रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई-फेरफार प्रणालीची अंमलबजावणी आज्ञावलीतील पिके समाविष्ट करणेबाबत

क्र.रा.भू.अ.आ.का.4/ आज्ञावलीतील पिके/17 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य ), यांचे कार्यालय, पुणे दिनांक -15 /11/2017. प्रति, मा.उपजिल्हाधिकारी , तथा डी.डी.ई.(सर्व). विषय : - ई-फेरफार प्रणालीची अंमलबजावणी आज्ञावलीतील पिके समाविष्ट करणेबाबत. महोदय, आपल्याला हे माहित आहेच की,ई –फेरफार आज्ञावलीच्या अंमलबजावणीमध्ये गा.न.नं.7/12 अद्यावत ठेवण्यासाठी पिकांच्या योग्य त्या नोंदी गा.न.नं.7/12 च्या नमुना १२ सदरी घेण्यासाठी OCU (Online Group Updation) Utility उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्या मध्ये कृषी गणना संचालनालयाकडून दिलेल्या पिकांच्या नोंदी पिक पाहणीस घेणे अपेक्षीत आहे. मात्र काही जिल्हयात काही पिकांची नावे पिक पाहणीच्या नोंदी घेण्यासाठी उपलब्ध नाहीत अशा तक्रारी करण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक असलेल्या अशा पिकांची नावे आज्ञावलीत समाविष्ट करण्याची सुविधा तालुक्यांच्या DBA Login ला ( नायब तहसिलदार ) देण्यात आली आहे. मात्र आपण समाविष्ट करणारे पिक कृषी गणना संचलनालयाच्या अधिकृत यादीतील असावे (सोबत त्याची यादी जोडली आहे. ) समाविष्ट करावयाचे पिकाच्या प्रवर्गातील आहे तो प्रवर्ग निवडून पिकांचे नाव समाविष्ट करण्यात यावे.स्थानीक रित्या उपयोगात येत असलेली पिकांची नावे समाविष्ट करून नयेत. जसे-दादर,धान इ. तसेच आपल्या तालुक्यात घेत असलेली प्रमुख पिकांची नावे निवडण्याची (Selection ) सुविधा देखील DBA Login ला देण्यात आली आहे त्याचा योग्य वापर करावा. सोबत कृषी गणना संचालनालयाची पिकांची यादी व समाविष्ट करण्याची SOP जोडली आहे. सदरच्या सुचना सर्व DBA यांच्यापर्यंत पोहचवाव्यात हि विनंती आपला विश्वासू , ( रामदास जगताप ) उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणे प्रत- मा.विभागिय आयुक्त पुणे, मुंबई ,नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपुर यांना माहितीस्तव सविनय सादर.

Comments

Archive

Contact Form

Send