबाद 6. विषयतज्ञ उपसमिती प्रमुख व संबंधीत सदस्य. अ. न.३,४,व ५ यांना विषय तज्ञ समिती प्रमुखांनी मागणी केल्यास त्यांना गरजे प्रमाणे आपल्या प्रबोधिनी मध्दे आपले संस्थेत योग्य ती सुविधा देनेत यावी . ( रामदास जगताप ) उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प , जमाबंदी आयुक्त कार्यालय महाराष्ट्र राज्य , पुणे

Comments

Archive

Contact Form

Send