रामदास जगताप ( Ramdas Jagtap )


उपजिल्हाधिकारी, PMRDA,पुणे.

ई-पीक पाहणी प्रकल्पाचे मध्य प्रदेशच्या जमाबंदी आयुक्त यांचे कडून कौतुक

 नमस्कार मित्रांनो , 

                             ई-पीक पाहणी प्रकल्पाचे मध्य प्रदेशच्या जमाबंदी आयुक्त यांचे कडून कौतुक 

                        

                            आज दि. २७.१०.२०२१ रोजी मध्य प्रदेश राज्याचे जमाबंदी आयुक्त मा. ज्ञानेश्वर पाटील साहेब (भा.प्र.से.) यांनी महाराष्ट्र राज्यातील  नगर भूमापन हद्दीतील नगर भूमापन कामकाज व ई-पीक पाहणी प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी  जमाबंदी आयुक्त कार्यालय पुणे येथे भेट दिली  त्यावेळी जमाबंदी आयुक्त कार्यालयात नगर भूमापन बाबत श्री बाळासाहेब काळे उप संचालक नगर भूमापन यांनी व ई पीएक पाहणी बाबत श्री. रामदास जगताप राज्य समन्वयक, ई पीक पाहणी प्रकल्प यांनी सादरीकरण केले या वेळी अप्पर जमाबंदी आयुक्त  श्री आनंद रायते साहेब यांनी अन्य प्रकल्पाची माहिती दिली व  या पुढील काळात दोन्ही राज्ये लोक हिताच्या चांगल्या गोष्टीची देवान घेवाण करतील अशी अपेक्षा व्यक्त केली .




                          त्यानंतर  सोरतापवाडी ता. हवेली यथील शेतकरी योगेश दिलीपराव थेऊरकर यांचे शेतावर  भेट देवून ई-पीक पाहणीचे प्रात्यक्षिक करून दाखवले त्यावेळी उपस्थित शेतकऱ्यांशी  श्री पाटील यांनी चर्चा केली आणि ई पीक पाहणी मोबाईल ॲप चे कौतुक केले .  या प्रकल्पातील काही चांगल्या बाबी मध्य प्रदेशातील गिरदावली (पीक पाहणी) मध्ये लागू करण्याचा त्यांचा मनोदय देखील बोलून दाखवला. 

                         या वेळी श्री जगताप यांनी ई पीक पाहणी मोबाईल ॲप राज्यातील जनतेने स्वीकारले असून आज अखेर ८७ लाख खातेदार शेतकऱ्यांनी या मध्ये नोंदणी करून सुमारे ६३ लक्ष शेतकरी खातेदार यांनी ई पीक पाहणी केली असल्याचे सांगितले आणि या प्रकल्पातील महत्वाच्या वैशिष्ट्यान्चा उल्लेख केला. या वेळी सोरतापवाडी च्या सरपंच सौ.संध्याताई चौधरी, उपसरपंच निलेश  खराटे, रामदास चौधरी मणिभाई देसाई पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन, शंकरबापू कड , मुकेश व वसंत थेऊरकर , नूरजहाँ सय्यद मंडळ अधिकारी उरुळी कांचन, निवृत्तीनाथ गवारी तलाठी सोरतापवाडी, प्रदीप जवळकर तलाठी शिंदवणे, सुधीर जायभाये तलाठी उरुळी कांचन अन्य शेतकरी उपस्थित होते. 

रामदास जगताप 

राज्य समन्वयक ई पीक पाहणी प्रकल्प

दि २७.१०.२०२१ 

Comments

Archive

Contact Form

Send