रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई-फेरफार आज्ञावली व्हर्जन-2 साठी विषयतज्ञ समितीवर सदस्य म्हणून प्रतिनिधी नामनिर्देश करणेबाबत.

क्र.रा.भू.अ.आ.का.4/विषय तज्ञ समिती प्रतिनिधी/17 जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख (महाराष्ट्र राज्य ), यांचे कार्यालय, पुणे दिनांक -17/11/2017. प्रति, श्री.शाम जोशी, सरचिटणीस, तलाठी मंडळ अधिकारी , समन्वय महासंघ. श्री.ज्ञानदेव डुबल, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य तलाठी महासंघ. श्री. मनोज दांगडे, सचिव विदर्भ पटवारी महासंघ. श्री.एस.व्ही.गवस, रत्नागिरी सिंधुदुर्ग तलाठी संघ. श्री.डी.के.काटकर, विदर्भ मंडळ अधिकारी संघ नागपुर. विषय - ई-फेरफार आज्ञावली व्हर्जन-2 साठी विषयतज्ञ समितीवर सदस्य म्हणून प्रतिनिधी नामनिर्देश करणेबाबत. संदर्भ- 1) जमाबंदी आयुक्त कार्यालयातील विषयतज्ञ समिती बैठक दि.16/11/2017. महोदय, आपल्याला माहित आहेच की राज्य शासनाने 7/12 संगणकीकरणासाठी ई-फेरफार प्रणाली सध्या राज्य भर वापरण्यात येत आहे. त्यातील त्रुटी दुर करून भविष्याचा विचार करून सर्व समावेशक आज्ञावली व्हर्जन 2 चे विकसन करण्यासाठी कर्नाटक राज्य शासनाच्या भूमी आज्ञावलीचा अभ्यास करून महाराष्ट्र राज्यातील कायदे व नियम विचारात घेऊन अहवाल सादर करण्यासाठी खालील चार विषय तज्ञांच्या उपसमित्या तयार करण्यात आल्या आहेत. 1) ई-फेरफार विषयतज्ञ उपसमिती – श्री.राजेंद्र खंदारे निवासी उपजिल्हाधिकारी उस्मानाबाद (मो.नं.-9011000964 ). 2) ई चावडी व अहवाल विषयतज्ञ उपसमिती- श्री.विकास गजरे उपविभागीय अधिकारी, पालघर (मो.नं.- 9545888885 ). 3) पिक पाहणी विषयतज्ञ उपसमिती- श्री.राजेंद्र खवले उपजिल्हाधिकारी (महसुल) अकोला (मो.नं.- 9850345176 ). 4) विविध विभागांशी जोडणी ( लिंकेज ) विषयतज्ञ उपसमिती- श्री.शशिकांत मंगरूळ उपजिल्हाधिकारी (प्रशासन) नाशिक (मो.नं.-9822000160) व श्री.हरिश धार्मीक- उपविभागिय अधिकारी चिमुर जिल्हा-चंद्रपुर (मो.नं.- 9764645087). राज्यभरातील सध्याची प्रचलीत कार्यपध्दती व कायदे, नियम, शासन धोरण ह्याचा विचार करून भविष्यातील सर्व समावेशक आज्ञावलीच्या निर्मितीसाठी या विषयतज्ञ उपसमितीवर आपल्या संघटनेच्या वतीने या विषयातील जाणकार कर्मचारी काम करण्यास इच्छुक असल्यास आपलेला प्रत्येक उपसमितीवर दोन कर्मचारी नामनिर्देशीत करता येतील म्हणजे नविन व्हर्जन तयार करतानाच ते सर्व समावेशक व वापरकर्त्यांस सुसह्य होईल अशी अपेक्षा आहे. आपले प्रतिनिधींची नावे परस्पर विषयतज्ञ उपसमिती प्रमुखांकडे दोन दिवसात कळवून त्याची प्रत इकडे पाठवावी ही विनंती. आपला विश्वासू मा.जमाबंदी आयुक्त यांचे सुचनेप्रमाणे ( रामदास जगताप ) उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई-फेरफार प्रकल्प जमाबंदी आयुक्त कार्यालय,पुणे. प्रत मा. उप जिल्हाधिकारी तथा विषयतज्ञ उपसमिती प्रमुख

Comments

Archive

Contact Form

Send