रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

माझ्या मेसज बाबत माझी भूमिका ....

 

नमस्कार मित्रांनो,

                             आज सर्व  dilrmp whats app ग्रुपवर माझे मेसेज चा  निषेध

 करण्यात येत आहे , परंतु त्याची वस्तुस्थिती काय हे आपल्याला माहित असावे 

म्हणून थोडसे .....

                                         DILRMP PUNE ग्रुपवर ९.२४ च्या दरम्यान एक मेसेज मी अर्धवट वाचला व त्यात माझे नावाने काही आक्षेपार्ह उल्लेख होता हे लक्षात येताच मी तो मोठा मेसेज पूर्ण न वाचता ज्यांनी तो मेसेज फोरवर्ड केला त्यांना उद्देशून मुर्खा सारखे मेसेज (फोरवर्ड) पाठवू नका , ही  योजना रामदास जगताप ची नाही असा रील्पाय केला परंतु त्यानंतर लगेचच तेलंग  भाऊसाहेब यांनी हा मेसेज डुबल आप्पा यांचा होता व मी माहितीसाठी पाठवला आहे व मी आपला निषेध करतो असे नमूद केले.  तो मेसेज मी एक दीड तासाने पाहिला त्यानंतर मी लगेच डुबल आप्पा यांना फोन करून माझ्या नावाने का मेसेज पाठवत आहात ? अशी  विचारणा केली असता त्यांनी अनेक जिल्ह्यात स्थानिक स्थरावर अधिकारी तलाठी यांना मोफत ७/१२ वाटपा वरून टार्गेट करत आहेत / नोटीस काढत आहेत असे सांगितले त्यांना मी वस्तुस्थिती सांगितली व नैसर्गिक आपत्ती मदत प्रथम प्राधान्य व ई पीक पाहणी किंवा मोफत सातबारा वाटप त्यानंतर असेच काम शासनाला अपेक्षित आहे असे सांगितले जर आपल्याला खूपच अडचण असेल तर आपण शासनाकडे दाद मागावी, गाऱ्हाणे मांडावे परंतु माझे नावाने चुकीचे मेसेज पाठवून किंवा माझा परितोषका बद्दल गैसमज पसरवू नका. मी तलाठी यांच्या अडचणी सोडविण्यासाठीच येथे आहे व ते मी करतो आहे हे सर्व काही माझ्या हातात नाही असे सांगितले व आमचा संवाद संपला . परंतु त्या नंतर आपण लातूर जिल्ह्याचे तलाठी संघटनेचा अध्यक्ष आहे असे सांगून एका व्यक्तीने मला फोन केला व धमकीची भाषा बोलू लागले .......................... हे सर्व  इथे सांगणे इष्ट नाही.  (त्याने तो फोन टापिंग करून नंतर अनेक तलाठी ग्रुपवर पाठवल्याचे समजले)

               त्या नंतर सर्व तलाठी ग्रुपवर हे मेसज फिरत आहेत व अनेक तलाठी नाव बदलून मला फोन करत आहेत त्यात काही तलाठी काही चागले मेसेज देखील पाठवत आहेत परंतु पर्सनल मेसेज. परंतु काही तलाठी ग्रुपवर मात्र बदनामी करत आहेत. क्रुपया ध चा मा करू नका .

 

             माझी भूमिका स्पष्ट आहे ,  माझा रिप्ल्याय डुबल आप्पा यांना उद्देशून नव्हता व नाही परंतु ह्याचा अर्थ तेलंग भाऊसाहेब यांना उद्देशून होता असे ही नाही ------- असे काहीही मेसेज पाठवू नका ही सार्वजनिक प्रतिक्रिया होती मेसेज माझ्या पर्सनल नावाने होता म्हणून मी प्रतिक्रिया दिली एव्हडेच . वैयक्तिक रित्या मला कोणालाही दुखवायचे नव्हते किंवा अपमानित करायचे नव्हते. काम करताना आदर द्या आदर घ्या ही एकच भावना माझ्या मनात असते.

                        डुबल आप्पा  व तेलंग भाऊसाहेब यांचे व माझे अनेक दिवसाचे ऋणानुबंध आहेत त्यांचे बद्दल मला नित्तात आदर आहे , मी  राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांना देखील आदर करतो,  त्यांनी गेले अनेक वर्षे आहोरात्र काम केल्या मुळेच ई फेरफार चे अत्यंत कठीण  व किचकट काम पूर्णत्वास आले आहे हे मान्यच आहे. हे सर्व  काम मीच केले हे मी कधीच म्हटलेले नाही. मी फक्त निमित्त आहे परंतु मी तलाठी व मंडळ अधिकारी यांच्या अडचणी सोडविण्याचे प्रामाणिकपणे काम केले व  त्यात बहुतांश यशही आले म्हणून तर आज राज्यातील जनता ह्याचा खरोखर लाभ घेत आहे.  अडचणी अनंत होत्या व आहेत त्यातून मार्ग काढत आपण सर्व काम करतो. बरे असो गैरसमज नसावेत.

               कृपया माझ्या वर वैयक्तिक रोषधरून माझे नावाने मेसेज पाठवू नयेत हीच अपेक्षा. तुमच्या कोणत्याची अडचणी सोडविण्यास मी शक्य ती  मदत करीतच राहील कारण आपण शेवटी लोकसेवक आहोत जनतेसाठी काम करत आहोत व करत राहणार.

              ------ परंतु आत्म सन्मान गहाण ठेवून नव्हे.

आपला

रामदास जगताप

दि ५.१०.२०२१

Comments

  1. sir we are with you. you are doing great work
    history always remembers you as a digital man of maharahtra. keep it up sir

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send