ई फेरफार अंमलबजावणी. विभागीय हेल्प डेस्क कर्मचारी पाठविणेबाबत.
क्रमांक रा.भू.अ.आ.का.5/हेल्प डेस्क/2017
जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख,
(म.राज्य )पुणे यांचे कार्यालय
पुणे दिनांक 10/11/2017
प्रति,
मा.उप आयुक्त (महसूल)
विभागीय आयुक्त कार्यालय
कोकण, पुणे,नाशिक,अमरावती,नागपूर
विषय - ई फेरफार अंमलबजावणी.
विभागीय हेल्प डेस्क कर्मचारी पाठविणेबाबत.
संदर्भ - 1) या कार्यालयाकडील पत्र क्रमांक रा.भू.अ.आ.का.5/2017/हेल्प डेस्क/2017 पुणे
दिनांक 03/08/2017 ,
2) या कार्यालयाकडील पत्र क्रमांक रा.भू.अ.आ.का.5/2017/हेल्प डेस्क/2017 पुणे
दिनांक 16/08/2017,
3) या कार्यालयाकडील पत्र क्रमांक रा.भू.अ.आ.का.5/2017/हेल्प डेस्क/2017 पुणे
दिनांक 08/09/2017,
4) या कार्यालयाकडील पत्र क्रमांक रा.भू.अ.आ.का.5/2017/हेल्प डेस्क/2017 पुणे
दिनांक 16/09/2017
विषयांकितकामी उपरोक्त संदर्भिय पत्रांचे अवलोकन होणेस विनंती. DILRMP अंतर्गत ई -फेरफार आज्ञावलीच्या
अंमलबजावणीसाठी या कार्यालयात कार्यरत हेल्प डेस्कमध्ये प्रत्येक विभागासाठी प्रत्येकी एक कर्मचारी कार्यरत आहे. तथापी सध्या
चावडीवाचनामध्ये प्राप्त आक्षेप व तपासणीत आढळून आलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी Re-Edit Module उपलब्ध करून देण्यात आले आहे. त्याचे
प्रत्यक्ष अंमलबजावणीत येत असलेल्या अडचणी सोडविण्यासाठी या एकाच कर्मचा-यावर खूप ताण पडत आहे. तसेच त्यामुळे प्राप्त प्रश्नांची
सोडवणूक देखील वेळेत होत नाही. उपरोक्त संदर्भिय पत्रांन्वये Re-Edit Moduleचे काम संपेपर्यंत आपल्या विभागातून अनुभवी व ऑनलाईन
कामाची आवड असणा-या एका कर्मचा-याची सेवा इकडे वर्ग करण्याबाबत व सदर कर्मचा-याला तात्काळ या कार्यालयात रुजू होण्यासाठी
आपले स्तरावरून आदेशित करण्याबाबत उपरोक्त संदर्भिय दि.3/8/2017 रोजीचे पत्रान्वये कळविणेत आले होते. तथापी औरंगाबाद
विभागाव्यतिरिक्त इतर 5 विभागांचा एकही जादा कर्मचारी/अधिकारीया कार्यालयाकडे या कामासाठी रुजू झालेला नाही. याबाबत अनेकवेळा
स्मरणपत्र देखील पाठविण्यात आली आहेत. तथापी अद्याप कर्मचा-यांची प्रतिक्षा कायम आहे. महसूल विभागाच्या अत्यंत महत्वाच्या या
कार्यक्रमातील काम गुणवत्तापूर्ण होण्यासाठी व अडचणींची वेळेत सोडवणूक होण्यासाठी एक जादा कर्मचा-याची सेवा आपले विभागातून इकडे
वर्ग करावी ही विनंती.
आपला विश्वासू,
सही
(रामदास जगताप )
राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे
प्रत - जिल्हाधिकारी (सर्व ) यांना माहितीसाठी
प्रत - डी. डी. ई. (सर्व ) यांना माहितीसाठी
Comments