रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

अचुक गा.न.नं. 7/12 व 8अ साठी घोषणापत्र-3 करुन गुणवत्तापुर्वक काम करणेबाबत चेकलिस्ट

नमस्कार मित्रांनो अचुक गा.न.नं. 7/12 व 8अ साठी घोषणापत्र-3 करुन गुणवत्तापुर्वक काम करणेबाबत चेकलिस्ट 1 घोषणापत्र -3 पुर्ण केलेल्या गावांतील दुरुस्त 7/12 च्या Print out काढुन त्यांची तपासणी पुर्ण करुन ठरवून दिलेल्या बिंदुच्या 7/12 वर तलाठी व मंडल अधिकारी व संबंधीत महसुल अधिकाऱ्याचे नांव व पदनाम टाकुन दिनांकित स्वाक्षरी केली आहे व हे सर्व स्वाक्षरीत 7/12 तालुका अभिलेख कक्षात जमा केले आहेत का ? 2 सर्व संबंधीत महसुल अधिकाऱ्यांनी 7/12 तपासणी केलेबाबत चे प्रपत्र - 1 मधील प्रमाणपत्र सादर केले आहेत. ( दिनांक 5/5/2017) व ते सर्व तालुका अभिलेख कक्षात जमा केले आहेत का? 3 घोषणापत्र - 3 पुर्ण करण्यापुर्वी ODC मधील सर्व 1 ते 26 अहवाल (1 व 3 वगळुन) व समान नांवे असलेल्या खाते क्रमांकाचा अहवाल निरंक करणेत आले आहेत का ? व तालुका समरी अहवालाची प्रत तलाठी, मंडल अधिकारी यांचे स्वाक्षरीने तालुका अभिलेख कक्षात जमा करुन घेतली आहे का ?. 4 घोषणापत्र – 3 करण्यापुर्वी पालक महसुल अधिकाऱ्याने या गावाचे घोषणापत्र – 2 झालेनंतर 1 ते 24 मुद्यांवर तपासणी करुन तपासणी अहवाल तलाठी, मंडळ अधिकारी यांचे मार्फत तहसिलदार यांचेकडे सादर केला आहे का ? व काम गुणवत्तापुर्वक पुर्ण झाल्याचे प्रमाणपत्र दिले आहे का ? 5 घोषणापत्र – 3 पुर्ण करण्यापुर्वी संगणकीकृत गा.न.नं. 1 (क) व हस्तलिखीत गा.न.नं. 1 (क) ची रुजवात घेतली असुन ते अचुक असल्याचे पालक महसुल अधिकाऱ्याने प्रमाणीत केले आहे का ? मुळ 1 (क) मध्ये वर्ग-2 च्या जमीनी अनाधिकारे वर्ग – 1 मध्ये घेतलेल्या नाहीत ना ? (याची खात्री) स्वत: पालक महसुल अधिकारी यांनी स्वत: केली आहे का ? 6 घोषणापत्र – 3 पुर्ण करण्यापुर्वी संगणकीकृत 8 अ (गावची खाते नोंदवही) Print out काढुन ती अचुक असल्याबाबत खात्री केली आहे का ? 7 घोषणापत्र – 3 पुर्ण करण्यापुर्वी सर्व अकृषीक 7/12 चे क्षेत्र आर.चौ.मी. मध्ये व शेती क्षेत्राचे 7/12 चे क्षेत्र हे.आर मध्ये बिनचुक भरुन अकृषीक क्षेत्राचा योग्य आकार भरल्याची खात्री करावी तहसिलदार यांचा क्षेत्र रुपांतराचा आदेश स्वाक्षरीत करून दिला आहे का ?. 8 Re-Edit Module च्या सर्व परिशिष्ट ब व आदेशाच्या प्रती स्वाक्षरीसह दप्तरी जमा करून घेतले आहे का ? 9 घोषणापत्र 1,2 व 3 च्या प्रती सर्व संबंधीतांच्या स्वाक्षरीसह तालुका अभिलेख कक्षात जमा करण्यात आल्याची तहसिलदार यांनी स्वत: खात्री करावी. सर्व प्रती तालुका अभिलेख कक्षात जमा करून घेतले आहे का ?

Comments

Archive

Contact Form

Send