Re-Edit मॉडयुल मधील काम संपल्याची घोषणा DECLARATION 1 करणे पूर्वी
अचुक संगणकीकृत गाव नमुना
नंबर 7/12 व 8अ साठी शासनाने चावडी वाचनाची विशष
मोहीम संदर्भ क्र.1च्या
परिपत्रकाप्रमाणे शासनाने घोषित केली होती.या विशेष मोहिमेमध्ये खातेदारांनाकडून अचुक 7/12 व 8अ साठी प्राप्त आक्षेप चावडी वाचनाच्या वेळी निदर्शनास आलेल्या
त्रुटी ,पालक अधिकाऱ्यांच्या 1 ते 24 मुद्दयांच्या
तपासणीत तसेच तलाठी, मंडळ अधिकारी यांच्या
प्रत्यक्ष 7/12 तपासणीत आढळुन आलेल्या त्रुटी
दुर करण्यासाठी Re-Edit Module व्दारे
सुविधा उपलब्ध्ा करून देण्यात आली आहे.
या सुविधेचा वापर करून अचूक 7/12 व 8अ जनतेला डिजीटल स्वाक्षरीने उपलब्ध करून
देण्यासाठी 7/12 चा सर्व डाटा डिजीटल फॉरमॅट
मध्ये असणे आवश्यक असल्याने करावयाची कार्यवाहीबाबत संदर्भ क्रमांक 1ते 5 अन्वये
मार्गदर्शक सुचना वेळोवेळी देण्यात आल्या आहेत. मात्र Re-Edit odule व ODC मधील अहवाल 1 ते 26 निरंक करण्यासाठीच्या मार्गदर्शक सुचना दि. /2017 रोजीच्या
परिपत्रकान्वये देण्यात आल्या होत्या. अचुक 7/12 व 8अ देण्यासाठी ODC
मधील 1ते 26 अहवालामधील अहवाल क्रमांक 1,3,6,14
व 23 वगळून
इतर सर्व अहवाल निरंक करावेत. याबाबत
प्रत्येक गावातील Re-Edit
मधील काम करून काम संपण्याची घोषणा करण्यापुर्वी सर्व अहवाल निरंक करून करावयाची
कार्यवाहीसाठी खालील प्रमाणे सुधारीत
मार्गदर्शन सुचना देण्यात येत आहेत.
Re-Edit Module चे काम सुरु करण्यासाठीची पुर्वतयारी
1) ज्या गावात Re-Edit Module चे
काम सुरू करावयाचे आहे त्या गावात ई-फेरफार
ODU,Edit मधील कोणताही फेरफार प्रलंबीत
असता कामा नये.ई-फेरफार व Edit मॉडयुलमधील 100% फेरफार मंडळ अधिकाऱ्याने योग्य रित्या निर्गत करणे आवश्यक
आहे.
2) Re-Edit Module चे काम सुरु करण्यापुर्वी Edit,ई-फेरफार,ODC मधील सर्व अहवाल निरंक करण्यात यावेत.
3) सर्व अहवाल निरंक केल्यानंतर ODC मधून Village Processing करण्यात यावे त्यानंतरच गावचा 8अ ( शेती
व बिनशेतीचा ) Online generate करून प्रिंट आऊट काढावी. त्यावर
कोणत्या खात्यात नाव समाविष्ट करणे, नाव
वगळणे, स्पेलिंग दुरुस्ती करणे,खातेप्रकार बदलने खाते एकत्रिकरण व खाता विभागणी कोणत्या खात्यामध्ये आवश्यक आहे
त्याप्रमाणे Marking करण्यात यावे.
okay
ReplyDelete