रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

पुणे महसूल विभागातील ई-फेरफार प्रकल्पाच्या मास्टर ट्रेनर्ससाठी यशदा, पुणे येथे तीन दिवसाचे निवासी उजळणी प्रशिक्षण

 

                 पुणे महसूल विभागातील ई-फेरफार प्रकल्पाच्या मास्टर ट्रेनर्ससाठी यशदा, पुणे  येथे तीन दिवसाचे निवासी उजळणी प्रशिक्षण 

 

               KNOWELDGE TRANSFER- SESSION 1

     नवीन वर्षाच्या आपल्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा -


                               आज दि.३.१.२०२१  रोजी पुणे महसूल विभागातील  निवडक महसूल अधिकारी व कर्मचारी यांना मास्टर ट्रेनर्स म्हणून ३ दिवसांच्या निवासी प्रशिक्षण वर्गासाठी उजळणी प्रशिक्षण वर्ग यशदा, पुणे येथे सुरु झाला. त्यावेळी राज्याचे जमाबंदी आयुक्त मा. एन. के. सुधांशू सर, उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प श्री. रामदास जगताप , उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक ई पीक पाहणी प्रकल्प श्री. श्रीरंग तांबे, यशदा च्या कोर्स डायरेक्टर श्रीमती उज्वला उदगावकर, तहसीलदार (प्रशिक्षण). बालाजी शेवाळे, औरंगाबाद विभागाचे विभागीय समन्वयक डॉ. गणेश देसाई, पुणे विभागाच्या विभागीय समन्वयक श्रीमती शामल काकडे, ई पीक पाहणीच्या help desk श्रीमती खुशबू पवार उपस्पुथित होते.


                        पुणे विभागातील पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापुरचे मुद्रांक जिल्हाधिकारी, प्रत्येक जिल्ह्यातून एक उप जिल्हाधिकारी / प्रांत अधिकारी, एक तहसीलदार, एक नायब तहसीलदार, एक मंडळ अधिकारी व एक तलाठी असे प्रत्येकी ७ अधिकारी कर्मचारी या प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.

            मास्टर ट्रेनरच्या या कार्यक्रमात  ७/१२ माधीत त्रुटी / विसंगती दूर करून त्यात अधिक अचूकता आणण्यासाठी करावयाचेचे MIS, DASHBOARD चा योग्य वापर , ई हक्क प्रणालीचा वापर, ई पीक पाहणी अंमलबजावणी बबत महसूल अधिकारी यांची जबाबदारी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले 

 

रामदास जगताप 

राज्य समन्वयक, ई-फेरफार प्रकल्प 
दि ३.१.२०२२ 

Comments

Archive

Contact Form

Send