सर्व तहसीलदार यांना एक महत्वाची सूचना
सर्व तहसीलदार यांना एक महत्वाची सूचना -
ई फेरफार प्रणालीत online कलम 155 च्या आदेशाने खाते दुरुस्ती option असलेने , रजिस्टर वाटणीपत्र न करता किंवा क. 85 नुसार वाटणीपत्राचा मा.तहसिलदार यांचा आदेश न घेता , online क. 155 खाते दुरुस्ती option मधून खाते विभाजन करण्याचा फेरफार काही ठिकाणी तयार केला जात आहे आणि त्या आधारे पुन्हा रजिस्टर दस्तऐवज ने विक्री ने 7/12 त बदल होत आहेत / बोजा नोंद होत आहेत.*
तसेच online भूधारणा पद्धत बदलून वर्ग 2 चे वर्ग 1 सुद्धा करणेचा प्रयत्न काही ठिकाणी होत आहेत. असे दिसून येत आहे . हे अत्यंत गंभीर आहे कलम १५५ च्या आदेशाला मान्यता देताना आपण खात्री करावी.
online क. 155 टॕब मधील आदेशाची तहसिलदार यांच्या स्वाक्षरी चे आदेश पहिल्या शिवाय मंडळ अधिकारी यांनी कलम १५५ चे फेरफार मंजूर करू नयेत अशा लेखी सूचना आहेत हे देखील लक्षात घ्यावे .
*रितसर सुनावणी होऊनच क. 155 चे आदेश स्वाक्षरीत व्हावेत * .
आपला
रामदास जगताप
राज्य समन्वयक ई फेरफार प्रकल्प
Comments