VPN Account Creation साठी माहिती पाठविणेबाबत.
क्र./रा.स./ का.वि./19 /2017.
जमाबंदी आयुक्त आणि संचालक,
भूमि अभिलेख (म.राज्य), पुणे
दिनांक - /10/2017.
प्रति,
उप जिल्हाधिकारी तथा
डिस्ट्रीक्ट डोमेन एक्सपर्ट (सर्व.)
विषय --VPN Account Creation साठी माहिती पाठविणेबाबत.
सद्या SDC वर असलेल्या 7/12 चा डेटा वापरुन ई-फेरफार घेण्यासाठी forticlient या VPN चा वापर करण्यात येत आहे. तथापि चावडी वाचनाच्या विशेष मोहिमेनंतर अचुक गा.न.नं. 7/12 व 8 अ तयार करण्यासाठी आवश्यक त्या दुरुस्त्या करुन ज्या तालुक्याच्या सर्व गावांचे घोषणापत्र - 3 पुर्ण करण्यात आले आहे, अशा गावांचा Cleaned Data राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे येथील NDC ( National Data Centre ) या ठिकाणी स्थापित करण्यात येणार आहे व यावर फक्त ई-फेरफार व User Creation या दोनच Utility वापरल्या जाणार आहेत. NDC वरील डाटा वापरुन ई-फेरफार घेण्यासाठी प्रत्येक वापरकर्त्यांचे राष्ट्रीय सूचना विज्ञान केंद्र, पुणे चे VPN Account Open करणे आवश्यक आहे. यासाठी आपल्या जिल्हयातील ज्या तालुक्यांच्या सर्व गावांचे घोषणापत्र - 3 पुर्ण झाले आहेत. संबधीत जिल्हयाचे DDE व त्या तालुक्यातील सर्व वापरकर्ते (तलाठी, मंडळ अधिकारी, MCI, DBA, तहसिलदार ) यांचे VPN Account तयार करण्यासाठी सोबतच्या Annexure-I मधील माहिती (Soft copy व तहसिलदार यांच्या स्वाक्षरीचे घोषणापत्राची स्कॅन कॉपी) संबंधीत विभागाच्या हेल्प डेस्क व राज्य समन्वयक statecordinatormahaferfar@gmail.com यांचे ई-मेल वर तातडीने पाठवावी. सदर माहिती तयार करण्यासाठी DIO यांची मदत घ्यावी. सोबत याबाबतचे Procedure Document जोडले आहे.
अशा तालुक्यातील सर्व वापरकर्त्यांचे VPN Account सुरु झाल्याबरोबर सर्व Cleaned Deta NDC, पुणे येथे स्थानांतरीत करण्यात येईल याची नोंद घ्यावी.
सदरच्या सूचना सर्व वापरकर्त्यांच्या निदर्शनास आणाव्यात ही विनंती.
आपला,
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे
Comments