नगर भूमापन झालेल्या क्षेत्रातील अधिकार अभिलेखाचे मालकी हक्काची दुहेरी नोंद पध्दती बंद करणेबाबत.
नमस्कार मित्रांनो
नगर भूमापन झालेल्या क्षेत्राचे ७/१२ बंद करणे बाबत भूमिअभिलेख विभागाकडून प्राप्त गट / स न ची यादी आज सर्व जिल्हाधिकारी यांना पाठवली आहे ते ७/१२ बंद करणेची कार्यवाही करावी .
जमाबंदी आयुक्त तथा
संचालक भूमी अभिलेख महाराष्ट्र
राज्य पुणे यांचे कार्यालय
ई-फेरफार/क्र/रा.स./कावि/20/२०१७
दिनांक 7 /10/२०१७.
प्रति
जिल्हाधिकारी, ( सर्व)
विषय – महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 चे कलम 122 व 126 अन्वये नगर भूमापन झालेल्या
क्षेत्रातील अधिकार अभिलेखाचे मालकी हक्काची दुहेरी नोंद पध्दती बंद करणेबाबत.
संदर्भ –1. मा. जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य) यांचेकडील पत्र क्रमांक
क्र.रा.भू.अ.आ.का.4/दुहेरी नोंद/2017 दिनांक 19/07/2017.
2. शासनाकडील परिपत्रक क्र.संकीर्ण-1005/प्रक्र.346/ल-6 दिनांक 21/01/2006.
उपरोक्त संदर्भ व विषयान्वये ज्या मिळकती बिनशेती होऊन त्यांचा भूमी अभिलेख विभागाकडील नगर भूमापन अभिलेखात मोजणीअंती नकाशा कायम होऊन मालकी हक्काच्या नोंदी मिळकत पत्रिकेवर कायम झालेल्या आहेत अशा जमीनीच्या / मिळकतीच्या 7/12 उताऱ्यांचे वितरण व परिरक्षण महसूल विभागाने बंद करणेचे आहेत. याबाबत दिनांक 19/7/2017 च्या परिपत्रकातील संदर्भ क्रमांक 3 अन्वये यापुर्वी सचुना निर्गमित करणेत आलेल्या होत्या. सदर परिपत्रकान्वये ज्या क्षेत्रातील नगर भूमापन झाले आहे त्या क्षेत्रातील 7/12 बंद करण्याच्या सुचना दिलेल्या असुन, नगर भूमापन हद्दीतील 7/12 उताऱ्यावर यापुर्वी ज्या क्षेत्रातील नगर भुमापन झाले आहे त्या क्षेत्रातील 7/12 " सदर क्षेत्राचे नगर भूमापन झाले असल्याने व क्षेत्र मिळकत पत्रिकेकडे वर्ग झाल्याने अभिलेख बंद करण्यात येत आहे." अशा आशयाच्या नोंदी घेवुन सदर मिळकती संदर्भात तलाठी यांचेकडुन 7/12 उतारे देण्यात येऊन नयेत अशा सूचना दिलेल्या आहेत.
नगर भूमापन हद्दीतील बिनशेती वापराच्या मिळकतीच्या मालकी हक्काचे दुहेरी पध्दत बंद करणेबाबतची माहिती या कार्यालयाकडील संदर्भीय पत्र दिनांक 19/7/2017 रोजीचे परिपत्रकाचे अनुषंगाने मागणी केली होती त्या अनुषंगानेआपल्या जिल्हयातील नगर भूमापन हद्दीतील पुर्ण बिनशेती झालेले गट नंबर / सर्व्हे नंबरची माहिती प्राप्त झाली आहे. इकडील कार्यालयाचे दिनांक 19/7/2017 रोजीचे पत्रामध्ये नमुद केलेप्रमाणे तहसिलदार यांनी प्रत्येक गावासाठी एक आदेश काढुन ई-फेरफार आज्ञावलीतुन आदेश व दस्ताऐवज या प्रकारातून फेरफार घेवुन असे 7/12 बंद करण्यात यावेत तसेच याबाबत आपल्या जिल्हयात मालकी हक्काची दुहेरी नोंद पध्दत बंद करणेबाबत सुचना देण्यात याव्यात व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल इकडील कार्यालयास पाठवावा ही विनंती.
सोबत नगर भूमापन हद्दीतील बंद करावयाचे स.नं./ग.नं.ची यादी जोडली आहे.
सोबत पानांक 1 ते .....असत.
( रामदास जगताप )
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
जमाबंदी आयुक्त कार्यालय (म.राज्य) पुणे
प्रत-उपजिल्हाधिकारी तथा डी.डी.ई. (सर्व)
- कार्यवाही अहवाल 15 दिवसात माझे नांवे पाठवावा ही विनंती.
Comments