रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

गुड बाय पीएमआरडीए करून उप जिल्हाधिकारी रोहयो , अहमदनगर पदावर रुजू दि. १६ फेब्रुवारी २०२४



 नमस्कार मित्रांनो , 

गुड बाय पीएमआरडीए  करून 
उप जिल्हाधिकारी रोहयो , अहमदनगर पदावर रुजू दि. १६ फेब्रुवारी २०२४ 

आज बर्‍याच दिवसांचे नंतर ब्लॉग लिहीत आहे , 

                   दि. २७ जानेवारी २०२२ रोजी पुणे महानगर प्रदेश विकस्सा प्राधिकरण पुणे (PMRDA) येथे महानगर आयुक्त यांचे विशेष कार्य अधिकारी म्हणजेच ओएसडी (OSD) रुजू झाल्या नंतर त्यानंतर तत्कालीन महानगर आयुक्त श्री, सुहास दिवसे सरांचे आग्रहस्तव तेथील  माहिती व  तंत्रज्ञान विभागाचा विभाग प्रमुक म्हणून कार्यभार हाती घेतला . तसेच प्राधिकरणाचा जनसंपर्क अधिकारी म्हणून देखील कार्यभार स्वीकारला आणि त्यामुळे प्राधिकरणाच्या सर्व विधायक घडामोडी सामान्य माणसांचे पर्यन्त पोहचविण्याचा योग आला. त्यानंतरचे महानगर आयुक्त श्री राहुल महिवाल  सर यांनी जमीन व मालमत्ता विभागाचा उप आयुक्त म्हणून काम करण्याची संधी मला मिळाली. ई लिलावाचे माध्यमातून करोडो रूपयांचा महसूल पीएमआरडीए ला मिळवून दिला. प्राधिकरण कार्यालयाचे दैनंदिन कामकाजात माहिती व तंत्रज्ञान विभागाचा पुरेपूर वापर करून कामात पारदर्शकता, गतीमानता व अचूकता प्राप्त करण्यात मोलाचा हातभार लागला. मुख्य जीआयएस तज्ञ म्हणून डों. प्रीतम वंजारी यांनी मोलाची साथ दिली, त्यामुळेच आयटी ची संपूर्ण खरेदी GEM पोर्टलद्वारे  शक्य झाली, अत्यंत उत्कृष्ट असे डिजिटल सातबारा सह प्राधिकरणाचे जीआयएस पोर्टल  विकसित करण्याचे स्वप्न येथेच साकार झाले. ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर नगर नियोजन , टीपी स्कीम, सुविधा क्षेत्राचे हस्तांतर, रिंग रोड चे  आखणीचे काम करणे  सुसह्य झाले. ब्याथेमेट्री च्या नावीन्यपूर्ण वापरेने पाण्याचे खलील भूभागाचा अभ्यास करणे शक्य झाले, 

                            प्राधिकरण  कार्यालयातील कार्यकाल पूर्ण न होताच लोकसभा सार्वत्रिक  निवडणूक  २०२४ चे कारण दाखवून माझी बदली नाशिक विभागातील अहमदनगर जिल्ह्यात उप जिल्हाधिकारी रोजगार हमी योजना अहमदनगर म्हणून झाली आणि महसूल विभागात उप जिल्हाधिकारी संवर्गात २० वर्षे सेवा झाल्यानंतर पदोन्नतीची अपेक्षा असताना शासनाने रोजगार हमी योजनेचे काम पाहण्याची संधी दिली.
             
                               तहसिलदार पंढरपूर येथून दि ३.१२.२००३ च्या आदेशाने प्रथम पदोन्नतीने बरोबर २० वर्षा पूर्वी विशेष भूमी संपादन अधिकारी क्रमांक ७ सांगली येथे रुजू झालो आणि पुन्हा बरोबर २० वर्षांनी दि १६.०२.२०२४ रोजी  शासन आदेशन्वये  उप जिल्हाधिकारी रोहयो , अहमदनगर पदावर रुजू झालो ( १६ फेब्रुवारी हा फक्त योगायोग नसावा ) 

आता २० वर्षा नंतर ही शासनाची  माझे कडून चांगले कामाची अपेक्षा दिसते. 
शासनाचे मनपूर्वक आभार 

आपला 
रामदास जगताप 

Comments

Archive

Contact Form

Send