रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

3110 villages became eligible for correct digitally signed v f 7/12 from 15 th aug,2017

नमस्कार मित्रांनो

राज्यातील ३११० गावातील अचूक संगणकीकृत ७/१२ आज स्वातंत्र्य दिनापासून डिजिटल स्वाक्षरीने मिळण्यास पात्र झाली आहेत
या गावांसाठी अहोरात्र कष्ट घेणाऱ्या तलाठी मंडळ अधिकारी व संबंधित महसूल अधिकाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन . या गावात आज स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी होणाऱ्या ग्रामसभेत तलाठी मंडळ अधिकारी व संबंधित महसूल अधिकारी हजर राहून या बाबत माहिती देईल व उपस्थित असणाऱ्या खातेदारांना या अचूक संगणकीकृत ७/१२ चे प्रमुख मान्यवरांचे हस्ते वितरण होईल . पालकमंत्र्यांचे भाषणात याचा विशेष उल्लेख करून संबंधित तलाठी मंडळ अधिकाऱ्यांचे प्रमाणपत्र देऊन यथोचीत गौरव नंतर केला जाईल . या दिवशी संबंधित सर्व गावात उपस्थित राहणार असलेने गौरव समारंभ नंतर देखील घेता येईल . उर्वरित गावांचे काम पूर्ण करण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्चित करणेत यावा . कोणत्याही परिस्थिती कामाची गुणवत्ता राखली जाईल याची दक्षता प्रत्येक तलाठी मंडळ अधिकारी , पालक महसूल अधिकारी , नायब तहसीलदार , तहसीलदार व उपविभागीय अधिकाऱ्यांनी घ्यावी .
रामदास जगताप , उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक , ई फेरफार प्रकल्प , जमाबंदी अायुक्त व संचालक भूमिअभिलेख कार्यालय , पुणे

Comments

Archive

Contact Form

Send