सन २०२१-२२ च्या खरीप हंगामास ई-पिक पाहणी मोबाईल ॲप द्वारे माहिती भरण्यास दि १४.१०.२०२१ पर्यंत मुद्दतवाढ
नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो,
“ ई पीक पाहणीला साथ देऊया, शेतकर्यांना अधिक सक्षम बनवूया ”
माझी शेती माझा सातबारा मीच नोंदविणार माझा पीक पेरा
प्रेसनोट
सन २०२१-२२ च्या खरीप हंगामास ई-पिक पाहणी मोबाईल ॲप द्वारे माहिती भरण्यास दि १४.१०.२०२१ पर्यंत मुद्दतवाढ
ई-पिक पाहणीची माहिती भ्रमणध्वनी वरील ॲप द्वारा (Mobile App) गा.न.नं. १२ मध्ये नोंदविण्यासाठी स्वत: शेतकऱ्यांनी शेतातील उभ्या पिकांचा फोटो घेवून पिकांची माहिती थेट तलाठी यांना पाठविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा “ई-पीक पाहणी” कार्यक्रम संपूर्ण राज्यात दि १५ ऑगस्ट, २०२१ पासून सुरु केला आहे. या ॲप द्वारे आता पर्यत सुमारे ७० लाख पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी ई-पिक पाहणी भ्रमणध्वनी ॲप द्वारे नोंदणी केली आहे. खरीप हंगामासाठी सदर ॲप द्वारे माहिती भरण्याची मुद्दत दि ३०.०९.२०२१ पर्यंत देण्यात आलेली होती परंतु दरम्यानच्या काळात राज्याच्या विविध भागात अतिवृष्टी झाल्यामुळे अनेक खातेदाराची नोदणी करणे अद्यापही प्रलंबित आहे.
दि ३०.०९.२०२१ रोजी ई-पिक पाहणी राज्यस्तरीय अंमलबजावणी समितीची बैठक संपन्न झाली सदर बैठकीमध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी मुळे शेतकऱ्यांना ई-पिक पाहणी भ्रमणध्वनी ॲप द्वारे माहिती भरण्यास अडचणी निर्माण झाल्यामुळे सन २०२१-२२ च्या खरीप हंगाम मधील पिक नोंदणी ई-पीक पाहणीद्वारे करण्यास दि १४.१०.२०२१ पर्यंत मुद्दतवाढ देण्यात आली आहे. तरी या सुविधेचा लाभ राज्यातील शेतकरी बंधूंनी घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.
आपला,
रामदास जगताप
उप जिल्हाधिकारी व राज्य समन्वयक ई पीक पाहणी प्रकल्प, पुणे.
#ई पीक पाहणी #रामदास जगताप साहेब #न्यूज ऑन एअर ॲप #राज्यातील आकाशवाणीचे सर्व केंद्र #महसूल विभाग #कृषी विभाग #मुखमंत्री महाराष्ट्र राज्य #भूमिअभिलेख #महाराष्ट्र कृषी विद्यापीठे.
सर ई पीक पाहणी करत असताना अशी अडचण येत आहे की खातेदाराचा खाते क्रमांक दिसत नाही त्यामुळे पुढे पीक पहाणी करण्यास अडचण येत आहे तरी आपण मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteसर ई पीक पाहणी करत असताना अशी अडचण येत आहे की खातेदाराचा खाते क्रमांक दिसत नाही त्यामुळे पुढे पीक पहाणी करण्यास अडचण येत आहे तरी आपण मार्गदर्शन करावे.
ReplyDeleteसर ई पीक पाहणी खरीप पीक ठीकठाक असताना झाली. मात्र आज ते पीक नुकसान पंचनामा करण्यासाठी हा पर्याय उपलब्ध नाही. आणि काही तलाठी साहेब ई पीक पाहणी वर अडकवून बसलेत.जेव्हा ई पीक पाहणी एप वर नोंदी केली आहे तसाच पंचनामा करण्यासाठी मदत कराणार असे म्हणतात.
ReplyDelete