RE EDIT कामाच्या तपासणीतील अनुभव
नमस्कार मित्रांनो ,
मी स्वत: दिनक ११, १२ व १३ ऑक्टोबर २०१७ रोजी जालना , वाशीम , हिंगोली व नांदेड या जिल्ह्यात समक्ष भेट देऊन RE edit च्या कामाची नमुना तपासणी केली . त्या तपासणीत आढळून आलेल्या काही तृटी व तपासणीतील अनुभव सर्वांच्या कामात गुणवत्ता राखली जावी म्हणून आपल्याशी SHARE करत आहे . या मध्ये कोणाच्या चुका काढण्याचा उद्देश नसून सर्वांना मार्गदर्शन व्हावे हा आहे , तरच आपले ZERO TOLERANCE TO ERROR हे तत्व पाळले जाईल असे मला वाटते .
१) मी जेवढी गावे तपासली त्या पैकी एकही गावचे मुळ हस्तलिखित ७/१२ मधील १०% तपासणी करून तो ७/१२ तहसीलदार यांनी प्रख्यापित केलेला होता असे दिसून आले नाही . या ७/१२ मधेच अनेक तृटी आहेत .
२) बऱ्याच गावच्या मुळ हस्तलिखित ७/१२ मध्ये जुने फेरफार क्रमांक घेतलेले नाहीत त्यामुळे ते संगणकीकृत ७/१२ मध्ये देखील आलेले नाहीत . योग्य फेरफार क्रमांक शिवाय ९/१२ अपुंर्ण व अर्थहीन आहे हे आपण ध्यानात घ्यावे .
३) काही संगणीकृत ७/१२ मध्ये चुकीचे फेरफार क्रमांक टाकाणेत आले आहेत व काही ७/१२ वर हस्तलिखित प्रमाणे फेरफार क्रमांक टाकलेले नाहीत .
४) मराठवाड्यात अनेक हस्तलिखित ७/१२ वर खातेदारांची आडनावे लिहिलेली नाहीत तथापि औरंगाबादच्या MASTER TRAINERS च्या विभागीय प्रशिक्षणा नंतर अनेक ठिकाणी अशी आडनावे नमूद करण्यात आली आहेत तथापि इतर हक्कातील खातादाराची आडनावे नमूद करायची शिल्लक आहेत .
५) अनेक तालुक्यात फक्त मंडळ अधिकार्यांना पालक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे , पालक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार , तहसीलदार , उप विभागीय अधिकारी व अन्य उप जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतलेली नाही .
६) खाता मास्टर चे काम योग्य रित्या पूर्ण करताच घोषणापत्र १ तलाठी यांनी केले आहे .
७) अनेक तालुक्यात पालक अधिकार्यांचा १ ते २४ मुद्द्यांचा तपासणी फॉर्म उपलब्ध झाला नाही . अशी तपासणी केलेली नसताना DBA यांनी घोषणापत्र २ केले आहे .
८) अनेक गावचे ७/१२ ठरवून दिलेल्या बिंदू प्रमाणे तपासणी करताच व त्यांचे प्रपत्र १ मधील प्रमाणपत्र ( तपासणी केलेल्या गट न. च्या यादी सह ) प्राप्तझाले नसताना घोषणापत्र ३ तहसीलदार यांनी केले आहे .
९) काही तालुक्यात भूमी अभिलेख , नोंदणी विभव व तहसीलदार यांचे कडील महसुली गावांची संख्या जळत नाही .
१०)अनेक गावात हस्तलिखित गाव नमुना न १(क) वर तहसीलदार यांची प्रतीस्वक्षरी नाही व हस्तलिखित १(क) व संगणकीकृत १(क) मध्ये रुजवात घेतलेली नाही .
अश्या स्वरूपाच्या तृटी आपल्या कामात राहणार नाहीत ह्याची दक्षता घ्यावी .
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प
जमाबंदी आयुक्त कार्यालय , महाराष्ट्र राज्य . पुणे
Comments