रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

मोफत सुधारित गाव नमुना ७/१२ घरपोच वाटप शुभारंभ दि २.१०.२०२१

 

महात्मा गांधी जयंती                                                                             दि.२ ऑक्टोबर, २०२१ 


नमस्कार मित्रांनो , 


                        मोफत सुधारित गाव नमुना ७/१२ घरपोच वाटप शुभारंभ  दि २.१०.२०२१  

                 आज महात्मा गांधी जयंती  दिनी आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्वाच्या निमित्त महसूल विभागाने जाहीर केलेल्या मोहिमे अंतर्गत संपूर्ण राज्यात शेतकरी खातेदार यांना मोफत सुधारित डिजिटल स्वाक्षरीत ७/१२ वाटपाचा शुभारंभ झाला. 



                 सामान्य माणसाला डिजिटल स्वाक्षरीत सुधारित सातबारा मिळत असल्याचे चित्र पाहून अत्यंत समाधान वाटले प्रत्येकाला  ७/१२ मिळविण्यासाठी  किती कष्ट पडत होते हे आपल्याला प्रत्येका कडून ऐकायला मिळत होते  परतू आता राज्याचे महसूल मंत्री मा.ना बाळासाहेब थोरात यांचे दूर दृष्टी नेतृत्वाने हे काम सोपे करण्याचे ठरविले आणि ते पूर्ण केले ई-फेरफार प्रकल्पाने. 

               डिजिटल स्वाक्षरीत सातबारा ही एक अभिनव कल्पना सुचली अनेक प्रयोग झाले अडचणी आल्या परतू तत्कालीन जमाबंदी आयुक्त आदरणीय चोक्कलिंगम साहेब यांनी सर्व अडचणीवर मात करत डिजिटल सातबारा चा प्रकल्प अंतिम ध्येयाकडे नेण्यासाठी योग्य दिशा दिली, राज्यातील सर्व तलाठी व मंडळ अधिकारी यांनी अहोरात्र परिश्रम घेतले आणि ९९.५० % म्हणजेच २ कोटी ५५ लक्ष पैकी २ कोटी ५४ लक्ष सातबारा डिजिटल स्वाक्षरीत झाले आणि त्याला कायदेशीर वैधता देखील शासनाने दिली. 




              राज्याचे महसूल विभागाचे अप्पर मुख्य सचिव डॉ. नितीन करीर  यांनी आपली प्रणाली  आणखी लोकाभिमुख करण्यासाठी ई पीक पाहणी मोबाईल आप राज्यव्यापी करण्याचा निर्णय घेण्यास एक पावूल पुढे जाऊन  निर्णय घेतला. आज ग्लोबल झालेला माझा डिजिटल सातबारा प्रत्येक शेतकऱ्याच्या हातात मोफत उपलब्ध होत आहे ह्याचा आनंद शब्दात मांडता येत नाही परंतु पाच वर्षे केलेल्या कष्टाचे चीज झाले असे वाटून मनो मन समाधान वाटते 

                आज या मोफत डिजिटल स्वाक्षरीत सातबारा वाटपाचा शुभारंभ पुरंदर तालुक्यात (जिल्हा पुणे  ) येथे महसूल मंत्री मा.ना.  मा.ना बाळासाहेब थोरात साहेब  व कृषी राज्य मंत्री मा.ना. विश्वजित कदम साहेब व पुरंदर चे आमदार मा. संजय जगताप  यांचे शुभ हस्ते आणि पुण्याचे विभागीय आयुक्त , जिल्हाधिकारी यांचे उपस्थित छान कार्यक्रम झाला . या सुंदर कार्यक्रमाचे नियोजन पुरंदर चे आमदार मा. संजय जगताप  यांचे समवेत प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड आणि तहसीलदार रुपाली सरनौबत यांनी केले त्यांचे मनस्वी आधार व अभिनंदन . 

            ई-पीक पाहणी प्रकल्पाला देखील शेतकरी यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून गेल्या दीड महिन्यात ७१ लाख शेतकरी यांनी ई पीक पाहणी केली आहे 




            ई फेरफार प्रकल्पाचा व ई पीक पाहणी प्रकल्पाचा समन्वयक या नात्याने मी सर्व तलाठी , मंडळ अधिकारी नायब तहसीलदार, तहसीलदार , उप जिल्हाधिकारी व जिल्हाधिकारी आणि शेतकारी बंधू भगिनींचे हार्दिक अभिनंदन करतो    


आपला 

रामदास जगताप 

उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक 

ई फेरफार प्रकल्प    

दि २.१०.२०२१      

Comments

  1. महसूल विभाग व अधिकारी यांचे आभार मानावे तेवढे कमी आहे. शेतकरी बांधवांना फायदेशीर अत्यंत नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले जात आहे. याचा शेतकरी बांधवांना फायदा होतो आहे.

    ReplyDelete

Archive

Contact Form

Send