अचुक गा.न.नं. 7/12 व 8अ साठी घोषणापत्र-3 केलेल्या गावांसाठी तपासणी करून तालुका अभिलेख कक्षात जतन करावयाची संचिके बाबत DT 7.10.17
क्र./रा.स./का.वि./१२/२०१७
जमाबंदी आयुक्त आणि संचालक
भूमी अभिलेख ( म.राज्य ), पुणे
दिनांक -७/१०/२०१७
प्रति,
मा. जिल्हाधिकारी ( सर्व )
विषय – अचुक गा.न.नं. 7/12 व 8अ साठी घोषणापत्र-3 केलेल्या गावांसाठी तपासणी करून
तालुका अभिलेख कक्षात जतन करावयाची संचिके बाबत
संदर्भ –1. या कार्यालयाचे परिपत्रक - दिनांक 3 डिसेंबर,2015.
2. या कार्यालयाचे परिपत्रक - दिनांक 5 मे, 2017.
3. या कार्यालयाचे परिपत्रक - दिनांक 10 जुलै ,2017.
4. इकडील मा.जमाबंदी आयुक्त यांचे दिनांक 2 सप्टेंबर, 2017
चे अ.शा.प./रा.भु.अ.आ.का.-4/रि- एडिट/2017.
5. या कार्यालयाचे परिपत्रक -दिनांक 8 सप्टेंबर, 2017.
चावडी वाचनाच्या विशेष मोहिमेनंतर अचुक गा.न.नं. 7/12 व 8अ च्या कामासाठी उपलब्ध करुन दिलेल्या Re-Edit Module मधील घोषणापत्र 1,2,3 सह गुणवत्तापुर्वक काम पुर्ण करण्यासाठी दिनांक ८/९/२०१७ च्या परिपत्रकाद्वारे ९ मुद्द्यांची चेकलिस्ट (तपासणी सुची) देणेत आली आहे . त्या सर्व मुद्द्यांची पूर्तता करूनच तलाठी अथवा तहसिलदार यांनी घोषणापत्र-3 केले असेल अशी अपेक्षा आहे परंतु काही जिल्ह्यात पालक महसूल अधिकाऱ्यासह काही महसूल अधिकाऱ्यांनी ठरवून दिलेल्या बिंदू प्रमाणे ७/१२ प्रत्यक्ष न तपासताच व अश्या ७/१२ वर नाव व पदनाम लिहून अध्याक्षरी न करताच घोषणापत्र ३ देण्यासाठी आग्रह धरला जात आहे अश्या घटना निदर्शनास येत आहेत .तथापि गुणवत्तापूर्वक आपले काम पूर्ण होण्यासाठी आपण आवश्यक ती खबरदारी आपल्या जिल्ह्यात घेत आसल अशी अपेक्षा आहे .
चावडी वाचनाच्या या विशेष मोहिमेनंतर अचूक ७/१२ व ८अ ची सुनिश्चिती करण्यासाठी आपल्या जिल्ह्यातील ज्या गावांचे घोषणापत्र ३ पूर्ण झाले असेल त्या गावांची तपासणी आपले अधिनस्थ उप जिल्हाधिकारी ( डी.डी.ई.) अथवा उप विभागीय अधिकारी यांचे मार्फत करणेत यावी . त्यासाठी घोषणापत्र ३ पूर्ण झालेल्या प्रत्येक गावची सर्व संबंधितांची स्वाक्षरी असलेली संचिका तालुका अभिलेख कक्षात जमा करून घेणे आवश्यक आहे . या संचिकेत खालील कागदपत्र किमान १० वर्षे जतन करून ठेवण्यात यावीत.
अचूक संगणकीकृत ७/१२ व ८अ ची संचिका – गावाचे नाव -------- तालुका -----
अ न कागदपत्राचा तपशील पृष्ठ क्रमांक
१ चावडी वाचन कार्यक्रमाची जाहीर नोटीस .
२ चावडी वाचन कार्यक्रमाचे इतिवृत्त
३ पालक महसूल अधिकार्याचा तपासणी तक्ता
४ Re-Edit कामाचे परिशिष्ट ब च्या स्वाक्षरीत प्रती
५ संगणकीकृत गाव न. न.१ (क ) ची प्रत
६ संगणकीकृत गाव न.न . ८ अ ची प्रत
७ संगणकीकृत गाव न.न. ७/१२ ची प्रत ( तपासणी केलेले )
८ प्रपत्र क्रमांक -1 तपासणी करणाऱ्या अधिकारी व कर्मचारी यांनी सादर करावयाचे प्रमाणपत्र
अ) तलाठी यांचे प्रपत्र १
ब) मंडळ अधिकारी यांचे प्रपत्र १
क) नायब तहसीलदार यांचे प्रपत्र १
ड) तहसीलदार यांचे प्रपत्र १
इ) उप विभागीय अधिकारी यांचे प्रपत्र १
फ) जिल्हाधिकारी अथवा त्यांचे प्रतिनिधी यांचे प्रपत्र १
९ प्रपत्र क्रमांक-2 संबंधित तलाठी, मंडळ अधिकारी, नायब तहसिलदार व तहसिलदार यांनी संगणकीकृत 7/12 च्या डाटाच्या अचुकतेबाबत जिल्हाधिकारी यांन सादर करावयाचे प्रमाणपत्र.
१० अकृषिक जमिनींचे क्षेत्र व आकार रूपांतराचे तहसीलदार यांचे आदेशाची प्रत
११ तालुका समरी रिपोर्ट १ ते १४ ची प्रत
१२ तालुका समरी रिपोर्ट १५ ते २८ ची प्रत
१३ घोषणापत्र १ ची प्रत
१४ घोषणापत्र २ ची प्रत
१५ घोषणापत्र ३ ची प्रत
वरील प्रमाणे सर्व कागदपत्रांच्या प्रती संबंधीतांच्या स्वाक्षरीसह तालुका अभिलेख कक्षात जमा करण्यात आल्याची तहसिलदार यांनी स्वत: खात्री करूनच घोषणापत्र ३ दिले असतील अशी अपेक्षा आहे
सदरच्या सूचना सर्व वापरकर्त्यांच्या निदर्शनास आणाव्यात व सूचनांचे तंतोतंत पालन होत असल्याचा तपासणी अहवाल आठ दिवसात इकडे पाठवावा, ही विनंती.
मा . जमाबंदी आयुक्त सो आपला विश्वासू
यांचे निर्देशावरून
( रामदास जगताप)
राज्य समन्वयक, रा.भू.अ.आ.का.
प्रति, उप जिल्हाधिकारी तथा डी.डी.इ.( सर्व ) यांना माहितीसाठी व तत्काळ कार्यवाहीसाठी सस्नेह
Comments