रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

एक प्रतिक्रिया - धन्यावाद सर

 दि.२८ नोव्हेंबर २०२१.

प्रती,

मा.श्री.रामदास जी जगताप साहेब,

नमस्कार......

  आपले सर्व प्रथम मनापासून खुप खुप  हार्दिक अभिनंदन !!!!

   शेतकऱ्यांसाठी.......'ई'  पीक पाहणी ' ला शेतकऱ्यांचा प्रतिसाद, " हे वाचून आनंद झाला. 

    "माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार,  माझा पीक पेरा ," ही संकल्पना आपण प्रत्यक्षात उतरवली आहे. ' ई '-पीक पाहणी, हे मोबाईल अप, ही सुविधा शेतकऱ्यांसाठी विकसित केले आहे, तसेच शेतकरी करणार ई- पंचनामा हे नवीन धोरण आणणार आहात. शेतकऱ्यांसाठी अशी सुविधा देणारे देशातील पहिलं एकमेव राज्य म्हणून महाराष्ट्र राहणार आहे. ई- पीक पाहणीचा पहिला टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला आहे. हा एक ऐतिहासिक आदर्श उपक्रम ठराला आहे, याचे सर्वस्वी श्रेय हे आपणास आहे. आपण उपजिल्हाधिकारी या नात्याने राज्यस्तरीय समन्वयाची उत्तुंग अशी जबाबदारी उत्तमरीत्या पार पडत आहेत.

           आपण जगाचा पोशिंदा, शेतकरी बळीराजाचे  काम चांगल्या प्रकारे करीत आहात, अशीच उत्तरोत्तर कामाची गती वाढो !!! आपल्या हातून असेच अनेक महत्त्वपूर्ण  कामे व्हावीत, हीच ईश्वर चरणी प्रार्थना !!! पुढील वाटचालीस माझ्या शुभेच्छा !!!!

आपला

डॉ. दशरथ ठवाळ,

माजी सहयोगी अधिष्ठाता,

कृषि महाविद्यालय,

शिवाजीनगर, पुणे -५.

Comments

Archive

Contact Form

Send