रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

घोषणापत्र - 3 झालेल्या गावांची तपासणी करणेबाबत.

नमस्कार मित्रांनो , संदर्भ - या कार्यालयाकडील क्र.रा.भू.अ.आ.का-4/घो.3 तपासणी.1/17 दिनांक 9/10/2017 चे पत्र. दिनांक ११, १२ व १३ ऑक्टोबर २०१७ रोजी या कार्यालयातील पथकाने काही जिल्ह्यात समक्ष भेट देऊन RE edit च्या कामाची नमुना तपासणी केली. त्यामध्ये आढळून आलेल्या प्रमुख त्रुटींचा विचार करता खालील प्रमाणे काळजी घेण्यात यावी. १) जेवढी गावे तपासली त्या पैकी एकही गावचे मुळ हस्तलिखित ७/१२ मधील १०% तपासणी करून तो ७/१२ तहसीलदार यांनी प्रख्यापित केलेला होता असे दिसून आले नाही . या हस्तलिखित ७/१२ मधेच अनेक तृटी आहेत . या बाबत तहसीलदार यांनी आपले स्थरावर योग्य ती दक्षता खावी . २) बऱ्याच गावच्या मुळ हस्तलिखित ७/१२ मध्ये जुने फेरफार क्रमांक घेतलेले नाहीत त्यामुळे ते संगणकीकृत ७/१२ मध्ये देखील आलेले नाहीत . योग्य फेरफार क्रमांक शिवाय ७/१२ अपुंर्ण व अर्थहीन आहे हे आपण ध्यानात घ्यावे . ३) काही जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी यांनी एक लाखापेक्षा कमी कर्जाचे बोजे ७/१२ वर घेणेत येऊ नयेत असे निर्देश परिपत्रक काढून दिले असलेने हस्तलिखीत ७/१२ मधील अनेक बोज्याच्या नोंदी संगणकीकृत ७/१२ वर घेतलेल्या नाहीत त्यामुळे हस्तलिखित ७/१२ व संगणकीकृत ७/१२ मध्ये तफावत दिसून येते . याबाबत योग्य तो फेरफार हस्तलिखित फेरफार निन्द्वाहित घेउन त्याचा अंमल हस्तलिखित ७/१२ वर घेणेतयावा म्हणजे अशी तफावत आढळून येणार नाही . ४) काही संगणीकृत ७/१२ मध्ये चुकीचे फेरफार क्रमांक टाकाणेत आले आहेत व काही ७/१२ वर हस्तलिखित प्रमाणे फेरफार क्रमांक टाकलेले नाहीत . ५) मराठवाड्यात अनेक हस्तलिखित ७/१२ वर खातेदारांची आडनावे लिहिलेली नाहीत तथापि औरंगाबादच्या MASTER TRAINERS च्या विभागीय प्रशिक्षणा नंतर अनेक ठिकाणी अशी आडनावे नमूद करण्यात आली आहेत तथापि इतर हक्कातील खातादाराची आडनावे नमूद करायची शिल्लक आहेत . सर्व खातेदारांची आडनावे ७/१२ वर नमूद करणेत यावीत . ६) अनेक तालुक्यात फक्त मंडळ अधिकार्यांना पालक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे , पालक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार , तहसीलदार , उप विभागीय अधिकारी व अन्य उप जिल्हाधिकाऱ्यांनी जबाबदारी घेतलेली नाही . ७) खाता मास्टर चे काम योग्य रित्या पूर्ण करताच घोषणापत्र १ तलाठी यांनी केले आहे . ८) अनेक तालुक्यात पालक अधिकार्यांचा १ ते २४ मुद्द्यांचा तपासणी फॉर्म उपलब्ध झाला नाही . अशी तपासणी केलेली नसताना DBA यांनी घोषणापत्र २ केले आहे . ९) अनेक गावचे ७/१२ ठरवून दिलेल्या बिंदू प्रमाणे तपासणी करताच व त्यांचे प्रपत्र १ मधील प्रमाणपत्र ( तपासणी केलेल्या गट न. च्या यादी सह ) प्राप्तझाले नसताना घोषणापत्र ३ तहसीलदार यांनी केले आहे . १०) काही तालुक्यात भूमी अभिलेख , नोंदणी विभाग व तहसीलदार यांचे कडील महसुली गावांची संख्या जळत नाही .उप विभागीय अधिकाऱ्यांनी या बाबत संयुक्त बैठक घेऊन तालुक्यातील एकूण महसुली गावांची संख्या व नवे निश्चित करावीत . ११)अनेक गावात हस्तलिखित गाव नमुना न १(क) वर तहसीलदार यांची प्रतीस्वक्षरी नाही व हस्तलिखित १(क) व संगणकीकृत १(क) मध्ये रुजवात घेतलेली नाही . १२) काही तालुक्यांत एकाच ७/१२ वर इतर हक्कातील अनेक नोंदी साठी एकाच फेरफार क्रमांक नमूद आहे किंवा एकापेक्षा अधिक ७/१२ वर एकाच फेरफार क्रमांकाने वेगवेगळ्या नोंदी घेनेत आलेल्या आहेत . अश्या फेरफार क्रमांकामुळे पुढे ई फेरफार घेताना अडचणी येऊ शकतात . १३) Re-Edit च्या परीशिस्ट ब वर तहसीलदार यांची सही असावी, परीशिस्ट ब किती पानांचे आहे? ते नमूद करून शेवटचे पानावर देखील सही असावी . परीशिस्ट ब च्या आदेशाला तहसील कार्यालयाचा जावक क्रमांक देणेत यावा . १४) घोषणापत्र २ झाल्या नंतर परिपूर्ण अचूक संगणकीकृत ७/१२ ची प्रिंट काढून ती ठरवून देलेल्या बिंदूचे ७/१२ तपासून सर्व संबंधित महसूल कर्मचारी / अधिकाऱ्याने प्रपत्र १ मधील प्रमाणपत्र घेनेत यावीत या त्रुटि आपले जिल्हात राहणार नाहीत ह्याची दक्षता घ्यावी. गुणवत्ता पूर्ण करून सोबत जोडलेले 1 ते 15 दस्तवेज एकत्रित करून प्रत्येक गावाची संचिका अभिलेख तालुका अभिलेख कक्षात किमान 10 वर्ष कलावधीसाठी जतन करण्यात यावेत. Re-Edit Module मधील घोषणापत्र 1,2,3 सह गुणवत्तापुर्वक काम पुर्ण करण्यासाठी दिनांक ८/९/२०१७ च्या परिपत्रकाद्वारे ९ मुद्द्यांची चेकलिस्ट (तपासणी सुची) गावाचे नाव: तालुका: जिल्हा: अ.क्र. कागदपत्राचा तपशील शेरा 1 चावडी वाचन कार्यक्रमाची जाहीर नोटीस . 2 चावडी वाचन कार्यक्रमाचे इतिवृत्त 3 पालक महसूल अधिकार्याचा तपासणी तक्ता 4 Re-Edit कामाचे परिशिष्ट ब च्या स्वाक्षरीत प्रती 5 संगणकीकृत गाव न. न.१ (क) ची प्रत 6 संगणकीकृत गाव न.न . ८ अ ची प्रत 7 संगणकीकृत गाव न.न. ७/१२ ची प्रत (तपासणी केलेले) 8 प्रपत्र क्रमांक -1 तपासणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी सादर करावयाचे प्रमाणपत्र अ) तलाठी यांचे प्रपत्र १ ब) मंडळ अधिकारी यांचे प्रपत्र १ क) नायब तहसीलदार यांचे प्रपत्र १ ड) तहसीलदार यांचे प्रपत्र १ इ) उप विभागीय अधिकारी यांचे प्रपत्र १ फ) जिल्हाधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी यांचे प्रपत्र १ 9 प्रपत्र क्रमांक-2 संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार व तहसिलदार यांनी संगणकीकृत 7/12 च्या डाटाच्या अचुकतेबाबत जिल्हाधिकारी यांन सादर करावयाचे प्रमाणपत्र. 10 अकृषिक जमिनींचे क्षेत्र व आकार रूपांतराचे तहसीलदार यांचे आदेशाची प्रत 11 तालुका समरी रिपोर्ट १ ते १४ ची प्रत 12 तालुका समरी रिपोर्ट १५ ते २८ ची प्रत 13 घोषणापत्र १ ची प्रत 14 घोषणापत्र २ ची प्रत 15 घोषणापत्र ३ ची प्रत दिनांक:

Comments

Archive

Contact Form

Send